Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंच्या सर्व शिलेदारांनी घेतली राज्यपालांची भेट; नेमकी मागणी तरी काय?

Maharashtra Politics : राजकारणातील अनेक नेत्यांच्या अनेक गोष्टी आता समोर येत आहेत. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 28, 2025 | 02:14 PM
shivsena thackeray group leaders meet Governor c p radhakrishnan

shivsena thackeray group leaders meet Governor c p radhakrishnan

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Politics : मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. नुकतेच विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपले आहे. हे अधिवेशन विधेयक कामे आणि निर्णायमुळे न गाजता राजकीय नेत्यांच्या प्रतापांमुळे गाजले आहे. राज्यातील राजकीय अनेक राजकीय नेत्यांचे भांडणे, घोटाळे आणि मारहाण समोर आली आहे. याविरोधात आता ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. सकाळी 11.30 च्या सुमारास ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, अनिल परब, उपनेते विनोद घोसाळकर, नितीन नांदगावकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरेंच्या शिलेंदारांनी राज्यपालांची अचानक भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील वाचाळवीर मंत्री आणि कलंकित मंत्र्यांचा राजीनामा घेण्याबाबत त्यांनी हे पत्र लिहिले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

या भेटीची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. अंबादास दानवे यांनी लिहिले आहे की, “सत्ताधारी पक्षातील कलंकित, भ्रष्टाचारी व असंवेदनशील मंत्री व आमदार यांना तात्काळ बडतर्फ करण्याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळांने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पत्र दिले.  राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या गैरव्यवहार आणि प्रकरणाबद्दल माहिती पत्राद्वारे दिली.  मंत्री संजय शिरसाठ, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे , राज्य मंत्री योगेश कदम तसेच मंत्री नितेश राणे यांच्या गंभीर प्रकरणाची वस्तुस्थिती स्थिती राज्यपाल यांच्यासमोर मांडली,” अशी माहिती अंबादास दानवे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे त्यांनी लिहिले आहे की, “राज्यातील हनी ट्रॅप प्रकरण, ठाणे बोरिवली बोगदा प्रकरण, मीरा भाईंदर  महापालिकेच्या भूसंपादन प्रक्रियेत गैरव्यवहार अशा अनेक प्रकरण संदर्भात राज्यपाल यांना पत्राद्वारे माहिती दिली. यावेळी शिवसेना नेते अनिल परब, उपनेते विनोद घोसाळकर, बबनराव थोरात, अशोक धात्रक, विजय कदम, नितीन नांदगावकर, विठ्ठलराव गायकवाड, भाऊ कोरगावकर, सुष्माताई अंधारे, सुप्रदाताई फातप्रेकर, विशाखाताई राऊत, सचिव साईनाथ दुर्गे, पराग डाके, आमदार मिलिंद नार्वेकर, नितीन देशमुख, अनंत नर व महेश सावंत उपस्थित होते,” अशी माहिती अंबादास दानवे यांनी दिली आहे.

सत्ताधारी पक्षातील कलंकित, भ्रष्टाचारी व असंवेदनशील मंत्री व आमदार यांना तात्काळ बडतर्फ करण्याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळांने महामहीम राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांना आज पत्र दिले. राज्य… pic.twitter.com/JZHWoiXxZN — Ambadas Danve (@iambadasdanve) July 28, 2025

Web Title: Shivsena thackeray group leaders meet governor c p radhakrishnan maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2025 | 02:14 PM

Topics:  

  • Ambadas Danve
  • C. P. Radhakrishnan
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
2

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

‘भारताला हिंदू पाकिस्तान बनवू पाहत आहेत…’ उद्धव ठाकरे शिवसेनेचा RSS वर गंभीर आरोप, नव्या वादाची ठिणगी
3

‘भारताला हिंदू पाकिस्तान बनवू पाहत आहेत…’ उद्धव ठाकरे शिवसेनेचा RSS वर गंभीर आरोप, नव्या वादाची ठिणगी

Ramdas Kadam: “उद्धवजींनी दोन दिवस शिवसेनाप्रमुखांच्या बॉडीचा…; रामदास कदम यांनी फोडला राजकीय बॉम्ब
4

Ramdas Kadam: “उद्धवजींनी दोन दिवस शिवसेनाप्रमुखांच्या बॉडीचा…; रामदास कदम यांनी फोडला राजकीय बॉम्ब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.