ठाकरे गटाचे ६ खासदार एकनाथ शिंदेंच्या गळाला? उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना तोडण्याचा प्रयत्न कराल तर...
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये जोरदार राजकारण रंगले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच सत्ताधारी व विरोधी पक्ष कामाला लागले आहेत. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे देखील एक्शनमोडमध्ये आले आहेत. हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी होत उद्धव ठाकरे म्हणाले की,“नवीन वर्ष सुरू होऊन १७, १८ दिवस झाले, पण माझ्या नवीन वर्षाची सुरुवात आजपासून झाली आहे. आजचा हा माझा पहिला कार्यक्रम आहे. इथे मी या वर्षात पहिल्यांदाच माईक हातात धरला आणि तो ही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने. पांडुरंगाच्या दर्शनाने या नवीन वर्षाची सुरुवात केली, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, “सत्तेची कास धरणारे अनेक आहेत, पण सत्याची कास धरणारी माणसं फार थोडी राहिली आहेत. जेव्हा जेव्हा हिंदुत्वावर, हिंदू धर्मावर संकटं आली त्यावेळी शिवसेनाप्रमुख कणखरपणे उभे राहिले. गर्व से कहो हिंदू हैं असं संपूर्ण देशभरात म्हणणारे एकमेव व्यक्ती म्हणून बाळासाहेब ठाकरे यांना लोक हिंदूहृदयसम्राट म्हणू लागले. त्याआधी माझे वडील व आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी धर्मातल्या वाईट, अनिष्ट रूढी व परंपरांविरुद्ध लढा दिला. मात्र आता जे काही चाललं आहे. धर्म कोणत्या दिशेने चालला आहे, कोण नेते आहे, धर्माच्या नाड्या कोणाच्या हातात आहेत हेच कळत नाही आहे”.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
उद्धव ठाकरे म्हणाले की, “मधल्या काळात नीच प्रकार झाला. मी हिंदुत्व सोडल्याचा अपप्रचार केला गेला. पण आम्ही हिंदुत्वाची कास धरलेली आहे. तुमचा विश्वास बसेल का हिंदूहृदयसम्राटांचा पुत्र आणि प्रबोधनकारांचा नातू हिंदुत्व सोडू शकतो का? राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करावं, मात्र राजकारण करताना धर्माचा दुरुपयोग करून सत्ता मिळवणे हा तेवढाच मोठा अधर्म आहे. आम्ही हिंदू आहोत, हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणून मरणार आहोत. एकमेकांचा सन्मान करणे, मातेचा मान राखणं, आदर राखणे हा सगळा संस्कार आता मागे पडत आहे की काय असा वाटत आहे. ज्या पद्धतीने राज्यकारभार हाकला जात आहे ते पाहून वाईट वाटतं. मला इथे राजकारण आणायचं नसलं तरी आपल्या आयुष्याशी निगडित मुद्दा मांडतोय” असे स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे ठाकरे गटाचे प्रमुख ठाकरे म्हणाले, “अगदी घरात घुसून वार करणारे सुद्धा काही लोक आहेत, त्यांना मी वारकरी नाही म्हणत, ते अपराधी आहेत, गुन्हेगार आहेत. पण अशी ही संस्कृती आली कुठून? साधूसंतानी जी संस्कृती दिली आहे, माणूस म्हणून जगायचं कसं हे संस्कार साधूसंतांनी दिले. गाडगेबाबांनी आम्हाला माणूसकी शिकवली. माझे आजोबा व त्यांचे स्नेहसंबंध होते. आजोबांकडून त्यांच्या आयुष्यातील घटना मला समजल्या, त्यातून बोध मिळाला”. असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.