Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे! श्रीकांत शिंदे, ओमराजे निंबाळकरांची ११ किमी पायपीट, मध्यरात्री घेतले दर्शन

संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांदरम्यान खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. दोघांनी ११ किलोमीटरची पायपीट करून मध्यरात्री दर्शन घेतल्याची माहिती समोर आली आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 26, 2026 | 09:16 PM
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे! श्रीकांत शिंदे-ओमराजे निंबाळकरांची ११ किमी पायपीट, मध्यरात्री घेतले दर्शन

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे! श्रीकांत शिंदे-ओमराजे निंबाळकरांची ११ किमी पायपीट, मध्यरात्री घेतले दर्शन

Follow Us
Follow Us:
  • श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांनी तिरुपती ते तिरुमला ११ किमी पायी प्रवास करून घेतले बालाजीचे दर्शन
  • संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर या देवदर्शनाची राजकीय चर्चा
  • दर्शनानंतर विजयवाड्यातील कन्यका देवीचेही दर्शन
 

राज्यातील अलीकडील राजकीय घडामोडींनंतर आणि संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांदरम्यान शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. दोघांनी तिरुपती ते तिरुमला डोंगरापर्यंतचा सुमारे ११ किलोमीटरचा प्रवास पायी पूर्ण करत मध्यरात्रीच्या सुमारास दर्शन घेतल्याची माहिती समोर आली आहे.

या धार्मिक प्रवासात खासदार श्रीरंग बारणे, ॲड. निलेश देशमुख, चंद्रहार पाटील तसेच ओमराजे निंबाळकर यांचे बंधूही सहभागी झाले होते. दर्शनानंतर सर्वांनी विजयवाड्यातील कन्यका देवीचेही दर्शन घेतल्याचे सांगितले जात आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांमुळे देवदर्शनाची वाढली चर्चा

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यामध्ये श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या तिरुपती दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. मात्र, या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

राजकारणात मोठी खळबळ! उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच विमानातून नागपूरला; योगायोग की नवे राजकीय संकेत?

यापूर्वी शिवसेनेतील राजकीय घडामोडींमध्ये ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर मतदारसंघात त्यांनी विकासासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

चंद्रहार पाटील यांनी फोटो शेअर करत दिली माहिती

पैलवान चंद्रहार पाटील यांनी सोशल मीडियावर या दौऱ्याची माहिती देताना सांगितले की, २५ जूनच्या रात्री सुमारे ३८०० पायऱ्या चढून जवळपास ११ किलोमीटरचे अंतर पार करण्यात आले. पहाटे सर्वांनी श्री तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. त्यानंतर विजयवाड्यातील कन्यका देवीच्या मंदिरातही दर्शन घेऊन प्रार्थना करण्यात आली.

दरम्यान, या धार्मिक दौऱ्यामागे कोणताही अधिकृत राजकीय संदेश नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले नसले तरी संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

‘राम मंदिरातील देणग्यांवर दरोडा’; मोदी, RSS आणि ट्रस्टवर हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप, निष्पक्ष चौकशीची मागणी

Web Title: Shrikant shinde omraje nimbalkar tirupati balaji 11 km walk cabinet expansion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 09:16 PM

Topics:  

  • Mp Omraje Nimbalkar
  • Shrikant Shinde
  • Tirupati Balaji Temple

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.