Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ माजी मंत्र्याने केला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

श्रीमंत घराण्यात जन्माला येऊन देखील सिध्दारामजी यांच्यात कधीही अहंकार आला नाही. अनेक लोक वडिलांच्या नावावर फुशारक्या मारतात. मात्र, सिध्दारामजी यांनी कधीही बढाया मारल्या नाहीत, ते कायम जमिनीवर राहिले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 06, 2025 | 10:52 AM
काँग्रेसला मोठा धक्का; 'या' माजी मंत्र्याने केला शिवसेनेत प्रवेश

काँग्रेसला मोठा धक्का; 'या' माजी मंत्र्याने केला शिवसेनेत प्रवेश

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : श्रीमंत घराण्यात जन्माला येऊन देखील सिध्दारामजी म्हेत्रे यांच्यात कधीही श्रीमंतीचा दर्प आला नाही. त्यांच्यात अहंकार आला नाही. ते कायम जमिनीवर राहिले. तर अनेक लोक वडिलांच्या नावावर बढाया मारतात, फुशारक्या मारतात, असा सणसणीत टोला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. राज्याचे माजी मंत्री व काँग्रेसचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधु शंकर म्हेत्रे यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

अक्कलकोट येथे आयोजित केलेल्या जाहीरसभेत उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी मंत्री दादा भुसे, मंत्री संजय राठोड, विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे उपस्थित होत्या. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधु शंकर म्हेत्रे ही राम लक्ष्मणाची जोडी आहे. म्हेत्रे परिवाराला मोठी सामाजिक पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडिल सातलिंग्गपा म्हेत्रे इथलं मोठं प्रस्थ होतं. म्हेत्रे परिवाराने कधी जात धर्म पक्ष पाहिला नाही, आलेल्या माणसाचे काम केले. त्यामुळे इथल्या हिंदु मुस्लिम बांधवांचा म्हेत्रे परिवाराला कायम पाठिंबा राहिला आहे.

तसेच श्रीमंत घराण्यात जन्माला येऊन देखील सिध्दारामजी यांच्यात कधीही अहंकार आला नाही. अनेक लोक वडिलांच्या नावावर फुशारक्या मारतात. मात्र, सिध्दारामजी यांनी कधीही बढाया मारल्या नाहीत, ते कायम जमिनीवर राहिले. कार्यकर्त्यांचा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

काँग्रेसचा ‘हात’ सोडून हाती भगवा

गुरुवारी सिध्दारामजी यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. जिथे दिशा नाही तिथे दशा झाली, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसवर केली. सिध्दाराम म्हेत्रे अनुभवी आहेत. त्यांच्या नावात राम आहे. ते शिवसेनेत आल्याने आता सोलापूर, अक्कलकोट, दुधनीचे भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

विरोधकांचे सगळे तंबू रिकामे होतील

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड झाली, तेव्हा आम्ही सत्ता सोडली आणि राज्याने एक मोठा उठाव पाहिला. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही ते पाऊल उचलले. केवळ भारताच नव्हे तर जगातील ३३ देशांनी या उठावाची दखल घेतली. जनतेनेही या उठावाला प्रतिसाद दिला. आज शिवसेनेचे ६० आमदार आहेत. एक दिवस असा येईल की विरोधकांचे सगळे तंबू रिकामे होतील, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे.

Web Title: Siddharam mhetre left congress party and joins shivsena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 10:52 AM

Topics:  

  • Congress
  • Maharashtra Politics
  • political news
  • shivsena

संबंधित बातम्या

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”
1

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
3

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका
4

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.