बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा
बिहारमध्ये दोन टप्प्यात होणार मतदान
१४ नोव्हेंबरला लागणार बिहार विधानसभेचा निकाल
Bihar Assembly Election: काल केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. बिहार विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. तर १४ नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान निवडणुकीची घोषणा होताच बिहारच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर सुरू झाले आहे. लालू प्रसाद यादव यांनी ट्वीट करत एनडीएला डिवचले. तर एनडीएच्या नेत्यांनी देखील लालू यादव यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. बिहारमधील ज्येष्ठ नेते लालू प्रसाद यादव यांनी ‘छह और ग्यारह NDA नौ दो ग्यारह!’ अशी पोस्ट केली होती. म्हणजेच येणाऱ्या निवडणुकीचे एनडीएची सत्ता जाणार आहे. असा या पोस्टचा अर्थ काढला जात आहे. यावर आता एनडीएच्या नेत्यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले आहे.
छह और ग्यारह
NDA
नौ दो ग्यारह! — Lalu Prasad Yadav (@laluprasadrjd) October 7, 2025
एनडीएचे प्रत्युत्तर काय?
लालू प्रसाद यादव यांची पोस्ट म्हणजे त्यांना पराभवाची भीती त्यांना वाटत असल्याचे एनडीएच्या नेत्यांनी म्हटले. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत म्हटले, ‘लालू यादव यांनी कितीही प्रयत्न केले तरी बिहारची जनता एनडीएसोबत आहे. १४ नोव्हेंबरला जेव्हा निकाल येईल , त्या दिवशी बालदिन देखील आहे. तेव्हा लालू यादव यांना समजेल की ‘बच्चा, बच्चा ही रहता है’.
काय म्हणाले सतीश चंद्र दुबे?
केंद्रीय राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे म्हणाले, “६ आणि ११ या तारखेला दोन टप्प्यात मतदान होईल. तर १४ नोव्हेंबरला निकाल येईल. नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात बिहार विकासाकडे वाटचाल करेल. लालू यादव आणि तेजस्वी यादव ‘बालबुद्धी’चे राजकारण करत आहेत. मात्र जनतेचा विश्वास एनडीएवर आहे.
Bihar Election 2025: बिहारमध्ये आजपासून आचार संहिता लागू; कोणत्या कामांवर बंदी? उल्लंघन केल्यास…
बिहारमध्ये आचार संहिता लागू
केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. बिहारमध्ये दोन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तर 14 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान बिहारमध्ये आज निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे बिहारमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. आजपासून बिहारमध्ये आचार संहिता लागू झाली आहे. आचार संहितेचे उल्लंघन केल्यास निवडणूक आयोग कठोर कारवाई करते. राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्याकडून आचार संहितेचे उल्लंघन झाल्यास निवडणूक आयोग दंडात्मक कारवाई करू शकते. उमेदवाराच्या निवडणूक लढण्यावर देखील बंदी आणू शकते.