बिहारमध्ये यादव कुटुंबाला शिक्षा होणार? (फोटो -टीम नवराष्ट्र)
1. बिहारमध्ये लवरकच होणार विधानसभा निवडणूक
2. तेजस्वी, लालू आणि रबडी यादव यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश
3. आयआरसीटीसी भ्रष्टाचार प्रकरणात कोर्ट सूनवनर शिक्षा
Bihar Election 2025: लवकरच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्च पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान निवडणुकीआधीच लालू यादव, तेजस्वी यादव आणि रबडी यादव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आयआरसीटीसी घोटाळ्यात 13 ऑक्टोबर रोजी कोर्ट निर्णय देणार आहे.
आयआरसीटीसी घोटाळ्यात कोर्ट 13 ऑक्टोबर रोजी आरोपी निश्चित करणार आहे. या प्रकरणात लालू यादव, राबडी यादव आणि तेजस्वी यादव यांना सीबीआयने आरोपी केले आहे. 13 ऑक्टोबर रोजी राउज एव्हेन्यू कोर्ट शिक्षा सुनावणार आहे. कोर्टाने लालू यादव, राबडी यादव आणि तेजस्वी यादव यांना कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
आयआरसीटीसीशी संबंधित हॉटेल्सच्या देखभालीचे टेंडर देण्यात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी सीबीआयने आरोपपत्र दाखल केले. त्यामध्ये तेजस्वी यादव, लालू यादव आणि राबडी यादव यांच्या नावाचा देखील समावेश आहे. या प्रकरणात कोर्ट 13 ऑक्टोबरला निर्णय देणार आहे. कोर्ट नेमका काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लालू यादव, राबडी यादव आणि तेजस्वी यादव यांना देखील या प्रकरणात शिक्षा होणार का हे पहावे लागणार आहे. त्यांना शिक्षा झाल्यास त्याचा बिहार विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होणार हे देखील पाहणे आवश्यक आहे. तेजवी यादव यांना शिक्षा झाल्यास त्यांना निवडणूक लढवता येणार का हे देखील पहावे लागणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष हे कोर्टाच्या निकालाकडे लागले आहे. दरम्यान हा खटला चालवण्यासाठी सीबीआयकडे आवश्यक पुरावे नसल्याचे म्हणत या तिन्ही नेत्यांनी याविरुद्ध युक्तिवाद केला आहे.
काय आहे प्रकरण?
लालू प्रसाद रेल्वेमंत्री असताना आयआरसीटीच्या च्या हॉटेल्सचे कंत्राट देण्यात घोटाला केल्याच्या विषयाशी संबंधित हे प्रकरण आहे. सीबीआयने तेजस्वी यादव, लालू प्रसाद यादव आणि राबडी यादव यांच्याविरुद्ध फसवणूक, गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचाराचे आरोप दाखल केले आहेत.
CWC बैठकीत काय काय घडलं?
बिहार निवडणुकीपूर्वी काँग्रेस कार्यकारिणीची आज राजधानी पाटणा याठिकाणी बैठक पार पडत आहे. काँग्रेस कार्यकारिणीची ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, सलमान खुर्शीद आणि सचिन पायलट असे ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थित बैठक पार पडली.पटना येथील या बैठकीत काँग्रेस पक्ष बिहार विधानसभा निवडणुका आणि आरक्षण मर्यादा वाढविण्यासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर बिहारमधील काँग्रेस कार्यकारिणीची ही पहिलीच बैठक होती. विधानसभा निवडणुका पाहता, बिहार काँग्रेससाठी ही बैठक महत्त्वाची मानली जाते.