
Solapur Election 2026,Solapur Election Result 2026, Solapur Election Result 2026 Live Updates,
सोलापूर पश्चिम महाराष्ट्रातील १०२ संख्याबळ असलेली महत्वाची महापालिका आहे. या महापालिकेवर प्रदीर्घ काळ काँग्रेसचे पर्यायाने माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी वर्चस्व राहिले होते. शिंदे यांचे निकटवर्तीय विष्णुपंत कोठे यांनी महापालिकेच्या राजकारणावर पकड ठेवली. ‘कोठे बोले, सोलापूर हले’ अशी स्थिती होती. सन २०१४मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपाने सोलापूर महापालिकेकडे मोर्चा वळविला. सन २०१७ भाजपाने काँग्रेसच्या ताब्यातील महापालिकेची सत्ता हस्तगत केली. भाजपाने दुसऱ्यांदा सत्ता कायम ठेवण्यात यश मिळविले. (Municipal Election Result 2026)
महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपामध्ये उमेदवारीवरुन असंतोष निर्माण झाला होता. आयात उमेदवारांना उमेदवारी दिल्याने भाजपाचे माजी मंत्री सुभाष देशमुख व माजी मंत्री विजयकुमार देशमुख यांनी बंडाचा पवित्रा घेतला होता. पालकमंत्री जयकुमार गोरे पक्षाच्या निष्ठावंतांना डावलत असल्याची भावना दोन्ही देशमुखांची झाली होती. उमेदवार यादीवर आमदार देवेंद्र कोठे यांची छाप राहिली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपातील गटबाजी चव्हाट्यावर आली होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागला. दोन्ही देशमुख आमदार द्वयींना शांत करीत बंडखोरी मोडीत काढत काढण्यात फडणवीस यांची शिष्टाई कामी आली.
उमेदवारीवरुन भाजपात अंतर्गत धुसफूस सुरू असतानाच मनसेच्या पदािधकाऱ्यांची हत्या झाली. यावरून काँग्रेस, मनसेसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाजपाला लक्ष्य केले. पक्षांतर्गत नाराजी थोपविताना विरोधकांचा आरोप खोडून काढण्याचे आव्हान भाजपापुढे उभे राहिले. मात्र भाजपाने ‘मायक्रो प्लॅनिंग’ करीत निवडणुकीचा नूर पालटला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपाच्या शिर्षस्थ नेत्यांनी वेळीच ‘डॅमेज कंट्रोल’ केले. ‘शत-प्रतिशत’ नारा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी केलेले इन्कमिंग, पालकमत्र्यांसह शहरातील आमदार, पदाधिकाऱ्यांची बांधलेली मोट भाजपाच्या एकहाती विजयासाठी पुरक ठरली. (Municipal Eelction 2026)
BMC Election Result 2026: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना किती मिळते सॅलरी अन् सोयीसुविधा?
सोलापूर शहरात कोठे घराणे व पालिका समीकरण नेहमीच चर्चेत राहिले आहे. विष्णुपंत कोठे यांच्या वारसदारांनी पक्ष बदलले, मात्र आपला प्रभाव कायम राखला. गतवेळी विष्णूपंत कोठे यांचे पूत्र माजी महापैार महेश कोठे विरोधी पक्षनेते, विद्यमान आमदार देवेंद्र कोठे नगरसेवक, तर आमदारांच्या सासूबाई श्रीकांचना यन्नम महापौर असा सत्तेचा सिलसिला राहिला. या निवडणुकीत महेश काेठे यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे यांनी पालिकेच्या सभागृहात प्रवेश केला. काेठे घराणे पुन्हा केंद्रस्थानी राहिले आहे.
भाजपामध्ये महापौरपदासाठी रस्सीखेच राहणार आहे. महापौर निवडीत आमदार देवेंद्र कोठे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. आमदार कोठे गटाकडून माजी महापौर श्रीकांचना यन्नम, महेश कोठे यांचे पूत्र प्रथमेश कोठे , मेघनाथ येमूल यांची नावे, तर माजी मंत्री, आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र डॉ. किरण देशमुख यांचे नाव महापौर पदाच्या शर्यतीत आहे. देशमुख गटाकडून महापौरपदाचा दावा केला जाऊ शकतो.
BMC Election Result 2026: फूट आणि फटका, तरीही ठाकरेंचा झुंजार लढा; मुंबईतील ६५ जागांचा खरा अर्थ काय?
निवडणूक प्रचारात विमानतळ, आयटीपार्क, पाणीपुरवठा या मुद्द्यावरून भाजपाने काँग्रेसला कोंडीत पकडले. मावळत्या सभागृहात ४९ जागांवर असलेल्या भाजपाने या निवडणुकीत आपल्या जागा राखल्याच, शिवाय शिवसेना, काँग्रेसच्या ताब्यातील जागा हस्तगत केल्या.
भाजप ८७
एमआयएम ०८
शिवसेना शिंदे गट ०४
राष्ट्रवादी अजित पवार गट ०१
काँग्रेस : ०२
एकुण १०२