Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपमधील नाराजी, जुने राजकीय ऋणानुबंध आणि मतांची गणिते; वसंत देशमुखांच्या श्रीपूर भेटीमागे नेमके काय?

भाजपकडून उमेदवारीच्या शर्यतीत आघाडीवर असलेले, मात्र अखेर डावलले गेलेले प्रशांत परिचारक यांच्या श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्यावर वसंत देशमुखांनी अचानक हजेरी लावत स्व. सुधाकरपंत परिचारकांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले.

  • By विवेक
Updated On: Jun 04, 2026 | 09:42 PM
Solapur Vidhan Parishad election, NCP Sharad Pawar, Vasant Deshmukh, BJP leader Prashant Paricharak, BJP,

Solapur Vidhan Parishad election, NCP Sharad Pawar, Vasant Deshmukh, BJP leader Prashant Paricharak, BJP,

Follow Us
Follow Us:

पंढरपूर | शिवाजी हळणवर : सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे उमेदवार वसंत देशमुख यांनी केलेल्या एका भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांचा भडका उडाला आहे. भाजपकडून उमेदवारीच्या शर्यतीत आघाडीवर असलेले, मात्र अखेर डावलले गेलेले प्रशांत परिचारक यांच्या श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्यावर देशमुखांनी अचानक हजेरी लावत स्व. सुधाकरपंत परिचारकांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले. या भेटीमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

विधान परिषद निवडणुकीत आता भाजपचे राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत देशमुख यांच्यात थेट सामना रंगणार आहे. काँग्रेसचा अर्ज बाद झाल्यानंतर देशमुख हे आघाडीचे एकमेव उमेदवार ठरले. अर्ज माघारी घेण्याची मुदत संपताच देशमुखांनी थेट श्रीपूर गाठल्याने या भेटीचे राजकीय महत्त्व अधिक वाढले आहे.

देशमुख आणि परिचारक कुटुंबाचे संबंध नवे नाहीत. पंढरपूरच्या राजकारणात देशमुखांची सुरुवातच सुधाकरपंत परिचारक यांच्या सहवासातून झाली. पांडुरंग कारखान्यावर त्यांनी काही काळ उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. काळाच्या ओघात राजकीय वाटा वेगळ्या झाल्या, तरी सुधाकरपंतांविषयीचा आदर कायम असल्याचे या भेटीतून दिसून आले.

विशेष म्हणजे, भाजपच्या उमेदवारीसाठी राजेंद्र राऊत आणि प्रशांत परिचारक यांची नावे आघाडीवर होती. मात्र पक्षाने राऊत यांना उमेदवारी दिल्यानंतर परिचारक समर्थकांमध्ये नाराजीची भावना असल्याची चर्चा सुरू आहे. अशा वातावरणात देशमुखांनी परिचारकांच्या कारखान्यावर जाऊन अभिवादन केल्याने राजकीय समीकरणांच्या चर्चांना नवे खाद्य मिळाले आहे.

Mahayuti internal disputes: महायुतीत अंतर्गत धुसफूस उघड! सत्तारांनंतर संजय गायकवाड, नरेंद्र बोंडेकरांचा भाजपवर थेट निशाणा

सोलापूर विधान परिषद मतदारसंघातील ६१६ मतांपैकी मोठा हिस्सा माळशिरस तालुक्यात आहे. श्रीपूर परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदार, तसेच पंढरपूरमधील प्रभावी राजकीय संपर्क लक्षात घेता देशमुखांची ही भेट केवळ श्रद्धांजलीपुरती नसून निवडणूक रणनीतीचाही भाग असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

एकीकडे जुने राजकीय संबंध, दुसरीकडे मतांची बेरीज आणि त्यात भाजपमधील नाराजीचे समीकरण… या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर वसंत देशमुखांच्या एका भेटीने सोलापूर विधान परिषद निवडणुकीत नवा राजकीय ‘ट्विस्ट’ निर्माण केला आहे.

उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी तब्बल दीडशे कोटी रुपये खर्च, संजय राऊत यांचे महायुती सरकारवर गंभीर आरोप

Web Title: Solapur vidhan parishad election candidate from ncp sharad pawar party vasant deshmukh visit bjp leader prashant paricharaks sugar mill

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 09:42 PM

Topics:  

  • Solapur
  • Vidhan Parishad Election

संबंधित बातम्या

‘माऊली’च्या गजरात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात जल्लोषात स्वागत
1

‘माऊली’च्या गजरात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात जल्लोषात स्वागत

चार महिन्यांनंतर परिवहन समितीला मुहूर्त; २० जुलैला १२ सदस्यांची घोषणा, भाजपचे १०, एमआयएम व शिवसेनेला प्रत्येकी एक जागा
2

चार महिन्यांनंतर परिवहन समितीला मुहूर्त; २० जुलैला १२ सदस्यांची घोषणा, भाजपचे १०, एमआयएम व शिवसेनेला प्रत्येकी एक जागा

Solapur News : संत निवृत्तीनाथ महाराजांच्या माऊलींचा पालखी सोहळा आज जिल्ह्यात! जिल्हा प्रशासन सज्ज; वारकऱ्यांसाठी विविध सोयीसुविधा
3

Solapur News : संत निवृत्तीनाथ महाराजांच्या माऊलींचा पालखी सोहळा आज जिल्ह्यात! जिल्हा प्रशासन सज्ज; वारकऱ्यांसाठी विविध सोयीसुविधा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा धक्का! या भागातील लाखो महिलांचा 1500 रुपयांचा हप्ता बंद, काय आहे नेमकं कारण?
4

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा धक्का! या भागातील लाखो महिलांचा 1500 रुपयांचा हप्ता बंद, काय आहे नेमकं कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.