Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनिया गांधींचे पुस्तक फाडताच काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळ यांनी शिंदेसेनेला थेट दिले ‘हे’ आव्हान

सोनिया गांधी यांच्या पुस्तकावरून महाराष्ट्रात वाद निर्माण झाला असून शिंदेसेनेने पुस्तकाच्या प्रती फाडल्या आहेत. यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 18, 2026 | 03:06 PM
Sonia Gandhi book controversy: Congress leader Harshvardhan Sapkal's reaction

Sonia Gandhi book controversy: Congress leader Harshvardhan Sapkal's reaction

Follow Us
Follow Us:
  • शिंदेसेनेने सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राच्या प्रती फाडल्या
  • सोनिया गांधींचे पुस्तक फाडताच काँग्रेस आक्रमक
  • पुस्तकावरील वादावर हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली पहिली प्रतिक्रिया
 

Congress reaction on Sonia Gandhi book controversy : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव’ या पुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान झाल्याचा दावा शिंदेसेनेने केला आहे. यामुळे पत्रकार परिषद घेत त्यांनी सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या प्रती फाडल्या आहेत. यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव’ या पुस्तकाला जोरदार प्रतिसाद मिळत असून सर्वत्र या पुस्तकाची चर्चा आहे. मात्र यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान झाल्याचा दावा करत या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. यावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी इतिहास कोणी कितीही पुसण्याचा प्रयत्न केला तरी तो पुसला जाणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “सूर्यावर थुंकल्यावर ती थुंकी आपल्याच अंगावर पडते. इतिहास कोणी कितीही पुसण्याचा प्रयत्न केला तरी तो पुसला जाणार नाही. ही गद्दार गँग जी आहे, त्यांनी शिंदे सेनेच्या माध्यमातून राजकारणाचं विकृतीकरण केलय. त्यांनी 50 खोके एकदम ओके ही घोषणा महाराष्ट्राला दिली आहे.”

शिवसेना अन् काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी? सोनिया गांधींच्या पुस्तकाऐवजी फाडला बाळासाहेब ठाकरेंचाच फोटो

पुढे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, ही शिंदे शिवसेनेची मानसिक दिवाळखोरी आहे. ही संस्कृती नव्हतीच, विकृती होती. विकृतीचा टेंभा ते मिरवतायत. या लोकांकडून संस्कृतपणाची अपेक्षा करणे हेच व्यर्थ आहे. सोनिया गांधी यांनी एक आठवणीचा ठेवा देशासोबत शेअर केलाय. पुस्तकाचा खप प्रचंड होतोय. वर्ल्ड रेकॉर्ड होतोय. या पुस्तकाला फाडणं म्हणजे सूर्यावर पडदा टाकण्यासारखं आहे.”

शेतकऱ्यांसाठी DCM सुनेत्रा पवार आल्या धावून; राष्ट्रवादीच्या पक्षातील आमदारांनी घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

हर्षवर्धन सपकाळ हे शिंदेसेनेला आव्हान देत म्हणाले की, मला त्यांच्या बुद्धीची किव करावीशी वाटते. एकदा त्यांनी ते पु्स्तक वाचावं. त्यानंतर त्यावर चर्चा करावी, वाद-प्रतिवाद करावेत. त्यांना इंग्रजी येत नसेल. सभ्यता, संस्कृती समजून घ्यायची नसेल, हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. शिंदे शिवसेनेमध्ये एवढी हिम्मत असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे शिवसेने विरोधात जे निर्णय घेतले, त्या निर्णयाचे जीआर फाडून दाखवावेत,” असे थेट आव्हान सपकाळांनी दिले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सोनिया गांधी यांच्या पुस्तकावरून वाद का निर्माण झाला आहे?

    Ans: ‘Belonging: A Journey of Love’ या सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान झाल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाने केला आहे. या पार्श्वभूमीवर पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • Que: हर्षवर्धन सपकाळ यांनी शिंदेसेनेवर काय टीका केली?

    Ans: सपकाळ यांनी पुस्तकाच्या प्रती फाडण्याच्या कृतीला शिंदेसेनेची ‘मानसिक दिवाळखोरी’ असल्याचे म्हणत तीव्र शब्दांत निषेध केला. इतिहास कोणीही पुसण्याचा प्रयत्न केला तरी तो पुसला जाणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

  • Que: हर्षवर्धन सपकाळ यांनी शिंदेसेनेला काय आव्हान दिले?

    Ans: पुस्तक आधी वाचावे आणि त्यानंतर त्यावर चर्चा, वाद-प्रतिवाद करावा, असे आव्हान सपकाळ यांनी दिले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरोधात घेतलेल्या निर्णयांचे जीआर फाडून दाखवावेत, असेही त्यांनी म्हटले.

Web Title: Sonia gandhi book controversy congress leader harshvardhan sapkal reaction shivsena viral video nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • Harshvardhan Sapkal
  • political news
  • Sonia Gandhi

संबंधित बातम्या

शिवसेना अन् काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी? सोनिया गांधींच्या पुस्तकाऐवजी फाडला बाळासाहेब ठाकरेंचाच फोटो
1

शिवसेना अन् काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी? सोनिया गांधींच्या पुस्तकाऐवजी फाडला बाळासाहेब ठाकरेंचाच फोटो

‘मुंबई विकायला काढली आहे का?’; महापालिकेतील बैठकीनंतर किशोरी पेडणेकरांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
2

‘मुंबई विकायला काढली आहे का?’; महापालिकेतील बैठकीनंतर किशोरी पेडणेकरांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

शेतकऱ्यांसाठी DCM सुनेत्रा पवार आल्या धावून; राष्ट्रवादीच्या पक्षातील आमदारांनी घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय
3

शेतकऱ्यांसाठी DCM सुनेत्रा पवार आल्या धावून; राष्ट्रवादीच्या पक्षातील आमदारांनी घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

Jitendra Awhad : मुलगी नताशा आव्हाडला जितेंद्र आव्हाड समज देणार? पक्षाविरोधात भूमिका घेताच म्हणाले, “परत आल्यावर..,”
4

Jitendra Awhad : मुलगी नताशा आव्हाडला जितेंद्र आव्हाड समज देणार? पक्षाविरोधात भूमिका घेताच म्हणाले, “परत आल्यावर..,”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.