
Shiv Sena Shaina N. C. Balasaheb Thackeray tore the photo, video goes viral
Shaina N. C. tore up Balasaheb Thackeray’s photo : मुंबई : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव’ हे जोरदार चर्चेत आले आहे. एकीकडे पुस्तकाची चांगली विक्री सुरू असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. शिंदे गटाने पुस्तकाच्या प्रती फाडल्या असून यावेळी शिंदे सेनेच्या महिला नेत्या शायना एन. सी. यांच्याकडून गंभीर चूक झाली. अनावधानाने त्यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो फाडल्याचे दिसून आले आहे.
सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान होत असल्याचा दावा करत शिंदे सेनेने आक्रमक भूमिका घेतली. पत्रकार परिषद घेत त्यांनी तीव्र शब्दांत विरोध दर्शवला आहे. हा अपमान उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? असा प्रश्न शिंदे गटाच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे. तसेच शिंदेसेनेच्या नेत्यांनी पुस्तकाच्या प्रती फाडल्या. यावेळी शायना एन. सी. यांनी पुस्तकाचे पान समजून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला.
शायना एन. सी. यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडताच पेटलं राजकारण
शायना एन. सी. यांनी फोटो फाडल्याचे संजय निरुपण यांच्या लक्षात आले आणि त्यांनी लगेचच त्यांना चूक लक्षात आणून दिली. यानंतर शायना एन.सी यांनी फाडलेला फोटो बाजूला ठेवत पुस्तकाचे पान फाडले. तसेच त्यावेळी ‘सॉरी’ म्हणाल्याचे दिसून आले. मात्र त्यांच्याकडून बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्या गेल्याने राजकारण तापले आहे. याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
Balasaheb Thackeray ka photo phad diya 😳 https://t.co/MOQttacjHN — Azy (@Lazycontroll_) November 18, 2026
या घटनेनंतर शिवसेना व महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे काँग्रेस व शिवसेनेमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब भवन येथे पोलीस सुरक्षा वाढवण्यात येणार आहे.
‘मफलर मॅन’वरून रोहित पवारांचा फडणवीसांवर निशाणा; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं…
शायना एन. सी. यांनी अनावधानाने बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याने नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी कोण शायना असा प्रश्न विचारत शिंदे सेनेला धारेवर धरले. सचिन सावंत म्हणाले, कोण शायना एनसी? सावरकरांबद्दल त्यांना काय माहित आहे, इतिहासतज्ञ् कधीपासून झाल्या. कोणीतरी थोडीफार माहिती असणारा व्यक्ती असला पाहिजे. सावरकरांच्या नातवाने जे मान्य केलं, त्या पलीकडे काय सांगणार. न्यायालयात शिक्कामोर्तब झालं आहे. शिंदे गटाची कुठली विचारधारा माहिती नाही. त्यांची विचारधारा खोक्यापासून सुरु होते, खोक्यावर संपते अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Ans: सोनिया गांधी यांच्या ‘Belonging: A Journey of Love’ या आत्मचरित्रातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान होत असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाने केला आहे. त्यामुळे पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
Ans: पुस्तकाच्या प्रती फाडताना शायना एन. सी. यांनी पुस्तकाचे पान समजून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो अनावधानाने फाडला. चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी माफी मागितली.
Ans: काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी शायना एन. सी. यांच्यावर टीका करत सावरकरांच्या इतिहासाबाबत त्यांना काय माहिती आहे, असा सवाल केला. शिंदे गटाच्या भूमिकेवरही त्यांनी जोरदार टीका केली.