
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंची युती
युती जाहीर करताच मनसेला मोठा धक्का
राज्याच्या राजकारणात नव्या युतीचा जन्म
Thackeray Brothers Alliance: महाराष्ट्राच्या राजकारणात आज नव्या युतीचा जन्म झाला आहे. आगामी महापालिका निवडणुकांसाठी राज्यात नवीन समीकरणे दिसून येत आहेत. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी ठाकरे बंधु यांनी युती केली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली आहे. दरम्यान ठाकरे बंधु एकत्र येताच मनसेला मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाला आणि मनसेला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात आज नव्या युतीची सुरुवात झाली आहे. मात्र युतीची घोषणा होताच छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेला धक्का बसला आहे. मनसेचे जिल्हाप्रमुख यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे निवडणूक होण्याआधीच मनसेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे युती झाली असली तरी पक्षात सुरू असलेली गळती कशी थांबवली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनसेचे जिल्हाप्रमुख सुमित खांबेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत असून, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे म्हटले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुमित खांबेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे समोर येत आहे. 15 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणूक होणार आहे. त्याआधी मनसेला मोठा धक्का मानला जात आहे.
राज ठाकरेंकडून घोषणा
राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या ठाकरे बंधुंच्या युतीची अखेर आज घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा केली. मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत ही घोषणा करण्यात आली.
सुरूवातीला शिवसेना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. “आम्ही दोघेही आज इथे बसलो आहोत. आमचे आजोबा प्रबोधनकार संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत माझे वडील बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे या सर्वांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत संघर्ष केला. मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. त्याची आज आठवण होणे स्वाभाविक आहे. कारण मुंब महाराष्ट्राला मिळाल्यावर उपरे महाराष्ट्राच्या उरावर नाचायला लागले त्यावेळी न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म द्यावा लागला.