Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunetra Pawar’s ‘Letter Bomb: सुनेत्रा पवारांचा ‘लेटरबॉम्ब’! अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत वर्चस्वाचा नवा संघर्ष

या पत्रामुळे राष्ट्रवादीतील अतर्गत सत्तासघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. यापूर्वी रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर पक्ष ताब्यात घेण्याचा आरोप केला होता

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 26, 2026 | 01:59 PM
Sunetra Pawar News, Ajit Pawar Death News, NCP Internal Conflict, Election Commission of India

Sunetra Pawar News, Ajit Pawar Death News, NCP Internal Conflict, Election Commission of India

Follow Us
Close
Follow Us:
  • सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या एका पत्रामुळे नव्या वादाला तोंड फुटले
  • लेटरबॉम्बमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मोठी अस्वस्थता
  • राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्ता संतुलनात बदल होण्याच्या चर्चा तीव्र
Sunetra Pawar‘s ‘Letter Bomb: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असतानाच आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या एका पत्रामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्या या ‘लेटरबॉम्ब’ मुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली असून खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर दबाव वाढल्याची चर्चा रंगली आहे. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात २८ जानेवारी २०२६ नंतर पक्षाकडून झालेला कोणताही पत्रव्यवहार वैध मानू नये, अशी महत्त्वाची मागणी केली आहे. विशेष म्हणजे याच दिवशी अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर पक्षात झालेल्या सर्व निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

राष्ट्रवादीत अंतर्गत तणाव वाढला

या “लेटरबॉम्ब”मुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. पक्षातील वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर दबाव वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Narhari Zirwal Viral Video: नरहरी झिरवाळ आणि मुख्यमंत्र्यांची गुप्त भेट; वादग्रस्त ‘चित्रफीत’ प्रकरणाने राष्ट्रवादीत खळबळ

प्रफुल्ल पटेल, तटकरे यांना झटका?

या पत्रामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत सत्तासघर्षं पुन्हा उफाळून आला आहे. यापूर्वी रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर पक्ष ताब्यात घेण्याचा आरोप केला होता, त्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांचे हे पाऊल अधिकच महत्त्वाचे मानले जात आहे. दरम्यान, या पत्रामागील नेमका उद्देश काय, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादीतील राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा

पत्रानुसार, पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन २६ फेब्रुवारी २०२६ रोजी वरळी (मुंबई) येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे पार झाले होते. खासदार, आमदार आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. पक्षाच्या घटनेतील एक दुरुस्तीदेखील एकमताने मंजूर करण्यात आली. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कागदपत्रांमध्ये राष्ट्रीय अधिवेशनाचा तपशील, निवडून आलेल्या सदस्यांची यादी आणि पक्षाच्या घटनेची प्रत यांचा समावेश आहे.

Narhari Zirval Viral Video: मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल: Watch Video

ज्येष्ठ नेत्यांच्या वर्चस्वाला आव्हान

या पत्रानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्ता संतुलनात बदल होण्याच्या चर्चा तीव्र झाल्या आहेत. या निर्णयामुळे पक्षाच्या अंतर्गत समीकरणांवर परिणाम होऊ शकतो आणि ज्येष्ठ नेत्यांच्या वर्चस्वाला आव्हान दिले जाऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. परिणामी, महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय लढाई पाहायला मिळू शकते.

 

 

 

 

 

Web Title: Sunetra pawars letter bomb fresh crisis hits ncp after ajit pawars demise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Sunetra Pawar News: राष्ट्रवादीच्या नगसेवकांना निधी वाटपात भेदभाव, सुनेत्रा पवारांचे थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र; म्हणाल्या…
1

Sunetra Pawar News: राष्ट्रवादीच्या नगसेवकांना निधी वाटपात भेदभाव, सुनेत्रा पवारांचे थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र; म्हणाल्या…

NCP Politics:  सुनेत्रा पवारांनी मारले एका दगडात तीन पक्षी! राष्ट्रवादीच्या आर्थिक सत्तेचे केंद्र आता पवार माय-लेकांच्या हाती
2

NCP Politics: सुनेत्रा पवारांनी मारले एका दगडात तीन पक्षी! राष्ट्रवादीच्या आर्थिक सत्तेचे केंद्र आता पवार माय-लेकांच्या हाती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.