Narhari Zirval Viral Video: मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल
Narhari Zirval Viral Video: राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ पुन्हा एकदा कचाट्यात सापडले आहेत. नरहरी झिरवाळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये एक मंत्री झिरवाळ मांस आणि दारुचे सेवन करताना दिसत आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे झिरवाळ एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत. हा व्हिडीओ काल रात्रीपासून व्हायरल होत असल्याने राज्याचे राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हा संपूर्ण प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झाला असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडिओमध्ये झिरवाळ यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीचे नाव पवन यादव असे असून तो तृतीयपंथी असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकारानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
महाबळेश्वरच्या घाटात आमच्या एन्काउंटरचा पोलिसांचा होता डाव; जिल्हा परिषद सदस्यांचा आरोप
विरोधक आक्रमक, राजीनाम्याची मागणी
या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी झिरवाळ यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तातडीने राजीनाम्याची मागणी केली आहे. झिरवाळ यांच्यावर अशा प्रकारे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या कार्यालयातील एका लिपिकाला ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले होते. त्या वेळीही विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.
पवन यादवची गुन्हेगारी पार्श्वभूमी
व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या पवन यादवची पार्श्वभूमी देखील वादात सापडली आहे. मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. एका लोकप्रतिनिधीचे अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीसोबतचे व्हिडिओ समोर आल्याने सुरक्षेचा आणि नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.
पोटात कायमच जडपणा जाणवतो? अपचनाच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
या प्रकरणावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार टिका केली आहे. सोशम मीडियावर सपकाळ यांनी झिरवाळ यांच्यावर निशाणा साधला आहे. ” राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणे ही केवळ एक घटना नसून, महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. एक जबाबदार लोकप्रतिनिधी, ज्याच्यावर जनतेचा विश्वास आणि करदात्यांच्या पैशांची जबाबदारी आहे, त्याच्याकडून अशा प्रकारचे अश्लील आणि अनैतिक वर्तन होणे अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे. हा प्रकार केवळ व्यक्तीगत मर्यादांचा भंग नाही, तर सार्वजनिक जीवनातील नैतिकतेलाच काळिमा फासणारा आहे. जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या मंत्र्याने किमान नैतिकतेची चौकट तरी पाळावी, ही साधी अपेक्षा असते. मात्र, हा व्हिडिओ पाहता त्या अपेक्षांचा पूर्णपणे भंग झाल्याचे स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी कोणतीही विलंब न लावता नरहरी झिरवाळ यांची मंत्रीपदावरून तात्काळ हकालपट्टी करावी. #नरहरीझिरवाळ_राजीनामा_द्या” असं सपकाळ यांनी म्हटलं आहे.






