Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Porshe वरून राजकारण पेटलं! सुनील टिंगरेकडून शरद पवार यांना नोटीस; सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट

काही महिन्यांपूर्वी पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरण झाले होते. या प्रकरणामध्येस आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी केला असल्याचा आरोप करण्यात आला होता.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 09, 2024 | 10:25 AM
supriya sule on Pune Porsche Accident Case

supriya sule on Pune Porsche Accident Case

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरण देशभरामध्ये चर्चिले गेले. अल्पवयीन मुलाने केलेल्या या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता.  त्यानंतर अल्पवयीन आरोपीला दिलेल्या निबंध लिहिण्याच्या शिक्षेमुळे सर्वांनी नाराजी व्यक्त केली होती. यावरुन आता सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. “पोर्श प्रकरणात जर माझी बदनामी केली तर मी कोर्टात खेचेन, या आशयाची नोटीस वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पाठवली”, असा गौप्यस्फोट खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (दि.08) वडगावशेरी मतदार संघाचे उमेदवार बापू पठारे यांच्यासाठी सभा घेतली. या सभेत त्या बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “सर्व महत्त्वाचे प्रश्न सुषमा अंधारे यांनी त्यांच्या भाषणात सविस्तर मांडले. मला फक्त एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. कारण सुषमा अंधारे यांना देखील ती माहिती नाही. मागच्या वेळेस जेव्हा आम्ही आलो होतो. एका वेगळ्या व्यक्तीसाठी आम्ही तिकीट मागितली होती. असं काही होईल असं कोणाच्या ध्यानीमनी देखील आलं नव्हतं. ज्यांच्या एबी फॉर्मवर शरद पवारांची सही आहे. मागच्या वेळीच तिकीट शरद पवारांच्या सहीवर मिळालं. त्या व्यक्तीने काय केलं हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. ज्या पोर्शे कारचा उल्लेख सुषमा ताई तुम्ही केला. तुम्ही त्या प्रकरणात लढलात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कारण सुषमा अंधारे या पोलीस स्टेशनला बसलात. रवींद्र धंगेकर देखील तेथे होते”

हे देखील वाचा : Ajit Pawar म्हणाले, ‘त्यांच्यासारखे मोठे नेता’…PM मोदी करणार नाहीत बारामतीत प्रचार

पुढे त्या म्हणाल्या की, “ज्यांचा जीव गेला, त्यांच्या आई-वडिलांचे अश्रू अजूनही थांबलेले नाहीत. करोडो रुपयांची पोर्शे कार होती. त्या व्यक्तीला स्थानिक नेत्याने पिझ्झा खायला घातला. हे वास्तव आहे. याच्याबद्दल मीही बोलले, सुषमा ताई तुम्ही बोललात. यावर आदरणीय पवार साहेबही बोलले. सुषमाताई तुम्हाला कदाचित ही गोष्ट माहिती नसेल की, ज्या 80 वर्षांच्या योद्ध्याने त्यांच्या एबी फॉर्मवर सही केली. ज्यांच्यामुळे ते निवडून आले. त्यांनी आदरणीय पवार साहेबांना नोटीस पाठवली आहे की, पोर्श प्रकरणात जर माझी बदनामी केली तर मी कोर्टात खेचेन,” असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

हे देखील वाचा : हेच १५०० रुपये घेऊन बदलापूरला जा, नाही थोबाड फोडलं तर बघा; उद्धव ठाकरे लाडकी बहीण योजनेवरून असं का म्हणाले?

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी 100 वेळा त्या नेत्याला आव्हान करते. पोर्शे अपघातात ज्यांची हत्या झाली, त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी कृती केली, त्यांच्या मागे तुम्ही उभे राहिलात. हिंमत असेल तर सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर, सुषमा अंधारेंना देखील नोटीस पाठवा. आम्ही लढू कारण आम्हाला कोणाची भिती नाही. आम्हाला माहिती नाही, आम्ही सत्याच्या बाजूने आहोत,” असे ठाम मत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.

 

Web Title: Supriya sule disclosure sunil tingre notice to sharad pawar in porsche accident case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2024 | 10:25 AM

Topics:  

  • Pune Accident Case
  • supriya sule
  • sushma andhare

संबंधित बातम्या

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत अडकले पुण्यातील २४ पर्यटक; सुप्रिया सुळेंकडून बेपत्ता पर्यटकांची नावांची यादी जाहीर
1

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत अडकले पुण्यातील २४ पर्यटक; सुप्रिया सुळेंकडून बेपत्ता पर्यटकांची नावांची यादी जाहीर

कलंकित नेत्यांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर कोण? उपनेत्या सुषमा अंधारे यांनी स्पष्टच सांगितलं
2

कलंकित नेत्यांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर कोण? उपनेत्या सुषमा अंधारे यांनी स्पष्टच सांगितलं

Manikrao Kokate: “संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ …”; ‘शासन भिकारी’वरून सुप्रिया सुळेंची कोकाटेंवर सडकून टीका
3

Manikrao Kokate: “संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ …”; ‘शासन भिकारी’वरून सुप्रिया सुळेंची कोकाटेंवर सडकून टीका

Pune Accident News : एकाच ठिकाणी 3 तासात तब्बल 10 अपघात; अपघाताला जबाबदार कोण?  स्थानिकांचा संतप्त सवाल
4

Pune Accident News : एकाच ठिकाणी 3 तासात तब्बल 10 अपघात; अपघाताला जबाबदार कोण? स्थानिकांचा संतप्त सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.