हेच १५०० रुपये घेऊन बदलापूरला जा, नाही थोबाड फोडलं तर बघा; उद्धव ठाकरे लाडकी बहीण योजनेवरून असं का म्हणाले?
राज्यात विधानसभा निवडणुकींचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. महायुतीकडून लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार सुरू आहे. याच लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंनी महायुतीला आज टोला लगावला आहे. राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न आणि बदलापूर प्रकरणावरून जालन्यातील प्रचारसभेतून उद्धव ठाकरेंनी महायुतीवर निशाणा साधला. आपण तिघे भाऊ भाऊ, सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ. तुम्हाला लाज लज्जा शरम नावाची बाब थोडीफार राहिली असेल तर १५०० रुपये घेऊन बदलापूरला जा. नाही थोबाड फोडलं तर मला विचारा, असा टोला लगावला आहे.
हेही वाचा-Nana Patole : ‘ब्लू फिल्मचं काम चालणारी बदलापूरची ती शाळा RSS शी संबंधित’ : नाना पटोलेंचा गंभीर आरोप
संपूर्ण महाराष्ट्रात आता मशाल धगधगत असून हे खोके सरकार आहे. मी मात्र जनतेच्या न्यायालयात आलो आहे. गेली दोन वर्ष झाले, तारीख पे तारीख सुरू आहे. सरन्यायाधीश आता निवृत्त झाले आहेत. निकाल कधी मिळणार आहे की नाही? न्याय म्हणून काही गोष्ट या देशात आहे की नाही? संविधानाप्रमाणे आम्हाला न्याय का मिळत नाही? राज्यपालांनी बोलावलेलं अधिवेशन बेकायदा होतं हे तुम्हाला माहीत आहे. म्हणून मी तुमच्याकडे न्याय मागायला आलो आहे.
आज अमित शहा यांची प्रचार सभा झाली. माझ्या शिवसेनेला नकली म्हणतात. पण पराभवाची गॅरंटी म्हणजे अमित शहा. अमित शहा देशाच्या गृहमंत्रिपदावर राहू शकतात का? हे गद्दार पळाले होते, मात्र औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर कोणी केलं? आपण केलं, माझ्यावर टीका करण्याच्या आधी तुमच्या बुडाखाली काय पेंडिंग आहे ते बघा, अशा शब्दात ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर तोफ डागली.
७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप अजित पवार यांच्यावर नरेंद्र मोदींनी केला होता. आता त्यांचा प्रचार करतात. ज्या तोंडाने आरोप केले, त्याच तोंडाने सांगतात अजित पवार किती चांगले आहेत. आपलं हिंदुत्व घरातलं चूल पेटवणारं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हृदयात राम आणि हाताला काम असं आहे, असंही ते म्हणाले आहेत.
आज एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. उद्धव ठाकरे यांची मशाल क्रांतीची नसून घराघरात आग लावणारी आहे. अडीच वर्षात त्यांनी केवळ विकासकामांना स्थिगिती देण्याचं काम केलं, असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला होता धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाची आण बान शान नियतीने आपल्यावर सोपवली आहे. उस्मानाबादच नामकरण धाराशिव करण्याच भाग्य आल्याला मिळाल्याचं म्हटलं होतं. पूर्ण बहुमताचं सरकार आणल्यानंतर उस्मानाबादच धाराशिव आणि औरंगाबादच छञपती संभाजीनगर नामकरण करून बाळासाहेबाचं स्वप्न पूर्ण केल्याचं त्यांनी म्हटलं होतं.