Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 8 खासदार सोमवारी प्रधानमंत्री मोदींची घेणार भेट; नेमकी काय चर्चा होणार?

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे 8 खासदार सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रातील पाणीप्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

  • By विवेक
Updated On: Aug 08, 2026 | 04:29 PM
Supriya Sule

Supriya Sule

Follow Us
Follow Us:
  • सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 8 खासदार PM मोदींची भेट घेणार
  • महाराष्ट्रातील पाणीप्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा
  • मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या पार्श्वभूमीवर भेटीला राजकीय महत्त्व
 

राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी सोमवारी होणाऱ्या महत्त्वपूर्ण भेटीची माहिती दिली आहे. सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे आठ खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. सोमवारी सकाळी 11 वाजता ही भेट होणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महाराष्ट्रासमोर सध्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर विकासाशी संबंधित अनेक प्रश्न आणि मतदारसंघातील विविध प्रलंबित मुद्दे खासदारांच्या माध्यमातून केंद्रासमोर मांडायचे आहेत. याच विषयांवर पंतप्रधान मोदी यांच्यासोबत चर्चा केली जाणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

मोदींसोबतच्या भेटीला राजकीय महत्त्व

सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आठ खासदारांची पंतप्रधान मोदींसोबत होणारी भेट केवळ महाराष्ट्रातील प्रश्नांपुरती मर्यादित राहणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः आगामी मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे महत्त्वाने पाहिले जात आहे.

‘Gen Z शी बोलण्याआधी अमित शाहांचा राजीनामा घ्या’; उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांना खोचक टोला

लोकसभा आणि राज्यसभेत घटनादुरुस्तीशी संबंधित प्रस्तावांना आवश्यक बहुमत मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याची राजकीय चर्चा आहे. मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यास देशातील लोकसभा मतदारसंघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवीन जनगणनेच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना

सध्या लोकसभा मतदारसंघांच्या जागांचे वाटप 1971 च्या जनगणनेतील आकडेवारीच्या आधारे करण्यात आले आहे. त्यानंतरच्या काळात देशाची लोकसंख्या, राज्यांची लोकसंख्यात्मक रचना आणि सामाजिक परिस्थितीत मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे भविष्यातील मतदारसंघ पुनर्रचनेत नवीन जनगणनेची आकडेवारी महत्त्वाची ठरणार आहे.

पुनर्रचना प्रक्रिया झाल्यास नवीन आयोगाच्या माध्यमातून मतदारसंघांच्या सीमा निश्चित करणे आणि विविध राज्यांमधील लोकसभा जागांचे पुनर्वाटप करण्याची प्रक्रिया होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांतील राजकीय समीकरणांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray PC: आता इन्स्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ! ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती हल्ला

अशा पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आठ खासदारांची पंतप्रधान मोदींसोबत होणारी भेट आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. असे असले तरीही सुप्रिया सुळे यांनी मात्र हि भेट महाराष्ट्राच्या विकासकामांसाठी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title: Supriya sule ncp sharad pawar faction mps meet pm modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 04:29 PM

Topics:  

  • NCP Sharad Pawar
  • PM Narendra Modi
  • supriya sule

संबंधित बातम्या

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा
1

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
2

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात
3

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात

Sindhudurg News : सावंतवाडीत ‘सेवा संकल्प अभियान’ला सुरुवात; आरोग्य तपासणीसह नागरिकांसाठी विविध उपक्रम
4

Sindhudurg News : सावंतवाडीत ‘सेवा संकल्प अभियान’ला सुरुवात; आरोग्य तपासणीसह नागरिकांसाठी विविध उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.