sushma aandhare bhaskar jadhav target ramdas kadam on balasaheb thackeray dead body politics
Ramdas Kadam On Balasaheb Thackeray Dead body : मुंबई : शिवसेनेच्या दोन्ही गटाने मोठ्या उत्साहामध्ये दसरा मेळावा घेतला. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर जोरदार निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यामध्ये शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी गंभीर दावा केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाचा विषय काढून कदम यांनी राजकीय वर्तुळामध्ये नवीन वादाची ठिणगी टाकली. मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस का ठेवण्यात आला असा गंभीर सवाल उपस्थित करत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केले आहेत. यामुळे आता उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांनी देखील रामदास कदम यांचा खरपूस समाचार घेतला.
ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी जोरदार टीकास्त्र डागले. ते म्हणाले की, “रामदास कदमांचा उल्लेख ‘बारदास कदम’ असा उल्लेख केला. कदमांसारख्या श्वानांना आपण किंमत देत नाही. रामदास कदम तुला मुंबईच्या नगरसेवकांमधून दोन वेळा उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर पाठवलं. मुंबईकरांसाठी काय तुम्ही काय केलं, असा सवालही भास्कर जाधवांनी केला. बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्याचा आव आणायचा हे बामदास कदम, महिलांना नाचवून त्याच्यावर कमाई करणाऱ्यांना भXXXXX म्हणतात, अशा लोकांकडून दुसरी काही अपेक्षा नसल्याचे म्हणत भास्कर जाधव यांनी जोरदार टीकास्त्र डागलं.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तिकीट मागण्याची लाचारी
याचरोबर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. सुषमा अंधारे म्हणाल्या की, “कदमांचं कोकणातलं अस्तित्व नामशेष होत चाललंय. कदमांच्या पोरानं कदमाची सर्व घालवली. आईच्या नावे डान्सबार सुरू केलाय. सतत टक्केवारीचा राजकारण. कोकणात मी सुद्धा आहे हे आटापिटा करण्याच्या नादात कदमांच ते स्टेटमेंट आलं. कदम यांना हे आधी कळत नव्हतं का? इतके दिवस ते का गप्प होते? मंत्रीपद का भोगली? कदम आणि आपल्या पोराची तिकीट मागण्याची लाचारी का केली? कदम यांचा खरेपणा इतके दिवस कुठे गेला होता?. उदय सामंत यांच्यापेक्षा मी तुमच्या पेक्षा कसा जास्त वफादार आहे. हे त्यांना दाखवून द्यायचं होतं,” अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले रामदास कदम?
पत्रकार परिषद घेत रामदास कदम म्हणाले की,“मी हे स्पष्टपणे सांगतो की आणि हे मी जबाबदारीने सांगतो. दोन दिवस शिवसेनाप्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला हे मी सांगतो. हे मी खूप जबाबदारीने सांगतो. होऊन जाऊ दे एकदा. उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट होऊन जाऊ दे. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ दे. हिम्मत असेल तर उद्धव ठाकरे यांनी माझ्यासमोर यावं आणि मी खोटं बोलतोय असं सांगावं. उद्धव ठाकरे हे कपटी आहेत. मी त्यांना सांगितलं की बाळासाहेब ठाकरे यांच्या पायांचे ठसे घेऊन ठेवा, आमचे ते दैवत आहेत. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की त्यांचे हाताचे ठसे घेऊन ठेवले आहेत मी. हे संभाषण डायरेक्ट उद्धव ठाकरे आणि माझ्यामधील संवाद आहे. त्या हातांच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला ते आम्हाल सांगा,”असा आरोप शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.