Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sushma Andhare News: बंडखोर खासदारांचे पत्र कालच लोकसभा अध्यक्षांपर्यंत पोहोचले”; सुषमा अंधारेंचा खळबळजनक दावा

गेले काही दिवस चर्चा सुरू होत्या,काही लोक गट तयार करत आहे अशा चर्चा होत्या भाजप ने ठरवले प्रत्येक प्रादेशिक पक्षातील काही लोक वेगळे करणे गट तयार करायचा आणि त्यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा द्यायचा, डी लिमिटेशन बील नामंजूर झाल्यानंतर भाजप सूडानी आणि पेटलेले आहे

  • By anuradha sagar
Updated On: Jun 17, 2026 | 02:19 PM
Sushma Andhare Pune press conference Today, ShivSena Crisis, Maharashtra Politics,

Sushma Andhare Pune press conference Today, ShivSena Crisis, Maharashtra Politics,

Follow Us
Follow Us:
  • संसदेतील बैठकीपूर्वीच व्हीप अयोग्य ठरल्याची सुषमा अंधारे यांची माहिती
  • डी-लिमिटेशन बिल नामंजूर झाल्याने भाजप सुडाने पेटलाय
  • भाजप कडून ‘साम-दाम-दंड-भेद’ आणि स्वायत्त संस्थांच्या गैरवापर
Shivsena Rebel MPs Letter Lok Sabha Speaker latest news: शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असून त्यांपैकी चार खासदार दिल्लीतही दाखल झाले आहेत. दिल्लीत जाऊन ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. सहा खासदारांच्या पाठिंब्याचे पत्र त्यांना सादर केले जाणार आहेत. पण बंडखोर खासदारांच पत्र कालच ओम बिर्ला यांच्यापर्यंत पोहचलं होतं,” असा दावा शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाच्या महिला प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्या पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

बंडखोर खासदारांसाठी उद्या सकाळी ११ वाजता संसदेतील शिवसेनेच्या संसदीय कार्यालयात बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक सर्व खासदारांसाठी अनिवार्य करण्यात आली असून बैठीकाल गैरहजर राहण्यांविरोधात व्हीप बजावण्यात आला आहे. मात्र, आता याबाबत सुषमा अंधारे यांनी मोठी माहिती दिली.

‘मैदानावर जाते’ म्हणत घराबाहेर पडली, काही तासांत शिक्षिकेचा मृतदेह सापडला; छ. संभाजीनगरात खळबळ

बंडखोर खासादारांसाठी उद्या सकाळी ११ वाजता संसदेतील शिवसेनेच्या संसदीय कार्यालयात बैठक बोलावण्यात आली असून ती अनिवार्य करण्यात आली आहे. त्या बैठकीला गैरहजर राहण्याविरोधात व्हीप बाजपण्यात आला आहे. यासंबंधी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, “बंडखोर खासदारांचे पत्र कालच लोकसभा अध्यक्षांपर्यंत पोहचलं होतं. आम्ही आज व्हीप बजावला, त्यामुळे आमचा व्हीप अयोग्य ठरला.

गेले काही दिवस चर्चा सुरू होत्या,काही लोक गट तयार करत आहे अशा चर्चा होत्या भाजप ने ठरवले प्रत्येक प्रादेशिक पक्षातील काही लोक वेगळे करणे गट तयार करायचा आणि त्यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा द्यायचा, डी लिमिटेशन बील नामंजूर झाल्यानंतर भाजप सूडानी आणि पेटलेले आहे. सुडाने पेटलेल्या भाजपने आपमधून राघव चड्ढा यांना बाजुला केले. तृणमूल काँग्रेसमधून एक गट वेगळा केला. हे करताना साम दाम दंड भेद सगळे केले, राजकारणाचा होता नव्हता तेवढा स्तर संपवला, लोकशाही संपवली.

पण आता पक्ष नेतृत्त्वावर टीका कराल, पण ज्यांना पक्ष नेतृत्त्वावर टिका करावीशी वाटते, त्यांनी उत्तर द्यावे, मग  ममता बॅनर्जी, शरद पवार, अरविंद केजरीवाल यांची काय चूक होती, चूक एवढची होती की ते प्रत्येकजण स्वतःची प्रादेशिक अस्मिता जपत होते आणि त्यांच्या प्रदेशातील मुद्द्यांना मुख्य प्रवाहात आणून चर्चा घडवण्याचा प्रयत्न करत होते. ज्यांना स्वार्थ नडला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत वा आमच्याकडे आला तर फंड कमी पडू देणार नाही, निधी उपलब्ध करून देऊ, या सगळ्यांनी अशी आर्थिक उंदीर केली जाते स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जातो

Who is IPS P. Sundarraj: नक्षलवाद्यांचा थरकाप उडवणारे डॅशिंग आयपीएस पी. सुंदरराज कोण आहेत?

निधी आणि केंद्रीय संस्थांच्या वापराबाबत आरोप

भाजपमध्ये प्रवेश केल्यास निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी आमिषे दाखवली जातात. “आमच्याकडे या, आम्ही फंड उपलब्ध करून देऊ, अशा प्रकारची आर्थिक प्रलोभने दिली जात आहेत. स्वायत्त संस्थांचा देखील राजकीय हेतूंसाठी गैरवापर केला जात आहे.”

दिल्लीतील हालचालींवरून संशय

ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत निर्माण झालेल्या संभ्रमावर बोलताना अंधारे यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू होती. काल रात्री पुण्यातून एक चार्टर विमान दिल्लीला गेले. या विमानाच्या हालचालींचे नेतृत्व माजी मंत्री तानाजी सावंत करत होते. त्यांनी नानासाहेब पाटील, अमित शिरसागर, जयराजे निंबाळकर आणि ओमराजे निंबाळकर दिल्लीला गेले. हे अचानक नव्हते. १० जूनला दिल्लीत NDA ची बैठक झाली. त्यानंतर त्याच हॉटेलमध्ये या सर्वांची बैठक झाली.

ओमराजे निंबाळकर यांच्याशी संबंधित एका प्रकरणाचा निकाल २० तारखेला अपेक्षित असल्याचे नमूद करत, त्या संदर्भात काही राजकीय आश्वासने देण्यात आली आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

“टीमचा कॅप्टन संजय देशमुख, उपकर्णधार नागेश पाटील अष्टीकर”

ऑपरेशन टायगरमागे कार्यरत असलेल्या गटाचा उल्लेख करताना अंधारे म्हणाल्या की, “या टीमचे कॅप्टन संजय देशमुख असून नागेश पाटील अष्टीकर हे उपकर्णधार आहेत.” नागेश पाटील यांनी स्वतः काही नेत्यांशी संपर्क साधून मदतीची विनंती केल्याचा दावाही त्यांनी केला.

Sanjay Raut : ‘पक्ष सोडायचा असेल तर आधी…’, शिवसेना UBT सोडणाऱ्या खासदारांना संजय राऊतांचा इशारा

शिवसैनिकांना जाब विचारण्याचा अधिकार

शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना मिळालेले मतदान हे शिवसैनिकांच्या मेहनतीमुळे मिळाले असल्याचे सांगत अंधारे म्हणाल्या की, “शिवसैनिकांना आपल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या विश्वासावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे.”

भाजपकडे स्वतःचे नेते निर्माण करण्याची क्षमता नसल्याने शिवसेनेतील नेत्यांवरच त्यांची नजर असल्याचा आरोपही त्यांनी केला.

फडणवीस आणि बावनकुळे यांच्यावर निशाणा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना अंधारे म्हणाल्या की, “महाराष्ट्रातील एखादा मराठी माणूस पुढील वीस वर्षांत पंतप्रधान होऊ शकतो, मात्र मुख्यमंत्रीपदासाठी तयार केलेला भस्मासूरच आज तुमच्या डोक्यावर बसला आहे. तसेच भाजपमध्ये फडणवीस यांचे राजकीय महत्त्व कमी होत चालल्याचा दावा करत त्यांनी भविष्यात त्यांच्या मुख्यमंत्रीपदालाही धोका निर्माण होऊ शकतो, असे म्हटले.

 

Web Title: Sushma andhare claims rebel mps letter reached lok sabha speaker

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • sushma andhare

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.