नेमकं काय घडलं?
आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव रेणुका शांताराम गांगुर्डे (वय २७) असे आहे. ती मूळची स्थानिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील शिवारे येथील रहिवासी होती. उच्च शिक्षणासाठी ती तीन वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे आली होती. तिने एम.पी.एड.चे शिक्षण पूर्ण केले होते आणि शहरातील शारदा मंदिर कन्या प्रशालेत सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत होती.
रेणुकाचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या अत्यंत प्रतिकूल परिस्थिती जीवन जगत होते. तिचे आई- वडील आणि भाऊ गावात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होती. कठीण परिस्थितीवर मात करत तिने शिक्षण पूर्ण केले आणि शिक्षिकेची नोकरी मिळवली होती. सोमवारी सायंकाळी सुमारे सहाच्या दरम्यान काही नागरिक गोगाबाबा टेकडीवर ट्रेकिंगसाठी गेले तेव्हा एका लिंबाच्या झाडाला तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच बेगमपुरा आणि छावणी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
अत्यंत काळजीपूर्वक मृतदेह खाली आणला
डोंगराच्या उंच भागात घटनास्थळ असल्याने रुग्णवाहिका पोहोचू शकत नव्हती. त्यामुळे रुग्णवाहिका पायथ्याशी उभी करून दोन किलोमीटरचा कठीण डोंगराळ मार्ग पायी पार करून मृतदेह स्ट्रेचरवर ठेवला आणि अत्यंत काळजीपूर्वक खाली आणला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तेव्हा त्यांना पॅन कार्ड, शाळेचे ओळखपत्र आणि मोबाईल फोन मिळून आला. या कागदपत्रांच्या आधारे तिची ओळख निश्चित करण्यात आली. याची माहिती तिच्या कुटुंबियांना देण्यात आले. माहिती मिळताच नाशिकहून तिचे आई- वडील आणि नातेवाईक छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचले. घाटी रुग्णालयात त्यांनी केलेला आक्रोश उपस्थितांना पाहून हेलावून गेला.
कुटुंबीयांची केली विचारपूस
घटनेच्या एका दिवस आधी रेणुकाने आपल्या लहान भावाला फोन करून आई- वडील आणि कुटुंबीयांची विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी दुपारी ती “मैदानावर सरावासाठी जात आहे,” असे सांगून राहत्या ठिकाणाहून बाहेर पडली होती. मात्र, त्यानंतर ती गोगाबाबा टेकडीवर गेली आणि तेथे लिंबाच्या झाडाला गळफास घेतले.
आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास करत आहे. अत्यंत संघर्षमय परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून रेणुका शिक्षिका बनली होती. या घटनेने कुटुंबीयांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
Ans: रेणुका शांताराम गांगुर्डे असे तिचे नाव होते.
Ans: त्या छत्रपती संभाजीनगरातील शारदा मंदिर कन्या प्रशालेत सहाय्यक शिक्षिका होत्या.
Ans: पोलिसांना तिची बॅग, पॅन कार्ड, शाळेचे ओळखपत्र आणि मोबाईल फोन आढळून आला.






