Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Political News : सुषमा अंधारेंनी अभिनेत्री प्राजक्ता माळीला धरले धारेवर; “महिला अत्याचारावर ब्र शब्द नाही अन्…

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे जोरदार कौतुक केले. मात्र यावरुन ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 17, 2026 | 01:00 PM
sushma andhare target actress prajakta mali for praise cm devendra fadnavis

sushma andhare target actress prajakta mali for praise cm devendra fadnavis

Follow Us
Follow Us:

Maharashtra Politics : मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री आणि लाखो चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali) ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनेकदा राजकीय नेत्यांची टीका आणि कार्यक्रमांमुळे चर्चेत असलेली प्राजक्ता माळी ही एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महिलांचा आदर्श करण्यामध्ये अग्रस्थानी असल्याचे म्हणत स्तुतीसुमने उधळली. मात्र यावरुन ती विरोधकांच्या निशाण्यावर आली आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीवर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) निशाणा साधला आहे.

नारी शक्ती वंदन कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील सहभागी झाली होती. यावेळी संबोधताना प्राजक्ताने मुख्यमंत्री फडणवीसांचे तोंड भरुन कौतुक केले. ती म्हणाली की ,”भोंदूबाबा प्रकरण मुख्यमंत्री यांनी अत्यंत कठोरपणे हाताळलंय, महाराष्ट्रातील प्रत्येकानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिकलं पाहिजे, महिलांचा सन्मान कसा केला पाहिजे हे शिकलं पाहिजे…” पुढे ती म्हणाली की, “मी आवर्जुन उल्लेख करेल. आता महाराष्ट्रात जे काही घडत आहे, भोंदूबाबामुळे जे काही चाललेलं आहे, अतिशय संवेदनशीलतेने मुख्यमंत्र्यांनी हा प्रकार हाताळला आहे. म्हणजे, जिथे बापाप्रमाणे कठोर व्हायला पाहिजे, तिथे ते कठोर होतात. जिथे आईचं ममत्व पाहिजे, तिथे त्या पद्धतीनं त्या गोष्टी हाताळतात…”

हे देखील वाचा : “BJP ने काही भुंकणारी कुत्री पाळली आहेत…: MP संजय राऊतांचे निशिकांत दुबेंवर टीकास्त्र

“त्याचबरोबर ते जेव्हा माईकवर बोलतात. विशेषतः जेव्हा जेव्हा आपण त्यांना टीव्हीवर ऐकतो, पाहतो. तेव्हा त्यांच्यावर कितीही चिखलफेक होत असली, ट्रोलिंग होत असलं तरीही त्यांच्या वाणीतून कधीही चुकीचा शब्द बाहेर पडलेला नाही. मी आजपर्यंत कधीच ऐकला नाही. अहो चुकीचा शब्द सोडा त्यांचा सूर कधी ढळलेला मी पाहिला नाही…”, अशा शब्दांत अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरुन कौतुक केले. मात्र यावरुन विरोधकांनी टोला लगावला आहे.

हे देखील वाचा : नाशिक धर्मांतर प्रकरण! अखेर फरार निदा खान आली समोर, “मी प्रेग्नंट आहे” म्हणत न्यायालयाकडे मागितला दिलासा

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन निशाणा साधला. सुषमा अंधारे यांनी लिहिले आहे की, प्राजक्ताजी तुम्ही हास्य जत्रेच्या निवेदिका आहात आणि हा कार्यक्रम आम्ही आवडीने बघतो. पण राज्यातल्या एकूण महिला लैंगिक शोषणाच्या एकाही प्रश्नावर ब्र शब्द न करणाऱ्या तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या ब्रँडिंग वर बोलायला लागलात तर हास्यजत्रे मधल्या स्कीट पेक्षा सुद्धा ते जास्त हास्यास्पद वाटायला लागेल… अशी घणाघाती टीका सुषमा अंधारेंनी केली आहे.

प्राजक्ताजी तुम्ही हास्य जत्रेच्या निवेदिका आहात आणि हा कार्यक्रम आम्ही आवडीने बघतो.
पण राज्यातल्या एकूण महिला लैंगिक शोषणाच्या एकाही प्रश्नावर ब्र शब्द न करणाऱ्या तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या ब्रँडिंग वर बोलायला लागलात तर हास्यजत्रे मधल्या स्कीट पेक्षा सुद्धा ते जास्त… pic.twitter.com/kWAjeYkDYm
— SushmaTai Andhare (@andharesushama) April 16, 2026

Web Title: Sushma andhare target actress prajakta mali for praise cm devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • prajakta mali
  • sushma andhare

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘राहुल गांधींनी भाजपाची झोप उडवली’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार, ‘Get Well Soon’ म्हणत लगावला टोला
1

Maharashtra Politics: ‘राहुल गांधींनी भाजपाची झोप उडवली’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार, ‘Get Well Soon’ म्हणत लगावला टोला

Manoj Jarange Patil: …तर मराठे शिंदेंना..; मनोज जरांगे पाटलांची जीभ घसरली
2

Manoj Jarange Patil: …तर मराठे शिंदेंना..; मनोज जरांगे पाटलांची जीभ घसरली

Cyber Crime: सायबर फसवणुकीला बळी पडू नका! ‘डिजिटल अरेस्ट’बाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
3

Cyber Crime: सायबर फसवणुकीला बळी पडू नका! ‘डिजिटल अरेस्ट’बाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Sushma Andhare News:  जिल्हा शल्यचिकित्सकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही? ; सुषमा अंधारे आक्रमक
4

Sushma Andhare News:  जिल्हा शल्यचिकित्सकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही? ; सुषमा अंधारे आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.