Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या कामाला मिळणार गती; आमदार सुनील शेळके यांनी दिले आश्वासन

 तळेगाव-चाकण-शिक्रापूर या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या रुंदीकरण व सुधारणा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास येणार आहे. याबाबत आमदार सुनील शेळके यांनी आश्वासन दिले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 23, 2025 | 04:51 PM
Talegaon-Chakan-Shikrapur road project MLA Sushil Shelke assures

Talegaon-Chakan-Shikrapur road project MLA Sushil Shelke assures

Follow Us
Close
Follow Us:

वडगाव मावळ : तळेगाव-चाकण-शिक्रापूर (रा.मा. ५४८डी) या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या रुंदीकरण व सुधारणा प्रकल्पाबाबत आता शासनाच्या वतीने अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. हा निर्णय यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र आता या संदर्भातील अधिकृत शासन आदेशामुळे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस औपचारिक सुरूवात होणार आहे, अशी माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिली.

या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करताना आमदार शेळके म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पास दिलेले सहकार्य आणि पाठबळ खरोखरच महत्त्वाचे ठरले. तिघांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतल्याने पुणे जिल्ह्यातील रस्ते विकासाला गती मिळणार आहे.”  या प्रकल्पांतर्गत तळेगाव ते चाकण दरम्यान चार पदरी उन्नत रस्ता व जमिनीवर चार पदरी रस्ता, तर चाकण ते शिक्रापूर दरम्यान जमिनीवर सहा पदरी रस्ता विकसित करण्यात येणार आहे. एकूण सुमारे ५३.२ किमी लांबीच्या या मार्गासाठी शासनाने ३९२३.८९ कोटी रुपयांचा खर्च मंजूर केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे ते म्हणाले की, “हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत 30 वर्षांच्या सवलत धोरणांतर्गत राबवण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन, पथकर वसुली आणि देखभाल व्यवस्थापनाची जबाबदारी देखील MSIDC कडेच असणार आहे. या मार्गामुळे मुंबई-पुणे महामार्ग आणि पुणे-संभाजीनगर महामार्ग यांच्यातील महत्त्वपूर्ण दळणवळण सुकर होणार आहे. औद्योगिक दृष्टिकोनातून पाहता, चाकण-तळेगाव पट्ट्याला अधिक गती मिळेल. हा निर्णय म्हणजे संपूर्ण परिसराच्या विकासाची ग्वाहीच आहे,” असे आमदार शेळके यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, “हा निर्णय होण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून मी सातत्याने पाठपुरावा करत होतो. शासनाच्या पातळीवरून मंजुरी मिळाल्यानंतर आता अधिकृत शासन आदेश देखील निघाल्याने या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे वाटचाल सुरू झाली आहे. हा प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावा यासाठी मी स्वतः लक्ष ठेवून आहे.” हा रस्ता परिसरातील नागरी आणि औद्योगिक विकासाला चालना देणारा ठरणार असल्याने नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

वडगाव मावळमध्ये पतीने केला पत्नीचा खून

चारित्र्याच्या संशयावरूने पतीने पत्नीचा दगडाने ठेचून खून केला ही घटना शुक्रवारी (दि.23) सकाळी 6:55 वाजण्यापूर्वी कोंडिवडे आं मा ता.मावळ जि.पुणे हद्दीत घडला. सोनाबाई अशोक वाघमारे वय 33 वय रा. कोंडिवडे आं मा ता.मावळ खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. अशोक बारकु वाघमारे वय 40 रा. परंदवडी ता.मावळ खून केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पती अशोक वाघमारे हा त्याच्या सासरी कोंडिवडे आं मा येथे मयत पत्नी सोनाबाई वाघमारे हिच्या सोबत राहत होता. त्याला तीन मुलं आहेत. आरोपी पती अशोक वाघमारे त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. संशयावरून शुक्रवारी सकाळी 6:55 वा. वनक्षेत्राच्या ओढ्यावर दगडाने ठेचून खून केला. आरोपी स्वतः कामशेत पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. आरोपीला अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड करत आहेत.

Web Title: Talegaon chakan shikrapur road project mla sushil shelke assures

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 04:51 PM

Topics:  

  • maval news
  • Sunil Shelke
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

मावळच्या टाकवेत देशातील पहिली ‘ADAS टेस्ट सिटी’; भारताच्या वाहन तंत्रज्ञानात ऐतिहासिक टप्पा
1

मावळच्या टाकवेत देशातील पहिली ‘ADAS टेस्ट सिटी’; भारताच्या वाहन तंत्रज्ञानात ऐतिहासिक टप्पा

मावळच्या प्रलंबित विकासकामांवर लक्ष द्यावे; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत MLA सुनील शेळकेंची ठोस भूमिका
2

मावळच्या प्रलंबित विकासकामांवर लक्ष द्यावे; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत MLA सुनील शेळकेंची ठोस भूमिका

Political News : “आज अजितदादा असते तर विजयोत्सव…” मावळातील निकालानंतर आमदार सुनील शेळके झाले भावूक
3

Political News : “आज अजितदादा असते तर विजयोत्सव…” मावळातील निकालानंतर आमदार सुनील शेळके झाले भावूक

मावळ तालुक्यात झेडपी–पंचायत समितीच्या १५ जागांवर राष्ट्रवादीचा दणदणीत विजय; भाजपाचा सुपडा साफ
4

मावळ तालुक्यात झेडपी–पंचायत समितीच्या १५ जागांवर राष्ट्रवादीचा दणदणीत विजय; भाजपाचा सुपडा साफ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.