
कर्जत नगरपरिषद मध्ये सदस्य पदाच्या 21 जागांसाठी आणि जनतेतून निवडून द्यायच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी आज मतदान सुरू आहे.कर्जत शहरात दहा प्रभागात ही निवडणूक होत असून 29957 मतदार असल्याने 33 मतदान केंद्र बनविण्यात आली आहेत. सकाळी साडे सात वाजता मतदान सुरू झाल्यानंतर लगेच काही मिनिटात प्रभाग आठ आणि प्रभाग नऊ मधील प्रत्येकी एक ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला. प्रभाग नऊ मधील जिल्हा परिषद शाळा आकुर्ले येथील मतदान केंद्रात मतदान यंत्रात बिघाड झाला.त्याचवेळी कर्जत दहिवली भागातील रायगड जिल्हा परिषद शाळा येथील प्रभाग आठ च्या मतदान केंद्रावर साडे दहा वाजेपर्यंत तीन वेळा मतदान यंत्र बंद पडले. त्याचा परिणाम मतदार हे साडे आठ पासून रांगेत उभे होते.शेवटी अकरा वाजून 20 मिनिटांनी नवीन ईव्हीएम मशीन आणण्यात आले आणि त्यानंतर पुन्हा मतदान सुरू झाले.परंतु त्यानंतर पुन्हा अर्ध्या तासाने साडे अकरा वाजण्याच्या सुमारास लावण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन मध्ये साडे बारा वाजता पुन्हा बिघाड झाला.त्यामुळे प्रभाग आठ 3 मधील ईव्हीएम मशीन तिसऱ्यांदा बदलावे लागले.हे मतदान यंत्र बंद पडण्याचे सत्र सुरू असल्याने असंख्य मतदार हे ताटकळत लाइन मध्ये उभे होते.
निवडणुकीसाठी कर्जत नगरपरिषद मध्ये दोन दिव्यांग मतदार यांची नोंद झाली आहे.त्यामुळे त्या दोन मतदार यांच्यासाठी व्हील चेअरची व्यवस्था निवडणूक यंत्रणेनेनी केली होती. परंतु जेष्ठ नागरिक आणि 85 वर्षे पुढील मतदार यांच्यासाठी व्हील चेअर कोणत्याही 31 मतदान केंद्रांवर उपलब्ध नव्हते.तसेच मतदारांसाठी पाण्याची व्यवस्था नव्हती आणि मुख्य म्हणजे मतदानासाठी येणारे मतदार यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नव्हती.त्यामुळं सर्वच मतदान केंद्रांवरील मतदार यांच्याकडून ओरड ऐकायला मिळत होती.
Ans: कर्जत नगरपरिषदेत सदस्य पदांच्या 21 जागांसाठी आणि जनतेतून निवडून देण्यात येणाऱ्या थेट नगराध्यक्ष पदासाठी मतदान होत आहे.
Ans: मतदान सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच प्रभाग 8 आणि प्रभाग 9 मधील प्रत्येकी एक ईव्हीएम मशीन बंद पडले. प्रभाग 8 मध्ये तर चार वेळा ईव्हीएम बिघाडाची पुनरावृत्ती झाली.
Ans: निवडणूक यंत्रणेने फक्त दोन दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर उपलब्ध करून दिल्या होत्या. जेष्ठ नागरिक किंवा 85 वर्षांवरील मतदारांसाठी कोणतीही व्हीलचेअर सुविधा नव्हती. त्यामुळे वृद्ध मतदारांना मोठा त्रास सहन करावा लागला.