Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aaditya Thackeray : “…म्हणून वरळीतील त्या बंडखोरांना उमेदवारी दिली नाही”, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण

Aaditya Thackeray News : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला (ठाकरे) वरळी राखण्यात यश येणार की पराभवाची नामुष्की पत्करावी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 13, 2026 | 03:19 PM
"...म्हणून बंडखोरांना उमेदवारी दिली नाही", आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण (फोटो सौजन्य-X)

"...म्हणून बंडखोरांना उमेदवारी दिली नाही", आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे १५ जानेवारी रोजी मतदान
  • बंडखोरांना उमेदवारी का दिली नाही?
  • आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण
Aaditya Thackeray News In Marathi: मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून काही प्रभागांमध्ये बंडखोरांना वेगण घालण्यात राजकीय पक्षांना यश आले. तर काही ठिकाणी बंडखोर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. शिवसेना (ठाकरे) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघातील सहापैकी तीन प्रभागांमध्ये बंडखोरी झाली असून बंडखोरीमुळे या प्रभागांमधील समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला (ठाकरे) वरळी राखण्यात यश येणार की पराभवाची नामुष्की पत्करावी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान वरळी विधानसभा मतदारसंघातील शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांना उमेदवारी का दिली नाही, यामागाचं कारण शिवसेना (ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Navi Mumbai Municipal Election 2026 : नवी मुंबईला काही कमी पडू देणार नाही ही देवा भाऊची गॅरंटी, मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन

मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहेत. मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये एकूण २,७०० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. सध्या प्रचार अंतिम टप्प्यात असून स्थानिक पातळीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मोठ्या प्रमाणात बंडखोरांमुळे आदित्य ठाकरे यांचे लक्ष वरळी विधानसभा मतदारसंघावर आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातील मुंबई महानगरपालिकेच्या १९३, १९६ आणि १९७ प्रभागांमध्ये बंडखोरी झाली असून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या बंडखोरामुळे शिवसेना (ठाकरे) – मनसे – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) युतीची डोकेदुखी वाढली आहे.

वरळी हा आमदार आदित्य ठाकरे यांचा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटासाठी वरळी महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. विशेषतः माहीम आणि वरळी (आदित्य ठाकरे) विधानसभा मतदारसंघातील वॉर्डावर सर्वांचे लक्ष होते. वरळीतील वॉर्ड क्रमांक १९६ महिलांसाठी खुला झाल्याने विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या पत्नी पद्मजा चेंबूरकर यांना उमेदवारी देण्यात आली. तर वॉर्ड क्रमांक 194 मधून आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे यांना तिकीट देण्यात आले. या निर्णयामुळे वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा गटात नाराजी उफाळून आली आहे. तसेच वरळी कोळीवाड्यातून पुन्हा हेमांगी वरळीकरांना संधी देण्यात आली.

आदित्य ठाकरेंची काय भूमिका?

एखादा पक्ष जिंकू शकतो किंवा त्या पक्षाच्या आधारे निवडणूक लढवता येते. अशा बंडखोरांना उबाठाकडून उमेदवारी नाकारण्यात आली. तसेच वरळी विधानसभा मतदारसंघातील शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांच्यावर बलात्काराची केस देखील दाखल होती, म्हणूनच अशा बंडखोरांना शिवसेनेकडून (उबाठा) कधीच उमेदवारीचं तिकीट मिळणार नाही,असं परखड मतं आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत देण्यात व्यक्त केलं.

सूर्यकांत कोळी वरळीकरांना धक्का देणार?

पक्षाने तिकीट कापल्याने अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी बंडखोरीचा निर्णय घेतलाय. आमदार आदित्य ठाकरे यांनाही त्यांच्या मतदारसंघात मोठा धक्का बसत आहे. जुने शिवसैनिक सूर्यकांत कोळींनी प्रभाग क्र. १९३ मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मला उमेदवारी देणार हे ठरलेलं, मात्र शेवटच्या क्षणी नाकारण्यात आलं, असे कोळी म्हणाले. विजयी झाल्यास मातोश्रीवर जाऊनच गुलाल उधळणार, असे सूर्यकांत कोळींनी स्पष्ट केले.

दरम्यान, तिकीट वाटपानंतर निर्माण झालेल्या या असंतोषामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपुढे बंडखोरांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. आदित्य ठाकरे ही नाराजी दूर करून परिस्थिती सावरतील का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीला ३,००० रुपये मिळणार? निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर

Web Title: That why rebel candidates were not given nomination aditya thackeray explained the reason bmc election 2026 marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Aditya Thackeray on BJP: शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंची फटकेबाजी; फडणवीसांची नक्कल करत कोस्टल रोडवरून विचारले प्रश्न
1

Aditya Thackeray on BJP: शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंची फटकेबाजी; फडणवीसांची नक्कल करत कोस्टल रोडवरून विचारले प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.