Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Union Cabinet Expansion:  एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर; अमित शाहांसोबत महत्त्वाच्या बैठकीने राजकीय वातावरण तापले

एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अमित शाहांची भेट घेतली होती. त्यानंतर फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते, तसेच महाराष्ट्राच्या नेतृत्वाबाबत बदल होऊ शकतात, अशाही राजकीय चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. मात्र, या चर्चांनाही कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 14, 2026 | 01:11 PM
Eknath Shinde, Amit Shah, Shiv Sena, Shrikant Shinde, Omraje Nimbalkar,

Eknath Shinde, Amit Shah, Shiv Sena, Shrikant Shinde, Omraje Nimbalkar,

Follow Us
Follow Us:
  • एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी अचानक दिल्ली  दौऱ्यावर
  • त्रिमंडळ फेरबदलात काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचीही चर्चा
  • श्रीकांत शिंदे यांच्या नावाचीही केंद्रीय मंत्रीपदासाठी चर्चा
Shiv Sena MPs Union Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी अचानक दिल्ली गाठली असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत आगामी मंत्रिमंडळ विस्तारासह विविध राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.

या बैठकीला शिवसेना (शिंदे गट) सोबत असलेले काही खासदारही उपस्थित राहू शकतात. त्यामुळे संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीसाठी नवी तारीख जाहीर; कृषीमंत्र्यांनी सांगितले विलंबाचे कारण

शिंदे गटातील खासदारांना मंत्रिपदाची संधी?

राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, केंद्र सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलात काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचीही चर्चा आहे. शिवसेना (शिंदे गट) समर्थक काही खासदारांचा समावेश असू शकतो, अशी चर्चा आहे.

याशिवाय, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाचीही केंद्रीय मंत्रीपदासाठी चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. तर, ठाकरे गटातून शिंदे गटात दाखल झालेले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या नावांचाही संभाव्य दावेदारांमध्ये उल्लेख केला जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

फडणवीसांबाबतच्या चर्चांनाही उधाण

दरम्यान,एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अमित शाहांची भेट घेतली होती. त्यानंतर फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते, तसेच महाराष्ट्राच्या नेतृत्वाबाबत बदल होऊ शकतात, अशाही राजकीय चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. मात्र, या चर्चांनाही कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Maharashtra Politics: अजित पवारांच्या पक्षापेक्षा थेट भाजप…! शरद पवारांची राष्ट्रवादी NDA च्या दिशेने?

राघव चड्ढांबाबतच्या चर्चांनाही दुजोरा नाही

काही माध्यमांमध्ये आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्याबाबतही विविध राजकीय चर्चांचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, त्यांनी पक्षाविरोधात बंड केल्याची किंवा त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सध्या सर्वांचे लक्ष अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य बैठकीकडे लागले असून, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा कधी होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

 

 

 

Web Title: Shrikant shinde omraje nimbalkar sanjay jadhav names speculation for modi cabinet reshuffle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Eknath Shinde
  • Shiv Sena
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

Raj Thackeray : ‘पराकोटीची हुकूमशाही!’ अभिजित दिपकेंच्या अटकेवर राज ठाकरे भडकले, मोदी – शहांविरोधातील संतप्त पोस्ट चर्चेत
1

Raj Thackeray : ‘पराकोटीची हुकूमशाही!’ अभिजित दिपकेंच्या अटकेवर राज ठाकरे भडकले, मोदी – शहांविरोधातील संतप्त पोस्ट चर्चेत

Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकर शिंदेंची साथ सोडणार अन ठाकरे गटात जाणार? कीर्तिकारांनी अखेर मौन सोडलं
2

Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकर शिंदेंची साथ सोडणार अन ठाकरे गटात जाणार? कीर्तिकारांनी अखेर मौन सोडलं

Shiv Sena BJP Clash: शिवसेना-भाजपमध्ये जुंपली! गोपाल लांडगेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले; भाजपचा जोरदार पलटवार
3

Shiv Sena BJP Clash: शिवसेना-भाजपमध्ये जुंपली! गोपाल लांडगेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले; भाजपचा जोरदार पलटवार

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? सर्वोच्च न्यायालयात ३० ऑक्टोबरपर्यंत अंतिम सुनावणीचे उद्दिष्ट
4

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? सर्वोच्च न्यायालयात ३० ऑक्टोबरपर्यंत अंतिम सुनावणीचे उद्दिष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.