Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! महाविकास आघाडी तुटली; मुंबई ते नागपूरपर्यंत शिवसेनेचा स्वबळावर लढण्याचा निर्णय

राज्याच्या राजकारणामध्ये मोठे बदल आणि उलथापालथ होत आहे. विधानसभा निवडणुकीचा निकालाचा दणका बसल्यामुळे पक्षांतर्गत नाराजी व्यक्त केली आहे. संजय राऊत यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 11, 2025 | 11:16 AM
The Mahavikas Aghadi of Thackeray group, Congress and Sharad Pawar group broke up.

The Mahavikas Aghadi of Thackeray group, Congress and Sharad Pawar group broke up.

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. प्रतिष्ठेची मानली जाणारी ही निवडणूक महायुतीच्या बाजूने निकाल देणारी ठरली. महायुतीला पूर्णपणे एकतर्फी यश मिळाल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यामुळे मित्रपक्षांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आहेत. यामध्ये महाविकास आघाडीचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या शिवसेना ठाकरे गटाने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे.

राज्यामध्ये मागील पाच वर्षापासून अनेक महानगरपालिकांमध्ये प्रशासनराज सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं घोंगडं भिजत पडलं आहे. आता लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला देखील लागले आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीचा लागलेला धक्कादायक निकाल महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांच्या जिव्हारी लागला असून यापुढे सावधगिरी बाळगली जात आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गट हा पक्ष मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणूका स्वबळावर लढणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी घोषित केले आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर 

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मुंबईपासून नागपूर महापालिका आम्ही स्वबळावरुन लढणार, मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला पाहायचंच आहे, अशी मोठी घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. नागपूरला सुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. याबाबत आम्हाला उद्धव ठाकरे यांनी संकेत दिले आहे. कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे म्हणून स्वबळावर लढणार असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

नवराष्ट्र विशेष लेख वाचा 

राज्याच्या राजकारणात भूकंप

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु झाली. दारुण पराभव झाल्यामुळे नेत्यांचे मनोबल खचले आहे. त्याचबरोबर अनेक मातब्बर नेते घरी बसून आहेत. महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष पराभवाचं खापर एकमेंकावर फोडत आहेत. त्याचबरोबर आघाडीमध्ये समन्वय नाही, बोलणी नाही अशी टीका मित्रपक्षच करत आहेत. त्याचबरोबर मुद्दाम जागावाटपला उशीर केला गेला असल्याचे आरोप देखील कॉंग्रेसने केला होता. यामुळे महाविकास आघाडीमध्ये भांडण सुरु झाली असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर जेष्ठ नेते शरद पवार यांनी चक्क भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसचे कौतुक केले आहे. त्यामुळे शरद पवार यांची भाजपसोबत वाढती जवळीक ही देखील चर्चेचा विषय ठरत आहे. तर दुसऱ्या बाजूला आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री फडणवीसांची पाच वेळा भेट घेतली आहे. त्यामुळे लवकरच राज्याच्या राजकारणामध्ये मोठे बदल आणि उलथापालथ होणार असल्याचे स्पष्ट दिसून आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत आहेत.

Web Title: The mahavikas aghadi of thackeray group congress and sharad pawar group broke up maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2025 | 11:10 AM

Topics:  

  • Mahavikas Aghadi
  • sanjay raut
  • shivsena

संबंधित बातम्या

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
1

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी; महाविकास आघाडीचा पाठिंबा की विरोध? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
2

महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी; महाविकास आघाडीचा पाठिंबा की विरोध? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार
3

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?
4

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.