Ahilyanagar politics: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आदेश दिल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात जोरदार घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना जोर आला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या युतीची बातमी कोणत्याही क्षणी येऊ शकेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि मनसेतील नेत्यांमध्ये पडद्यामागे मोठ्या घडामोडी सुरू असल्याचे बोलले जात आहे.
अशातच ठाकरे सेनेचे विधान परिषदेचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी सूचक विधान करत एकच खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेतेही या युतीच्या घोषणेची वाट पाहत आहेत. या युतीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर सकात्मक परिणाम होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे, ‘वारं केव्हाही फिरू शकतं,’ असं विधान करत सत्ताधाऱ्यांच्या गोटातही खळबळ उडवून दिली आहे.
यावेळी, उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आणि भाजपमध्ये जाणाऱ्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह इतरांवरही निशाणा साधला. अंबादास दानवे म्हणाले, “अनेकजण ठाकरे सेनेतून सत्ताधारी पक्षात जात आहेत. संघटना ही रेल्वेसारखी असते, तिच्या डब्यातून अनेकजण उतरतात आणि अनेकजण नव्याने चढत असतात. म्हणजेच नव्याने कुणीतरी येत असतं, पण लक्षात ठेवा, वारं केव्हाही आणि कसेही फिरू शकते,” असे सूचक संकेत अंबादास दानवे यांनी दिले आहेत.
याचवेळी महापालिकेत प्रशासकांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवही निशाणा साधला. ” महापालिकेत प्रशासकांच्या खांद्यांवर बंदुक ठेवू सत्ताधारी महायुतीच्या हातात रिमोट कंट्रोल आहे. या सत्तेचा वापर कशापद्धतीने केला जातो, महापालिकेची कशा पद्धतीन लूट सुरू आहे. ते जनतेला सांगायचे आहे. आपण काय करणार हे नंतर सांगूच,पण इथे रस्ते, वीज, पाणी आणि गटारीची व्यवस्थेसाठी सत्ताधाऱ्यांकडून जनतेला वेठीस धरलं जातयं ,हे जनतेपर्यंत पोहचवा,” अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
राजकुमार रावच्या ‘Maalik’ चित्रपटात प्रोसेनजीत चॅटर्जीची एंट्री कन्फर्म, अभिनेत्याने दिली अपडेट!
महापालिकेत सत्ता मिळवायची असल्यास सर्वात आधी संघटना मजबूत करा, शिवसेना संघटना थांबत नाही आणि थांबणारही नाही, हा संदेश विरोधकांपर्यंत पोहचवा. नव्या जुन्यांची सांगड घाला, असे आवाहनही दानवे यांनी यावेळी केले. दिवंहत उपनेते अनिल राठोड यांनी नगर शहराचं नेतृत्त्व केलं. ज्यावेळी मराठवाड्याच्या नामांतराचे आंदोलन झाले, त्यावेळी अटक करण्यात आलेल्या शिवसैनिकांना विसापूरला आणण्यात आले. त्यां शिवसैनिकांना अनिल राठोड यांनी मदत केली होती. नगरध्ये २५ वर्षे त्यांनी जनतेची सेवा केली, अशा आठवणीही त्यांनी ताज्या केल्या.
संघटनेत सर्वांनी काम करताना एकत्रितपणे काम करा, आपण मालक नाही, तर शिवसैनिक मालक आहे, ही भावना कायम लक्षात ठेवा, अहिल्यानगर जिल्ह्यातून अनेकजण इतर पक्षांमध्ये सामील झाले, नगरसेवक असो वा पदाधिकारी असो, ते आजही शिवसेनेच्या संपर्कात आहेत. वारं केव्हाही आणि कसंही फिरू शकतं हे लक्षात राहू द्या, असा टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला. त्यामुळे इतर पक्षात गेलेले काही चेहरे भविष्यात पुन्हा शिवसेनेच्या गळाला लागू शकतात, अशा चर्चां आता अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी अहिल्यानगर शहराच मोठ्या प्रमाणात शिवसेनेची संघटना उभी केली आहे. आता या संघटनेला अधिक बळकट करण्याचं काम प्रत्येक शिवसैनिकाने करायचं आहेत. शिवसेना हा नगरकरांचा श्वास आहे, तो संपू शकत नाही, सगळ्यांना सोबत घेऊन आगामी काळात महापालिकेवर सत्ता आणायची आहे. त्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करू शकतो, याची आतापासून तयारी सुरू केली आहे. महापालिकेवर शिवसेना नक्की भगवा फडकावेल, असा विश्वासही अंबादास दानवे यांनी यावेळी व्यक्त केला.