Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP School Theek Karo Movement:…तर दादा भुसेंनी राजीनामा दिलाच पाहिजे; लातुरच्या शाळा पाहून अभिजीत दिपके आक्रमक

अभिजीत दिपके यांनी लातुरच्या औसा जिल्हा परिषदेच्या शाळेत भेट दिली. या भेटीदरम्यान खाजगी शाळेचे विद्यार्थी शाळेत आणून बसवल्याचे निदर्शनास आले. खास बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी अभिजीत दिपकेंसमोरच ते या शाळेचे विद्यार्थी नसल्याची कबुली दिली

  • By anuradha sagar
Updated On: Aug 21, 2026 | 11:28 AM
Dada Bhuse Resignation, Abhijeet Dipke CJP

Dada Bhuse Resignation, Abhijeet Dipke CJP

Follow Us
Follow Us:
  • ‘स्कूल ठीक करो’ अभियानाअंतर्गत औसा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेची भेट.
  • शाळांच्या दयनीय अवस्थेची नैतिक जबाबदारी स्वीकारून दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा.
  • छताची गळती आणि विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच नसणे यावर प्रश्न उपस्थित.
CJP School Theek Karo Movement: राज्यातील शाळांची अवस्था इतकी दयनीय झाली आहे. विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधादेखील उपलब्ध होत नसतील तर याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करत राज्यातील शिक्षण व्यवस्थेची ही अवस्था पाहता यासर्वांची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी राजीनाा दिला पाहिजे, अशी मागणी कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके ( Abhijeet Dipke) यांनी केली आहे.

दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनानंतर आता देशभरात सीजेपीने स्कूल ठिक करो मोहिमेला सुरुवात केली आहे. या मोहिमेंतर्गत काल (20 ऑगस्ट) अभिजीत दिपके यांनी लातूरमधील औसा तालुक्यातील उजनी इथल्या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली, यावेळी ते बोलत होते. शिक्षणमंत्र्यांनी आणि आमदारांनी स्वतःच्या मुलांना शिक्षणासाठी आधी जिल्हा परिषद शाळेत पाठवायला पाहिजे, असंही दिपके यांनी म्हटलं आहे. (Abijeet Dipke Visit Latur ZP School)

CJP School Theek Karo Latur: बाहेरच्या शाळेतून विद्यार्थी आणले….; अभिजीत दिपकेंनी केली महापालिकेच्या

अभिजीत दिपके म्हणाले की, ” आजही शाळांवर पत्रे आहेत तेही पावसाळ्यात आजही पत्रे गळत आहेत. मुलांना बसायला बेचेंस नाहीत दहा वर्षांत तुम्हाला तेही जमलं नसेल तर तुम्ही काय केलं, शाळांची ही अवस्था पाहून मला नाही वाटतं दादा भुसेंनी या पदावर राहावं, त्यामुळे दादा भुसेंनी राजीनामा दिलाच पाहिजे. ज्यांना शिक्षण मंत्री बनायचं असेल, बनून राहायचं असले तर त्यांनी आधी स्वत:च्या मुलांना उद्यापासून सरकारी शाळेत पाठवलं पाहिजे, त्या अवस्थेत तुमच्या मुलांनीनी शिकावंस असा टोलाही अभिजीत दिपकेंनी लगावला आहे.

अभिजीत दिपके यांनी लातुरच्या औसा जिल्हा परिषदेच्या शाळेत भेट दिली. या भेटीदरम्यान खाजगी शाळेचे विद्यार्थी शाळेत आणून बसवल्याचे निदर्शनास आले. खास बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी अभिजीत दिपकेंसमोरच ते या शाळेचे विद्यार्थी नसल्याची कबुली दिली. औसा शहरातील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत पीपल्स प्रायमरी स्कूलचे विद्यार्थी आणल्याचे आढळून आले.

स्कूल ठीक करो अभियानांतर्गत अभिजीत दिपके यांनी सुरू केलेल्या अभियानाच्या शाळा भेटीदरम्यान हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Abijeet Dipke Visit Latur ZP School)

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

स्कूल ठिक करो मोहिमेंतर्गत आणखी एक प्रकार थेट ग्रामस्थांनीच उघडकीस आणला आहे. उजनी जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंती आणि शौचालयांसाठी निधी मंजूर झाला असतानाही पाच वर्षांपासून काम सुरू झाले नसल्याचे ग्रामस्थांनी दिपके यांना सांगितले.

ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर दिपके यांनी थेट उजनीच्या ग्रामसेवकांना फोन करून निधी आणि रखडलेल्या कामाबाबत सवाल केले. पण ग्रामसेवकांनी चिडून उत्तर दिल्याचा दावा दिपके यांनी केला. इतकेच नव्हे तर शाळांच्या मूलभूत सुविंधांसह इतरही अनेक अडचणी ग्रामस्थांनी दिपकेंसमोर मांडल्या. संबंधित अधिकारी आणि प्रशासनाकडे सातत्याने मागणी करूनही प्रश्न सुटत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आपल्या न्याय हक्कासाठी नागरिकांनी लढा दिला नाही तर अधिकारी मुजोर होतात असं दिपके यांनी सांगितले.

 

Web Title: Then dada bhuse must resign abhijeet dipke takes an aggressive stance after inspecting schools in latur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • abhijeet dipke
  • CJP
  • dada bhuse

संबंधित बातम्या

Nashik News : नाशिकमधील बंद मनपा शाळा पुन्हा सुरू होणार; दादा भुसे यांचे अधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश
1

Nashik News : नाशिकमधील बंद मनपा शाळा पुन्हा सुरू होणार; दादा भुसे यांचे अधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश

Fresh And Nutritious Meals : विद्यार्थ्यांना ताजा पोषण आहार वेळेत मिळावा; जिल्हास्तरावर निर्णयाचे अधिकार देणार
2

Fresh And Nutritious Meals : विद्यार्थ्यांना ताजा पोषण आहार वेळेत मिळावा; जिल्हास्तरावर निर्णयाचे अधिकार देणार

CJP Leaders Claim Arrest Plan: अभिजीत, आशुतोष, सौरवसह CJP नेत्यांना अटक करण्याचे प्लॅनिंग; बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
3

CJP Leaders Claim Arrest Plan: अभिजीत, आशुतोष, सौरवसह CJP नेत्यांना अटक करण्याचे प्लॅनिंग; बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

Kalyan News: अभिजीत दीपकेंच्या दादरमधील आंदोलनाचा भाजपकडून निषेध; कल्याणमध्ये आंदोलन
4

Kalyan News: अभिजीत दीपकेंच्या दादरमधील आंदोलनाचा भाजपकडून निषेध; कल्याणमध्ये आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.