RSS Mohan Bhagwat: काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत यांनी एक विधान केले होते, त्यांच्या या विधानाची चर्चा देशभरात झाली होती. “जेव्हा एखादा नेता ७५ वर्षांचा होतो तेव्हा त्याला शाल पांघरली जाते. याचा अर्थ असा की तो आता म्हातारा झाला आहे आणि त्याने इतरांना संधी दिली पाहिजे.” असं भागवत यांनी म्हटलं होतं. मोहन भागवतांच्या या विानाच विधानाचा विरोधकांनी शस्त्र म्हणून वापर केला आहे.
त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडूनही या आधारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्यात आला. अशातच पुढच्या महिन्यातच म्हणजे सप्टेंबर २०२५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर महिन्यात ७५ वर्षांचे होणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “जेव्हा सर्व प्रयत्न अपयशी ठरतात तेव्हा लोक सामान्य लोकांकडे वळतात. असे सूचक विधान करत त्यांनी मोदींना सूचित केले आहे.
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार; शिरोळमधून सरकारला दिला इशारा
मोहन भागवत यांनी दीनदयाळ नगरमधील श्री पांडुरंगेश्वर शिव मंदिराला भेट दिली. यावेळी भागवत म्हणाले की, “भगवान शिवामध्ये खूप मोठी शक्ती आहे. माणसाला देवाकडे घेऊन जाणारा मार्ग शिवापासूनच निर्माण झाला आहे. इतकी शक्ती असूनही, शिव अलिप्त स्वभावाचा आहे. ते नेहमीच भौतिक सुखांपासून दूर राहिले. जगाच्या कल्याणासाठी त्यांनी विषही प्यायले. आजकाल चांगले दिवस आले आहेत, त्यामुळे काहीतरी मिळवण्याची प्रवृत्ती वाढली आहे. पण हे शिवाचे स्वरूप नाही. सामान्य लोकांना हानी पोहोचवू शकणारे संकट स्वतःवर घेणे हा शिवाचा स्वभाव आहे. असे जीवन जगण्याची गरज आहे.
“आज मानवांच्या लोभामुळे संकटे निर्माण होत आहेत. त्यांच्यात असलेल्या धर्मांधतेमुळे क्रोध, द्वेष वाढत आहे आणि यामुळे भांडणे आणि युद्धे होत आहेत. मलाच सगळं हवंय, दुसऱ्यांना काही मिळालं नाही तरी चालेल, अशा स्वार्थी प्रवृत्ती वाढत चालल्या आहेत, हीच माणसाची काळी बाजू आहे. पण ही प्रवृत्ती बदलणे आवश्यक आहे. शिवाची पूजा करणे म्हणजे ही प्रवृत्ती बदलणे.” असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी लगावला आहे.
मोहन भागवत म्हणाले, मला काहीही नकोय, साधेपणाने जगले पाहिजे, प्रत्येकाने करूणा बाळगली पाहिजे. आपले जीवन जगाच्या हितासाठी जगले पाहिजे. ही शिवाची वृत्ती आहे. असे शुद्ध जीवन जगण्याची गरज आहे. यासाठी शिवभक्ती आवश्यक आहे.
Sharad Pawar: विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची ऑफर; शरद पवारांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
मोहन भागवत म्हणाले की, ” श्रावण महिन्यात प्रत्येकजण शिवाची पूजा करतो. शिव हे सामान्य लोकांचे प्रतीक आहे. जेव्हा सर्व प्रयत्न संपतात तेव्हा लोक सामान्य लोकांकडे वळतात. लोकांच्या मनात काही आले तर कामही पूर्ण होऊ शकते. बुद्धिजीवी म्हणतात की जगात बदल होत आहेत. हे समजून घेऊन जर माणसाने योग्य पावले उचलली नाहीत तर विनाश निश्चित आहे. पण जर वेळ ओळखली तर एक नवीन आणि प्रगत समाज निर्माण होऊ शकतो.