
IEA emergency oil release 400 million barrels india welcomes decision marathi
IEA Emergency Oil Release : मध्यपूर्वेतील (US-Israel Iran War) इराण युद्धामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढलेली असतानाच आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (IEA) जागतिक तेल बाजारपेठेत स्थिरता आणण्यासाठी आपल्या आपत्कालीन साठ्यातून ४०० दशलक्ष बॅरल तेल बाजारात सोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. भारताने या निर्णयाचे मनापासून स्वागत केले असून, यामुळे देशांतर्गत इंधनाचे दर नियंत्रणात राहण्यास मोठी मदत होणार आहे.
इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. अशा परिस्थितीत IEA च्या ३२ सदस्य देशांनी एकत्र येत आपत्कालीन तेल साठे वापरण्यास संमती दिली आहे. भारत जरी IEA चा पूर्ण सदस्य नसला, तरी एक महत्त्वाचा ‘सहयोगी सदस्य’ म्हणून भारताने या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला आहे. भारत सरकारने म्हटले आहे की, जागतिक ऊर्जा सुरक्षा राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने घेतलेले हे पाऊल काळाची गरज आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Peace: ‘तरच जग महायुद्धपासून वाचू शकते..’ इराणच्या ‘त्या’ 3 अटींवर सर्वच महासत्तांचे लक्ष; रशिया-पाकिस्तान मैदानात
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू झालेल्या संघर्षाचा सर्वात मोठा फटका तेल व्यापाराला बसला आहे. जगातील एकूण सागरी तेल व्यापारापैकी २५ टक्के व्यापार ज्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’तून चालतो, तिथली निर्यात आता केवळ १० टक्क्यांवर आली आहे. २०२५ च्या आकडेवारीनुसार, या मार्गावरून दररोज २० दशलक्ष बॅरल तेलाची वाहतूक होत असे. युद्धामुळे हा मार्ग बंद झाल्याने आणि कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने जगासमोर ऊर्जा आणीबाणी निर्माण झाली आहे. याच संकटाचे गांभीर्य ओळखून IEA चे कार्यकारी संचालक फातिह बिरोल यांनी हा ४०० दशलक्ष बॅरलचा साठा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Breaking: The IEA said its member countries would release a record 400 million barrels of oil from strategic reserves https://t.co/raS55DkIlp — The Wall Street Journal (@WSJ) March 11, 2026
credit – social media and Twitter
१९७४ मध्ये IEA ची स्थापना झाल्यापासून अशा प्रकारे आपत्कालीन साठा बाजारात सोडण्याची ही केवळ सहावी वेळ आहे. यापूर्वी १९९१ (खाडी युद्ध), २००५ (कॅटरिना चक्रीवादळ), २०११ आणि २०२२ सारख्या मोठ्या संकटांच्या वेळीच असा निर्णय घेण्यात आला होता. सध्या सदस्य देशांकडे १.२ अब्ज बॅरलपेक्षा जास्त आपत्कालीन तेल साठा आहे. या व्यतिरिक्त खाजगी उद्योगांकडेही ६०० दशलक्ष बॅरलचा अनिवार्य साठा आहे. या साठ्यामुळे बाजारात तेलाचा तुटवडा भासणार नाही आणि किमती आटोक्यात राहतील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Al-Aqsa Mosque: ‘अल-अक्सा’चे दरवाजे उघडा, अन्यथा…’ युद्धाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ 8 इस्लामिक देशांनी इस्रायलविरुद्ध थोपटले दंड
भारतासारख्या विकसनशील देशासाठी कच्च्या तेलाच्या किमती वाढणे म्हणजे महागाई वाढणे होय. जर आयईएने घेतलेला हा निर्णय प्रभावीपणे राबवला गेला, तर येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळू शकते. भारताने स्पष्ट केले आहे की, ते पश्चिम आशियातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि जागतिक तेल पुरवठा साखळी पुन्हा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करतील.
Ans: आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (IEA) ४०० दशलक्ष बॅरल आपत्कालीन तेल साठा बाजारात सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Ans: हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग असून जगातील एकूण सागरी तेल व्यापारापैकी २५% तेल याच मार्गाने जाते.
Ans: कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने देशात महागाई वाढू शकते, त्यामुळे जागतिक स्तरावर तेल पुरवठा वाढल्यास किमती कमी होतील, जो भारतासाठी मोठा दिलासा असेल.