Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 30 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खासदार उदयनराजे आणि शशिकांत शिंदेंची मतदान केंद्रावर गळाभेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

सातारा मतदान केंद्रावर खासदार उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्या गळाभेटीने राजकीय चर्चांना उधाण आले. विधान परिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान झालेल्या कानगोष्टींमुळे अनेक तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 18, 2026 | 09:15 PM
खासदार उदयनराजे आणि शशिकांत शिंदेंची मतदान केंद्रावर गळाभेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

खासदार उदयनराजे आणि शशिकांत शिंदेंची मतदान केंद्रावर गळाभेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Follow Us
Follow Us:

सातारा : सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. १८) सातारा जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडत असताना सातारा तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर राजकीय घडामोडींना वेगळेच वळण मिळाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे अनपेक्षितपणे एकत्र आल्याने उपस्थितांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांनी गळाभेट घेत कानगोष्टी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे धैर्यशील कदम, तर महाविकास आघाडीकडून उद्योजक अभयसिंह जगताप निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे तसेच शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नरेंद्र पाटील मतदान केंद्रावर दाखल झाले होते.

त्यानंतर महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले हे एकत्र मतदान केंद्रावर आले. त्यावेळी सर्वांमध्ये काही काळ चर्चा रंगली. मतदान सुरू असताना या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता व्यक्त होत आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी राज्यभरात विक्रमी मतदान, नाशिक, भंडाऱ्यात सर्वाधिक 100% मतदान

विशेष म्हणजे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे शेजारी उभे असतानाच उदयनराजे यांनी शशिकांत शिंदे यांच्या कानात काहीतरी सांगितल्याने उपस्थितांमध्ये कुतूहल निर्माण झाले. यावेळी शशिकांत शिंदे यांनी मंत्री शिवेंद्रराजेंना उद्देशून, ”मी उदयनराजेंना म्हटलं, भेटायला येतो पाच मिनिटं. तेव्हा ते म्हणाले, आपण नंतर भेटू, फोनवर बोलू,” असे सांगितले.

त्यावर उदयनराजे भोसले यांनी मिश्किल शैलीत, ”मैत्री ही मैत्री असते,” अशी प्रतिक्रिया दिली. शिंदे यांनीही त्यास होकार देत प्रतिसाद दिला.
तेवढयावरच न थांबता खा. उदयनराजे भोसले म्हणाले, ”भेटायला नंतर कधीपण या, मला काय?” असे म्हणत त्यांनी पुन्हा शशिकांत शिंदे यांच्या कानात काहीतरी सांगितले. त्यानंतर उदयनराजे यांनी ठाकरे सेनेचे नरेंद्र पाटील यांच्या कानातही काही बोलल्याचे दिसून आले. खा. उदयनराजे भोसले, शशिकांत शिंदे आणि नरेंद्र पाटील यांच्यात रंगलेल्या या कानगोष्टींची चर्चा साताऱ्यात चवीने सुरु होती. साताऱ्यातील मतदान केंद्रावर सुरू असलेल्या या चर्चेकडे उपस्थितांचे विशेष लक्ष लागले होते.

Operation Tiger: संजय राऊतांच्या ‘ऑपरेशन तुडवा’ इशाऱ्यानंतर बंडखोर खासदारांना Y+ सुरक्षा; गृह विभागाचा मोठा निर्णय

Web Title: Udayanraje and shashikant vshinde meet at voting booth in satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • Shashikant Shinde
  • Udayanraje Bhosale
  • Vidhan Parishad Election

संबंधित बातम्या

Satara DCCB Election: शशिकांत शिंदेंच्या होमपीचवरच धक्का! आखाडे सोसायटीचा बँक ठराव अखेर राजे गटाच्या उषा शिंदेंच्या बाजूने
1

Satara DCCB Election: शशिकांत शिंदेंच्या होमपीचवरच धक्का! आखाडे सोसायटीचा बँक ठराव अखेर राजे गटाच्या उषा शिंदेंच्या बाजूने

Satara News: मेढा सोसायटीत शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाची बाजी; डॉ. रामदास वांगडे यांच्या नावाचा ठराव मंजूर
2

Satara News: मेढा सोसायटीत शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाची बाजी; डॉ. रामदास वांगडे यांच्या नावाचा ठराव मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.