विधान परिषद निवडणुकीसाठी राज्यभरात विक्रमी मतदान, नाशिक, भंडाऱ्यात सर्वाधिक 100% मतदान
एकीकडे राज्यात शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार फुटीवरून गदारोळ झाल्याचे चित्र दिसत असतानाच दुसरीकडे राज्यभरात विधानपरिषद निवडणुकीचे मतदान मोठ्या प्रमाणात पार पडले. राज्यातल्या विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी आज (गुरुवार, 18 जून) मतदान पार पडले. विधान परिषदेच्या 17 पैकी तब्बल 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या सहा बिनविरोध जागा वगळता राज्यभरात 11 जागांसाठी मतदान पार पडले असून 22 जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
नाशिक विधान परिषदेसाठी 100 टक्के मतदान
परभणी – हिंगोली विधान परिषदेसाठी 99.78 टक्के मतदान
भंडारा – गोंदिया विधान परिषदेसाठी 100 टक्के मतदान
अमरावती विधान परिषदेसाठी 94.68 टक्के मतदान
सोलापूर विधान परिषदेसाठी 99.68 टक्के मतदान
विधानपरिषद निवडणुकीसाठी संभाजीनगर, जालना जिल्ह्यात 98.90 टक्के मतदान
जळगाव विधान परिषदेसाठी 97.78 टक्के मतदान
नागपूर विधान परिषदेसाठी 98.44 टक्के मतदान
धाराशिव – लातूर – बीड विधान परिषदेसाठी 99.49 टक्के मतदान
सांगली – सातारा विधान परिषदेसाठी 97.89 टक्के मतदान
नांदेड विधान परिषदेसाठी 97.78 टक्के मतदान
व्हीप म्हणजे नेमके काय? कधी लागू होतो आणि त्याचे उल्लंघन केल्यास काय होते? जाणून घ्या नियम
ठाणे विधान परिषद मतदारसंघ – रवींद्र फाटक (शिवसेना)
यवतमाळ विधान परिषद मतदारसंघ – दृश्यांत चतुर्वेदी (शिवसेना)
रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघ – अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
पुणे विधान परिषद मतदारसंघ – विक्रम काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
वर्धा – गडचिरोली – चंद्रपूर विधान परिषद मतदारसंघ – अरुण लखानी (भाजप)
अहिल्यानगर विधान परिषद मतदारसंघ – प्राजक्त तनपुरे (भाजप)
४ वाजता मतदान संपल्यानंतर मतपेट्या या मतमोजणी केंद्रातील स्ट्रॉंग रूमकडे पाठवण्यात आल्या आहेत. येत्या सोमवारी २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे.






