Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

२०२९ च्या पंतप्रधानपदासाठी भाजपात रस्सीखेच; फोडाफोडीचे राजकारण सुरू – उद्धव ठाकरे

धाराशिव येथील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपमध्ये २०२९ च्या पंतप्रधानपदावरून अंतर्गत स्पर्धा सुरू असल्याचा आरोप केला. खासदारांची फोडाफोड हे त्याच राजकीय रणनीतीचे भाग असल्याचा दावा करत त्यांनी शिवसेना संपणार नसल्याचेही ठामपणे सांगितले.

  • By विवेक
Updated On: Jun 28, 2026 | 08:54 PM
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

Follow Us
Follow Us:

धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत जाण्याची आणि कदाचित पंतप्रधान होण्याची स्वप्ने पडत आहेत. सध्या पंतप्रधानांनंतर पुढचा चेहरा कोण असेल, यावरून भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असून खासदारांची फोडाफोडी त्याचाच भाग असल्याचा आरोप शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

धाराशिव येथे रविवारी झालेल्या जाहीर सभेत बोलताना ठाकरे म्हणाले, “फुटलेले खासदार फडणवीसांकडे जाऊ नयेत, तर आपल्या गटात राहावेत यासाठी ही चढाओढ सुरू आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील खासदारही फोडण्यात आले. ज्या पक्षाचे नावही लोकांना माहीत नाही, अशा पक्षात त्यांना पाठविण्यात आले. हा संपूर्ण फोडाफोडीचा खेळ २०२९ मध्ये कोण पंतप्रधान होणार यासाठी सुरू आहे.”

पश्चिम बंगाल निवडणुकीत अडीच लाख सैन्य तैनात केल्याचा आरोप करत ठाकरे म्हणाले, “पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन करण्यासाठी तेवढेच सैन्य पाठविण्याची हिंमत दाखवा. त्यासाठी हा ठाकरे तुमच्या पाठीशी ठाम उभा राहील. गद्दारांचा पाठिंबा घेण्याची गरज नाही.”

धाराशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट खरेदी, ओमराजेंच्या मागे ईडी लागली? संजय राऊतांचा गंभीर आरोप

शिवसेना संपविण्याचे अनेक प्रयत्न झाले, ४० आमदार फोडले गेले, त्यानंतरही नऊ खासदार निवडून आले. आता त्यातील सहा जण पक्ष सोडून गेले असले तरी शिवसेना संपणार नाही, असा दावा त्यांनी केला.

“जोपर्यंत जनता आमच्यासोबत आहे आणि बाळासाहेब ठाकरे लोकांच्या हृदयात आहेत, तोपर्यंत शिवसेना संपणार नाही. येणाऱ्या काळात हे आम्ही दाखवून देऊ,” असेही ठाकरे म्हणाले. धाराशिवचे खासदार पक्षांतर केल्यानंतर जनतेशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी धाराशिव दौरा केला असून, त्याच दौऱ्यातील सभेत त्यांनी हे वक्तव्य केले.

यावेळी मंचावर आदित्य ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे, कैलास पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ… आता कपाळावरचा ‘गद्दार’ डाग कधी पुसणार? उद्धव ठाकरेंचा ओमराजे निंबाळकरांवर घणाघात

Web Title: Uddhav thackeray alleges bjp power struggle for 2029 pm post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 08:54 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
1

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’
2

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका
3

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘;  राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार
4

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘; राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.