Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Assembly Elections : केरळ, आसाम आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात; अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

केरळ, आसाम आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. केरळ, आसाम आणि पुदुचेरीमधील आगामी विधानसभा निवडणुका राजकीय पक्षांपेक्षा त्यांच्याशी संबंधित मोठ्या नावांची कसोटी ठरू शकतात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 09, 2026 | 07:43 AM
१४ जिल्ह्यांत ४७ जागांवर पोटनिवडणूक जाहीर

१४ जिल्ह्यांत ४७ जागांवर पोटनिवडणूक जाहीर

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांत विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर आता उर्वरित काही राज्यात निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्यात आसाम आणि केरळ या दोन राज्यांमध्ये आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशात आज विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

आसाममधील १२६, केरळमधील १४० आणि पुदुचेरीमधील ३० जागांसाठी मतदान घेतले जाणार आहे. आसाम विधानसभा निवडणुकीत एकूण ७२२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई, विरोधी पक्षनेते देबब्रता सैकिया, एआययूडीएफचे प्रमुख बदरुद्दीन अजमल, रायझर दलचे नेते अखिल गोगोई आणि एजेपीचे अध्यक्ष लुरिंज्योती गोगोई यांसारख्या प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे.

Kharge Apologizes to Gujarati : आधी गुजरात्यांना म्हटले ‘बेवकुफ’ अन् नंतर मागितली माफी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे चर्चेत

राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये एकूण ३१४९० मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत, जिथे सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीत २५ दशलक्ष मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील, ज्यामध्ये अंदाजे १२.५ दशलक्ष महिला आणि ३१८ दशलक्ष तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

मतदानाला सुरुवात

केरळ, आसाम आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. केरळ, आसाम आणि पुदुचेरीमधील आगामी विधानसभा निवडणुका राजकीय पक्षांपेक्षा त्यांच्याशी संबंधित मोठ्या नावांची कसोटी ठरू शकतात. केरळमधील पिनारयी विजयन, आसाममधील हिमंता बिस्वा सरमा आणि पुदुचेरीमधील एन. रंगस्वामी यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, निवडणुकीच्या निकालांचे दूरगामी राजकीय परिणामही होतील.

तामिळनाडूत रामचंद्रन यांच्या नावाचा दबदबा

एआयएडीएमकेचे दिग्गज नेते एम. जी. रामचंद्रन यांच्या नावाचा उल्लेख केल्याने राजकीय पक्षांना मते मिळतात, याचा कोणताही ठोस पुरावा नाही. एमजीआर यांच्या निधनाला ४० वर्षे उलटूनही, तामिळनाडूतील राजकीय पक्षांना असे वाटते की त्यांच्या नावाचा उल्लेख केल्याने निवडणुकीत यश मिळेल.

काँग्रेस अध्यक्ष त्यांच्या विधानामुळे चर्चेत

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे सध्या जोरदार चर्चेत आले आहेत. खरगे हे केरळ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गुजराती समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. काँग्रेस (Congress News) अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे मोदी सरकारसमोर झुकले असल्याची टीका आता राजकीय वर्तुळातून केली जात आहे.

Web Title: Voting today for assembly elections in kerala assam and puducherry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 07:13 AM

Topics:  

  • Assembly Elections
  • political news

संबंधित बातम्या

‘विरोधक केवळ राम मंदिरावरून राजकारण करतायत’; शिंदे गटाच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाना
1

‘विरोधक केवळ राम मंदिरावरून राजकारण करतायत’; शिंदे गटाच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाना

खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे आक्रमक; आता बंडखोर खासदारांच्या थेट मतदारसंघात जाऊन…
2

खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे आक्रमक; आता बंडखोर खासदारांच्या थेट मतदारसंघात जाऊन…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.