Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे आक्रमक; आता बंडखोर खासदारांच्या थेट मतदारसंघात जाऊन…

उद्धव ठाकरे यांनीही बंडखोर आमदार, खासदारांच्या मतदारसंघातून जनतेसमोर पक्षाची बाजू मांडण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात अशाच सभांद्वारे ते फुटीर आमदार आणि खासदारांविरोधात जनमत तयार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट संकेत या दौऱ्यातून मिळत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 28, 2026 | 01:47 PM
खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे आता आक्रमक; आता बंडखोर खासदारांच्या थेट मतदारसंघात जाऊन...

खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे आता आक्रमक; आता बंडखोर खासदारांच्या थेट मतदारसंघात जाऊन...

Follow Us
Follow Us:

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता आक्रमक भूमिकेत आले असून, त्यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात थेट जाऊन जनतेशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाची सुरुवात यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून झाली. खासदार संजय देशमुख यांच्या मतदारसंघात झालेल्या जाहीरसभेत उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर जोरदार टीका करत त्यांच्यावर विश्वासघाताचा आरोप केला.

या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी संजय देशमुख यांचा जुना व्हिडीओही दाखवला. या व्हिडीओमध्ये देशमुख यांनी ‘आईंची शपथ घेऊन शिवसेनेसोबतच राहणार’ असे म्हटले होते. याच मुद्द्यावरून ठाकरे यांनी भावनिक आवाहन करत, ‘आईची शपथ घेऊन गद्दारी केली, आता त्या आईला काय वाटत असेल?’ असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे सभेला भावनिक आणि राजकीय दोन्ही स्वरूप प्राप्त झाले.

पक्षसंघटना नव्याने उभारण्याचे प्रयत्न

या दौऱ्याकडे केवळ राजकीय सभा म्हणून न पाहता पक्षसंघटना पुन्हा उभी करण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहिले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हेही या दौऱ्यात सहभागी असून, काल रात्री ते नागपूरला दाखल झाले होते. त्यानंतर शनिवारी यवतमाळ येथे पहिली सभा पार पडली. राजकीय निरीक्षकांच्या मते, उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलेली ही रणनीती नवी नाही.

शरद पवारांच्या ‘पावलावर पाऊल’

२०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांनीही बंडखोर नेत्यांच्या मतदारसंघात जाऊन जाहीरसभा घेत जनतेची माफी मागितली होती. येवला येथे छगन भुजबळ आणि परळीत धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातील सभा त्याची उदाहरणे ठरली होती.

बंडखोरांच्या मतदारसंघात बाजू मांडण्याचा प्रयत्न

उद्धव ठाकरे यांनीही बंडखोर आमदार, खासदारांच्या मतदारसंघातून जनतेसमोर पक्षाची बाजू मांडण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात अशाच सभांद्वारे ते फुटीर आमदार आणि खासदारांविरोधात जनमत तयार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट संकेत या दौऱ्यातून मिळत आहेत.

ऑपरेशन उबाठा बुडवाचे सूत्रधार संजय राऊतच; खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा घणाघात

Web Title: Uddhav thackeray holds a rally directly in the rebel mps constituencies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news
  • Shivsena Politics
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
1

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Maharashtra Live breaking News in Marathi: मुंबईत आज पंडित दीनदयाळ उपाध्याय  रोजगार महाकुंभ’ मेळा
2

Maharashtra Live breaking News in Marathi: मुंबईत आज पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’ मेळा

‘पराभवाचे खापर आयोगावर फोडण्याऐवजी आत्मपरीक्षण करा’; शिवेंद्रराजे भोसले यांचा राहुल गांधींवर निशाणा
3

‘पराभवाचे खापर आयोगावर फोडण्याऐवजी आत्मपरीक्षण करा’; शिवेंद्रराजे भोसले यांचा राहुल गांधींवर निशाणा

Maharashtra Drought Update: पिकांचे पंचनामे आणि अहवालानंतरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत; बावनकुळेंची माहिती
4

Maharashtra Drought Update: पिकांचे पंचनामे आणि अहवालानंतरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत; बावनकुळेंची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.