Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापूर जिल्हा परिषदेवर पुन्हा महिलाराज? आरक्षणाचे चित्र स्पष्ट, अनेक ठिकाणी इच्छुकांची गोची

राजकीय पातळीवर या आरक्षणामुळे सर्वच पक्षांनी आता महिला नेतृत्वावर अधिक भर देण्याची गरज भासणार आहे. अनेक ठिकाणी पुरुष इच्छुकांना मागे हटावे लागणार असून महिला उमेदवारांना संधी मिळणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 14, 2025 | 10:04 AM
कोल्हापूर जिल्हा परिषदेवर पुन्हा महिलाराज? आरक्षणाचे चित्र स्पष्ट, अनेक ठिकाणी इच्छुकांची गोची

कोल्हापूर जिल्हा परिषदेवर पुन्हा महिलाराज? आरक्षणाचे चित्र स्पष्ट, अनेक ठिकाणी इच्छुकांची गोची

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या आरक्षणाच्या घोषणेनंतर तालुकानिहाय गट आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे यंदाही महिलांचा दबदबा स्पष्टपणे जाणवतो आहे. अनेक तालुक्यांमध्ये गटांवर महिला आरक्षण लागू झाल्याने आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा ‘महिलाराज ‘ होण्याची चिन्हं दिसत आहेत.

सर्वात जास्त लक्षवेधी बाब म्हणजे चंदगड तालुक्यातील परिस्थिती. या तालुक्यातील एकूण चारही गटांवर महिला आरक्षण लागू झाले आहे. त्यापैकी दोन गट खुले (महिला) तर उर्वरित दोन गट इतर प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या तालुक्यातून केवळ महिला उमेदवारच जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरणार आहेत. याचबरोबर भुदरगड तालुक्यातही महिला आरक्षणाचा प्रभाव जाणवतो आहे. येथे चार गटांपैकी तीन गट खुले (महिला) असून एक गट ओबीसी (महिला) प्रवर्गासाठी राखीव आहे. यामुळे या तालुक्यातही सर्वच गट महिला उमेदवारांसाठी खुले राहणार आहेत.

हेदेखील वाचा : Pune Zilla Parishad Reservation: पुणे जिल्हा परिषदेच्या गटांचे प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर

दरम्यान, या दोन तालुक्यांपुरतेच नव्हे तर जिल्हाभरात आरक्षणाचा कल महिलांकडे झुकलेला दिसतो आहे. अनेक ठिकाणी खुल्या, ओबीसी, तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात महिला आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे यंदा जिल्हा परिषदेत महिलांचा प्रभावी सहभाग वाढण्याची शक्यता आहे.

विद्यमान सदस्यांचे गट आरक्षण बदलले

राजकीय पातळीवर या आरक्षणामुळे सर्वच पक्षांनी आता महिला नेतृत्वावर अधिक भर देण्याची गरज भासणार आहे. अनेक ठिकाणी पुरुष इच्छुकांना मागे हटावे लागणार असून महिला उमेदवारांना संधी मिळणार आहे. काही ठिकाणी विद्यमान सदस्यांचे गट आरक्षण बदलल्याने समीकरणेही बदलली आहेत.

आरक्षणामुळे वाढला महिलांचा सहभाग

गेल्या काही निवडणुकांकडे पाहता महिला आरक्षणामुळे महिलांचा सहभाग सातत्याने वाढला आहे. यावर्षीही त्याच दिशेने वाटचाल होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा  ‘महिलाराज’ होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

Web Title: Women rule again in kolhapur zilla parishad know politics of kolhapur zilla parishad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 10:04 AM

Topics:  

  • Kolhapur Politics
  • political news

संबंधित बातम्या

उत्तर प्रदेशच्या राजकारणात मायावतींच्या ‘बसपा’ची जोरदार तयारी; 2027 मध्ये सत्तेत ‘कमबॅक’ करणार?
1

उत्तर प्रदेशच्या राजकारणात मायावतींच्या ‘बसपा’ची जोरदार तयारी; 2027 मध्ये सत्तेत ‘कमबॅक’ करणार?

निवडणुकीचे वारे फिरतायेत जोरात; मतदारांना प्रलोभन अन् भेटवस्तूंची वाटली जातीये खैरात
2

निवडणुकीचे वारे फिरतायेत जोरात; मतदारांना प्रलोभन अन् भेटवस्तूंची वाटली जातीये खैरात

Sangli Reservation: सांगली जिल्हा परिषदेत ६१ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर; यंदा मिळणार नव्या चेहऱ्यांना संधी 
3

Sangli Reservation: सांगली जिल्हा परिषदेत ६१ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर; यंदा मिळणार नव्या चेहऱ्यांना संधी 

Pune Politics: महायुतीला रवींद्र धंगेकर पडणार भारी? युतीच्या पक्षातील नेत्याची करतायेत पोलखोल, पुण्यात राजकारण रंगलं
4

Pune Politics: महायुतीला रवींद्र धंगेकर पडणार भारी? युतीच्या पक्षातील नेत्याची करतायेत पोलखोल, पुण्यात राजकारण रंगलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.