पुणे जिल्हा परिषदेच्या गटांचे प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर
Pune Zilla Parishad Reservation: राज्यातील गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर निर्णय घेण्यात आला आहे. आज (१३ ऑक्टोबर) पुणे जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. या आरक्षण सोडतीत एकूण ७३ गटांपैकी २२ गट खुले प्रवर्गासाठी ठेवण्यात आले आले आहेत. तर अनुसूचित जाती (एस.सी.) साठी ७ गट, अनुसूचित जमाती (एस.टी.) साठी ५ गट आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) साठी १९ गट आरक्षित करण्यात आले आहेत. याशिवाय, खुल्या गटातील महिलांसाठी २० जागा राखीव ठेवण्यात आल्या असून, सर्व प्रवर्गांतील मिळून एकूण ३७ गट महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषद कायद्यातील तरतुदीनुसार विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अनुसूचित जाती आणि जमातींसाठी निश्चित करण्यात आलेल्या एका गटामध्ये बदल केला आहे. याआधी अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट असलेला इंदापूर तालुक्यातील भिगवण गट आरक्षण सोडतीवेळी या प्रवर्गातून वगळण्यात आला आहे. त्याच्या जागी हवेली तालुक्यातील लोणी काळभोर गटाचा समावेश अनुसूचित जाती प्रवर्गात करण्यात आला आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकसंख्येच्या उतरत्या क्रमात चूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हा बदल मंजूर केला. दरम्यान, इंदापूर तालुक्यातील काही तरुण कार्यकर्त्यांनी या बदलावर आक्षेप नोंदवला आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत सोमवारी पुणे जिल्हा परिषदेच्या गटांची आरक्षण सोडत काढण्यात आली. या वेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे समन्वयक आणि उपजिल्हाधिकारी डॉ. चारूशीला मोहिते-देशमुख, पुणे जिल्हा निवडणूक शाखेचे तहसीलदार राहुल सारंग, तसेच कुळ कायदा शाखेचे तहसीलदार जगदीश निंबाळकर आदी अधिकारी उपस्थित होते.
जितेंद्र डुडी म्हणाले की, कायद्यानुसार अनुसूचित जाती (एस.सी.) आणि अनुसूचित जमाती (एस.टी.) या दोन प्रवर्गांसाठी राखीव असलेले गट लोकसंख्येच्या आधारे आधीच निश्चित करण्यात आले आहेत. संबंधित प्रवर्गांतील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गटांची निवड आरक्षणासाठी करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे एकूण ७३ गट आहेत. जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहाचा कार्यकाल २० मार्च २०२२ रोजीच संपला होता. त्यानंतर सुमारे पावणेचार वर्षांपासून (मार्च २०२२ ते ऑक्टोबर २०२५) जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकीय राज सुरू आहे. त्यानंतर जवळपास पावणेचार वर्षांनंतर आज (१३ ऑक्टोबर) जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. या आरक्षण सोडतीसाठी हवेली तालुक्यातील गाऊडदरा येथील जिल्हा परिषद शाळेत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सोडतीसाठी चिठ्ठ्या काढण्याची जबाबदारी इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीतील विद्यार्थ्यांनी पार पाडली.
Explainer: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा संघर्ष नाही नवा, अनेकदा भिडलेत दोन्ही देश; कसे जाणून घ्या
१. अनुसूचित जाती (एस.सी.) – एकूण जागा ०७ (४ महिला)
१. अनुसूचित जाती (सर्वसाधारण) – एकूण जागा ०३
1. नीरावागज (डोर्लेवाडी), ता. बारामती
2. गोपाळवाडी (कानगाव), ता. दौंड
3. उरूळीकांचन (सोरतापवाडी), ता. हवेली
२. अनुसूचित जाती (महिला) – एकूण जागा ०४
1. लासुर्णे (सणसर), ता. इंदापूर
2. वालचंदनगर (बोरी), ता. इंदापूर
3. गुणवडी (शिर्सूफळ), ता. बारामती
4. लोणी काळभोर (कदमवाकवस्ती), ता. हवेली
—
२. अनुसुचित जमाती (एस.टी.) – एकूण जागा ०५ (३ महिला)
३. अनुसुचित जमाती (सर्वसाधारण) – एकूण जागा ०२
1. वाडा (वाशेरे), ता. खेड
2. टाकवे बुद्रूक (नाणे), ता. मावळ
४. अनुसुचित जमाती (महिला) – एकूण जागा ०३**
1. शिनोली (बोरघर), ता. आंबेगाव
2. बारव (तांबे), ता. जुन्नर
3. डिंगोरे (उदापूर), ता. जुन्नर
—
३. नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) – एकूण जागा १९ (१० महिला)
५. ओबीसी (सर्वसाधारण) – एकूण जागा ०९
1. पेरणे (लोणीकंद), ता. हवेली
2. पौड (अंबडवेट), मुळशी
3. वेल्हे बुद्रूक (वांगणी), ता. वेल्हे
4. मेदनकरवाडी (काळूस), ता. आंबेगाव
5. पिरंगुट (भुगाव), ता. मुळशी
6. मांडवगण फराटा (वडगाव रासाई), ता. शिरूर
7. यवत (बोरीभडक), ता. दौंड
8. अवसरी बुद्रूक (पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे), ता. आंबेगाव
9. वेळू (नसरापूर), ता. भोर
६. ओबीसी (महिला) – एकूण जागा १०
1. कडूस (चास), ता. खेड
2. सुपा (काऱ्हाटी), ता. बारामती
3. थेऊर (आव्हाळवाडी), ता. हवेली
4. न्हावरा (शिरूर ग्रामीण), ता. शिरूर
5. राजुरी (बेल्हे), ता. जुन्नर
6. नारायणगाव (वारुळवाडी), ता. जुन्नर
7. ओतूर (धालेवाडी तर्फे हवेली), ता. जुन्नर
8. नीरा शिवतक्रार (कोळविहिरे), ता. पुरंदर
9. बोरी बुद्रुक (खोडद), ता. जुन्नर
10. पळसदेव (बिजवडी), ता. इंदापूर
—
४. खुला गट (सर्वसाधारण) – एकूण जागा ४२ (२० महिला)
७. खुला गट (सर्वसाधारण) – एकूण जागा २२
1. आळे (पिंपळवंडी), ता. जुन्नर
2. सावरगाव (कुसूर), ता. जुन्नर
3. पारगाव तर्फे अवसरी बुद्रूक (जारकरवाडी), ता. आंबेगाव
4. कवठे यमाई (टाकळीहाजी), ता. शिरूर
5. पाबळ (केंदूर), ता. शिरूर
6. पिंपळगाव तर्फे खेड (मरकळ), ता. खेड
7. नाणेकरवाडी (म्हाळुंगे), ता. खेड
8. कुसगांव बुद्रूक (काले), ता. मावळ
9. हिंजवडी (माण), ता. मुळशी
10. राहू (खामगांव), ता. दौंड
11. खडकी (देऊळगावराजे), ता. दौंड
12. बोरीपार्धी (केडगाव स्टेशन), ता. दौंड
13. बेलसर (माळशिरस), ता. पुरंदर
14. वीर (भिवडी), ता. पुरंदर
15. विंझर (पानशेत), ता. वेल्हे
16. भोंगवली (कामथडी), ता. भोर
17. भोलावडे (शिंद), ता. भोर
18. उत्रोली (कारी), ता. भोर
19. पणदरे (मुढाळे), ता. बारामती
20. निंबूत (कांबळेश्वर), ता. बारामती
21. वडापुरी (माळवाडी), ता. इंदापूर
22. काटी (लाखेवाडी), ता. इंदापूर
८. खुला गट (महिला) – एकूण जागा २०
1. रेटवडी (वाफगांव), ता. खेड
2. पाटस (कुरकुंभ), ता. दौंड
3. वडगाव निंबाळकर (मोरगाव), ता. बारामती
4. तळेगाव ढमढेरे (रांजणगाव सांडस), ता. शिरूर
5. निमगाव केतकी (शेळगाव), ता. इंदापूर
6. खडकाळे (कार्ला), ता. मावळ
7. कळंब (चांडोली बुद्रुक), ता. आंबेगाव
8. वरवंड (पारगाव), ता. दौंड
9. शिक्रापूर (सणसवाडी), ता. शिरूर
10. घोडेगाव (पेठ), ता. आंबेगाव
11. इंदुरी (वराळे), ता. मावळ
12. खेड शिवापूर (खानापूर), ता. हवेली
13. पाईट (आंबेठाण), ता. खेड
14. भिगवण (शेटफळगढे), ता. इंदापूर
15. रांजणगाव गणपती (कारेगाव), ता. शिरूर
16. कुरुळी (आळंदी ग्रामीण), ता. खेड
17. सोमाटणे (चांदखेड), ता. मावळ
18. बावडा (लुमेवाडी), ता. इंदापूर
19. गराडे (दिवे), ता. पुरंदर
20. कोरेगाव मूळ (केसनंद), ता. हवेली