Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips for Home: भिंतीवरचे ‘हे’ ४ फोटो घरात नकोच! वास्तुशास्त्र काय सांगतं, जाणून घ्या

Vastu Tips for Home: शास्त्रामध्ये भिंतीवरच्या फोटोबाबात लिहिले आहे. कोणत्या प्रकाराचे फोटो घरात अशुभ मानले जातात. कोणते आहेत ते फोटो, चला जाणून घेऊया. Vastu Tips for Home: 

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 08, 2026 | 12:05 PM
Vastu Tips for Home: भिंतीवरचे ‘हे’ ४ फोटो घरात नकोच! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Vastu Tips for Home: भिंतीवरचे ‘हे’ ४ फोटो घरात नकोच! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • वास्तुशास्त्रानुसार घरात फोटो लावण्यासाठी काही नियम सांगितले आहेत
  • काही प्रकारची चित्रं घरासाठी अशुभ मानली जातात.
  • घरात सकारात्मक आणि शांत वातावरण राहावं यासाठी योग्य फोटो निवडण्याचा सल्ला दिला जातो.
Vastu Shastra: हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. घर कसं बांधावं, कोणती वस्तू कुठे ठेवावी, हे सगळं वास्तुशास्त्रात सांगितलं आहे. जर घर वास्तुशास्त्रानुसार नसेल तर घरात अडचणी येतात असं म्हणतात. घरात नवरा-बायकोमध्ये विनाकारण भांडण, घरातल्या मोठ्या व्यक्तीचं एकामेकांशी पटत नाही. त्यामुळे घरात शांतता राहत नाही त्याचा परिणाम लहान मुलांवर होतो.

दरम्यान मुलांमध्ये हट्टीपणा, चिडचिडे होते. एवढचं नाहीतर, पैशांची चणचण पाहायला मिळते. हातात पैसा असून टिकत नाही म्हणून घर नेहमी वास्तूशास्त्रानुसार असावे, असे म्हटले जाते. शास्त्रामध्ये भिंतीवरच्या फोटोबाबात लिहिले आहे. कोणत्या प्रकाराचे फोटो घरात अशुभ मानले जातात. कोणते आहेत ते फोटो, चला जाणून घेऊया. Vastu Tips for Home:

1. युद्धाचे फोटो अजिबात लावू नका

अनेकांना युद्धाचे फोटो, लढाईचे फोटो घरात लावायला आवडतात. पण वास्तुशास्त्रानुसार हे खूपच चुकीचं आहे. घराच्या कोणत्याच भिंतीवर युद्धाचा प्रसंग असलेला फोटो लावू नका. या फोटोमध्ये हिंसा, राग, भांडण जोडलेले असल्याने नकारात्मक ऊर्जा बाहेर राहते. दरम्यान घरातले वातावरण तसेच तयार होतं. घरात सतत वादविवाद सुरू राहतो. शांतता भंग होते. जर तुम्ही असा फोटो घरात लावला असेल तर तो आजच काढून टाका. त्याऐवजी सुंदर निसर्गाचे, हसऱ्या कुटुंबाचे फोटो लावा.

2. हिंस्र प्राण्यांचे फोटो टाळा

वाघ, सिंह, चित्ता अशा हिंस्र प्राण्यांचे फोटो पण घरात लावू नयेत असं वास्तुशास्त्र सांगतं. अनेक लोक शो म्हणून हॉलमध्ये वाघाचा मोठा फोटो लावतात. मात्र हे अशुभ मानलं जातं. हिंस्र प्राण्यांचे फोटो घरात लावल्याने घरातली पॉझिटिव्ह एनर्जी कमी होते आणि नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे घरात वास्तुदोष तयार होतो. तुमच्या कामात अडथळे येतात, मनात भीती राहते. त्यामुळे अशा प्राण्यांचे फोटो घरात लावणे टाळा. तुम्हाला प्राण्यांचे फोटो आवडत असतील तर सुंदर पक्षी, हरीण, हत्ती अशा शांत प्राण्यांचे फोटो लावा.

3. काटेरी झाडांचे फोटो लावू नका

निवडुंग, कॅक्टस अशा काटेरी झाडांचे फोटो पण घरात लावू नयेत. हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण वास्तुशास्त्रात असं सांगितलं आहे की काटेरी झाडांचे फोटो लावल्याने घराला बरकत राहत नाही. पैसा येतो पण टिकत नाही. काटेरी झाडं ही रुखक्षतेचं प्रतीक मानली जातात. त्यामुळे घरात पण तसाच रुक्षपणा येतो. नात्यांमध्ये दुरावा येतो. म्हणून घरात नेहमी हिरवीगार, फुलं असलेली, सुंदर झाडांचे फोटो लावा. त्याने घरात प्रसन्नता राहते.

Vastu Tips for Bedroom: बेडखाली चुकूनही ठेवू नका ‘या’ वस्तू! वास्तूशास्त्रानुसार घरच्या सुख-शांतीवर होऊ शकतो परिणाम

मग कोणते फोटो लावावेत?

घरात नेहमी सकारात्मकता देणारे फोटो लावा. वाहत्या पाण्याचे, उगवत्या सूर्याचे, सुंदर बागेचे, हसणाऱ्या मुलांचे फोटो लावा. देवांचे फोटो लावा. त्याने घरात शांतता राहते, लक्ष्मी टिकते.आपलं घर म्हणजे आपलं मंदिर आहे. तिथे काय लावतो, काय ठेवतो याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. चुकीचे फोटो असतील तर ते काढून टाका आणि चांगले, सकारात्मक फोटो लावा. नक्कीच फरक जाणवेल.

Ganesh Chaturthi: गणपती बाप्पांनी मूषकालाच का बनवले आपले वाहन? जाणून घ्या पौराणिक कथा

(टीप: ही माहिती वास्तुशास्त्राच्या सामान्य मान्यतांवर आधारित आहे. याचा उद्देश अंधश्रद्धा पसरवणे नाही, फक्त माहिती देणे आहे.)

 

Web Title: 4 types of photos you should avoid keeping on your home walls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 12:05 PM

Topics:  

  • daily vastu tips
  • vastu news
  • vastu sharatr

संबंधित बातम्या

Vastu Tips for Bedroom: बेडखाली चुकूनही ठेवू नका ‘या’ वस्तू! वास्तूशास्त्रानुसार घरच्या सुख-शांतीवर होऊ शकतो परिणाम
1

Vastu Tips for Bedroom: बेडखाली चुकूनही ठेवू नका ‘या’ वस्तू! वास्तूशास्त्रानुसार घरच्या सुख-शांतीवर होऊ शकतो परिणाम

Vastu Tips: छतावर कुंड्या ठेवणे का मानले जाते अशुभ? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या कारणे
2

Vastu Tips: छतावर कुंड्या ठेवणे का मानले जाते अशुभ? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या कारणे

Vastu Tips: तुमची ऑफिस बॅग कुठे असते? वास्तूनुसार चुकीच्या जागी ठेवल्यास करिअरवर होऊ शकतो परिणाम
3

Vastu Tips: तुमची ऑफिस बॅग कुठे असते? वास्तूनुसार चुकीच्या जागी ठेवल्यास करिअरवर होऊ शकतो परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.