Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Chaturthi 2026: पहिल्यांदाच घरच्या घरी गणपती बसवणार? बाप्पांची कृपा हवी असेल तर ‘या’ 7 गोष्टी लक्षात ठेवा

Ganesh Chaturthi 2026: गणेशोत्सवाला आता अवघे काही दिवस शिल्लक असून १४ सप्टेंबर २०२६ रोजी घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. यंदा घरगुती गणपती बसवताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा सल्ला या लेखातून देण्यात आला आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 08, 2026 | 02:10 PM
Ganesh Chaturthi 2026: पहिल्यांदाच घरच्या घरी गणपती बसवणार? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Ganesh Chaturthi 2026: पहिल्यांदाच घरच्या घरी गणपती बसवणार? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • शाडूची मूर्ती निवडा
  • स्थापनेनंतर काळजी घ्या
  • रोज पूजा-अर्चा
आता गणेशोत्सवाला अवघे 8 दिवस राहिले आहेत. 14 सप्टेंबर 2026 रोजी बाप्पा घरोघरी येणार आहेत. सगळीकडे तयारी सुरू झाली आहे. तुम्ही पण यंदा घरात गणपती बसवणार असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. बाप्पाला घरात आणताना काही छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं. नाहीतर पूजेचं फळ मिळत नाही असं सांगितलं जातं. चला तर मग बघूया कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. Ganesh Chaturthi 2026:

1. नेहमी शाडूची मूर्ती आणा

आजकाल बाजारात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या खूप मूर्ती मिळतात. दिसायला त्या सुंदर दिसतात मात्र त्या पर्यावरणाला हानी पोहोचवतात. शास्त्रानुसार पण शाडूच्या मातीची मूर्तीच शुभ मानली जाते. त्यामुळे यंदा शाडूचीच मूर्ती घरी आणा. मूर्ती घेताना अजून दोन गोष्टी बघा. बाप्पाची सोंड नेहमी डाव्या बाजूला असावी. उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा खूप कडक असते. डाव्या सोंडेचा गणपती प्रसन्न मानला जातो. आणि दुसरं म्हणजे मूर्ती बसलेली असावी, उभी नसावी. बसलेला गणपती स्थिरतेचं प्रतीक आहे. बाप्पा बरोबर त्याचा वाहन उंदीरमामा आहे का ते नक्की बघा.

2. एकदा स्थापना केली की मूर्ती हलवू नका

हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. अनेक लोक मूर्ती आणल्यानंतर जागा बदलत राहतात. इकडून तिकडे करतात. असं चुकूनही करू नका. एकदा तुम्ही गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केली की मूर्ती तिथून हलवायची नाही. थेट विसर्जनाच्या दिवशीच मूर्तीला हात लावायचा. त्यामुळे आधीच जागा नक्की करा आणि मगच मूर्ती ठेवा.

3. दिशा चुकली तर सगळं चुकलं

गणपती कुठे बसवायचा याला पण खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार बाप्पाला नेहमी पूर्व दिशेला किंवा ईशान्य कोपऱ्यात बसवावे लागते. हा कोपरा सर्वात शुभ मानला जातो. सकाळी ब्रह्म मुहूर्तावर स्थापना केली तर शुभ मानले जाते. चुकूनही दक्षिण दिशेला किंवा नैऋत्य कोपऱ्यात गणपती बसवू नका. ती अशुभ दिशा मानली जाते.

4. रोज सकाळ-संध्याकाळ आरती करा

तुम्ही दीड दिवस, 3 दिवस, 5 दिवस किंवा 10 दिवस गणपती ठेवत असाल, जितके दिवस बाप्पा घरी आहे तितके दिवस रोज सकाळी आणि संध्याकाळी आरती करावी लागते. आरती नाहीतर बाप्पाला नैवेद्य पण दाखवा. बाप्पाला मोदक आवडतो म्हणून नैवेद्य रोज गोडाचा असावा. ज्या घरात रोज आरती होते,तिथे बाप्पाची कृपा नेहमी राहते.

5. घर अंधारात ठेवू नका

जितके दिवस गणपती घरी आहे तितके दिवस घर कधीच बंद ठेवू नका. घरात कोणीतरी असावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे बाप्पा बसवला आहे तिथे कधीच अंधार होऊ देऊ नका. तिथे नेहमी दिवा लावून ठेवा. रोषणाई करा. रोज त्या जागेची साफसफाई करा. तसेच या 10 दिवसात घरात मांसाहार, दारू असं तामसिक जेवण बनवू नका, खाऊ नका. घर पवित्र ठेवा.

Mumbai Goa Highway Traffic: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार असाल तर महत्त्वाची बातमी! मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी

6. मूर्तीला तडा जाऊ देऊ नका

बाप्पाला बाजारातून घरी आणताना खूप काळजी घ्या. मूर्तीला कुठेही धक्का लागणार नाही, तडा जाणार नाही याची काळजी घ्या. तडा गेलेली मूर्ती पूजेत ठेवणे अशुभ मानले जाते. त्यामुळे मूर्ती आणताना व्यवस्थित पॅक करून आणा. घरी आणल्यावर पण लहान मुलांना मूर्तीपासून लांब ठेवा जेणेकरून ती पडणार नाही.तर मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत. यंदा बाप्पा घरी येतोय तर त्याचं स्वागत असं करा की त्याची कृपा वर्षभर तुमच्यावर राहील. गणपती बाप्पा मोरया!

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: 6 important rules to follow when bringing ganpati bappa home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • ganesh charuthi
  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganpati Festival

संबंधित बातम्या

Mumbai Goa Highway Traffic: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार असाल तर महत्त्वाची बातमी! मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी
1

Mumbai Goa Highway Traffic: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार असाल तर महत्त्वाची बातमी! मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी

Ganesh Chaturthi: गणपती बाप्पांनी मूषकालाच का बनवले आपले वाहन? जाणून घ्या पौराणिक कथा
2

Ganesh Chaturthi: गणपती बाप्पांनी मूषकालाच का बनवले आपले वाहन? जाणून घ्या पौराणिक कथा

गणपती बाप्पा मोरया! पण प्रवासाचे काय? कोकणकरांच्या आर्थिक लुटीविरोधात रत्नागिरीत आवाज बुलंद
3

गणपती बाप्पा मोरया! पण प्रवासाचे काय? कोकणकरांच्या आर्थिक लुटीविरोधात रत्नागिरीत आवाज बुलंद

नेरळच्या कुंभारवाड्यात ७५ वर्षांची परंपरा; शाडूच्या गणेशमूर्तींना विद्यार्थिनींचा हातभार
4

नेरळच्या कुंभारवाड्यात ७५ वर्षांची परंपरा; शाडूच्या गणेशमूर्तींना विद्यार्थिनींचा हातभार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.