Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashada Gupta Navratri: आषाढ गुप्त नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करा या देवीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत

आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्रीची सुरुवात बुधवार, 15 जुलैपासून होत आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. ब्रह्म म्हणजे कठोर तपश्चर्या आणि चारिणी म्हणजे तपश्चर्या करणारी. ब्रह्मचारिणीला ज्ञान आणि तपश्चर्येची देवी मानले जाते. ब्रह्मचारिणी देवीची पूजा करण्याची काय आहे पद्धत जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 16, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • आषाढ गुप्त नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करतात
  • ब्रम्हचारिणी देवीची पूजा करण्याची पद्धत
  • ब्रम्हचारिणी देवीच्या या मंत्रांचा करा जप
 

गुप्त नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्रीची सुरुवात बुधवार, 15 जुलैपासून झाली आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जुलै रोजी देवी दुर्गाच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाणार आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची कथा म्हणणे देखील शुभ मानले जाते. ‘ब्रह्म’ म्हणजे तपश्चर्या आणि ‘चारिणी’ म्हणजे तपश्चर्या करणारी. म्हणून, देवी ब्रह्मचारिणी ही तपश्चर्या करणारी देवी आहे. तिची पूजा केल्याने मनुष्य यम आणि नियमांच्या बंधनातून मुक्त होतो. तिची उपासना आणि प्रार्थना केल्याने सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते, आजार बरे होतात आणि शांती मिळते. माता ब्रह्मचारिणीची उपासना केल्याने प्रत्येक क्षेत्रात यश आणि समृद्धी मिळते. ती ज्ञान आणि तपश्चर्येची देवी म्हणून ओळखली जाते.

देवी पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. पांढरी साडी नेसलेल्या माता ब्रह्मचारिणीच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे. तिची पूजा केल्याने भगवान शिवदेखील प्रसन्न होतात. आषाढ गुप्त नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारिणी देवीची पूजा करण्याची काय आहे पद्धत जाणून घ्या

या पद्धतीने करा देवीची पूजा

सकाळी उठून आपली दैनंदिन कामे आवरून झाल्यानंतर स्नान करा. त्यानंतर, देवघराजवळ गंगाजल ओतून ते पवित्र करा. दिवा लावा आणि देवी दुर्गेच्या मूर्तीला किंवा फोटोला गंगाजलाने अभिषेक करून तिचे आवाहन करा. त्यानंतर, प्रसाद म्हणून तांदळाचे दाणे, कुंकू, लाल फुले, फळे आणि मिठाई अर्पण करा.

Kalidas Day: आषाढाच्या पहिल्या दिवशीच का साजरा केला जातो महाकवी कालिदास दिन

ब्रह्मचारिणी देवीच्या मंत्रांचा करा जप

यानंतर ब्रह्मचारिणी देवीला प्रसन्न करण्यासाठी तिच्या बीज मंत्राचा १०८ वेळा जप करा. याशिवाय ‘या देवी सर्वभूतेषु मां ब्रह्मचारिणी रूपेण संस्था । ‘नमस्तस्यै नमस्तेयै नमस्तेयै नमो नमः’ या मंत्राचा जप करणेही खूप शुभ मानले जाते.

Ashadha Month: आषाढ महिन्यात या कारणांसाठी टाळली जातात शुभकार्य, जाणून घ्या कारणे

शेवटी, देवी भगवतीला प्रसन्न करण्यासाठी आरती करा आणि दुर्गा चालिसा किंवा दुर्गा सप्तशतीचे पठण करा. भक्त आपल्या श्रद्धेनुसार हवन (अग्निहोत्र) देखील करू शकतात. असे केल्याने देवीच्या कृपेने त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: आषाढ गुप्त नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली जाते?

    Ans: दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. त्या तप, संयम, ज्ञान आणि साधनेचे प्रतीक मानल्या जातात.

  • Que: माता ब्रह्मचारिणीची पूजा का महत्त्वाची मानली जाते?

    Ans: या देवीची उपासना केल्याने मनःशांती, आत्मविश्वास, संयम आणि आध्यात्मिक प्रगती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

  • Que: गुप्त नवरात्रीत उपवास करणे आवश्यक आहे का?

    Ans: उपवास करणे बंधनकारक नाही. श्रद्धेनुसार उपवास, सात्त्विक आहार आणि देवीची भक्तिभावाने पूजा करता येते.

Web Title: Ashada gupta navratri worship goddess brahmacharini in this way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Navratri

संबंधित बातम्या

Kundli Dosh: कालसर्प ते गुरु चांडाळ, हे कुंडलीतील दोष मानले जातात सर्वांत धोकादायक
1

Kundli Dosh: कालसर्प ते गुरु चांडाळ, हे कुंडलीतील दोष मानले जातात सर्वांत धोकादायक

Dussehra 2026: २० की २१ ऑक्टोबर कधी आहे दसरा, जाणून घ्या रावण दहनाचा मुहूर्त आणि महत्त्व
2

Dussehra 2026: २० की २१ ऑक्टोबर कधी आहे दसरा, जाणून घ्या रावण दहनाचा मुहूर्त आणि महत्त्व

Navratri Special : “आयुष्यात सतत काहीतरी करत राहायचंय”; मिताली जगताप यांनी सांगितला संघर्षाचा प्रवास
3

Navratri Special : “आयुष्यात सतत काहीतरी करत राहायचंय”; मिताली जगताप यांनी सांगितला संघर्षाचा प्रवास

Navchandi Puja: शारदीय नवरात्रीत नवचंडी पूजा का केली जाते? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
4

Navchandi Puja: शारदीय नवरात्रीत नवचंडी पूजा का केली जाते? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.