Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dussehra 2026: २० की २१ ऑक्टोबर कधी आहे दसरा, जाणून घ्या रावण दहनाचा मुहूर्त आणि महत्त्व

Dussehra 2026: दसरा म्हणजेच विजयादशमीचा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. मात्र, यंदा दसरा २० की २१ ऑक्टोबरला साजरा करायचा, याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. जाणून घ्या विजयादशमीची योग्य तारीख, रावण दहनाचा शुभ मुहूर्त आणि या सणाचे धार्मिक महत्त्व.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 16, 2026 | 02:30 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • २० की २१ ऑक्टोबर कधी आहे दसरा
  • विजयादशमी हा सण वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याचे प्रतीक मानला जातो.
  • रावण दहनाचा मुहूर्त आणि महत्त्व
 

 

हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक असलेला दसरा सणाला विशेष महत्त्व आहे. दुसरं विशेष म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. दरवर्षी अश्विन शुक्ल महिन्यातील दशमी तिथीला सर्वत्र दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी प्रभू श्री रामांनी रावणावर विजय मिळवला होता. त्यामुळे आजही दसऱ्याच्या दिवशी रावण दहन केला जातो. यालाच वाईटावर केलेल्या विजयाचे प्रतीक मानले जाते.

या दिवशी शारदीय नवरात्रीची सांगता होते. जे भक्त नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतात. त्या उपवासाची या दिवशी पूर्णाहुती होते. दसऱ्याच्या दिवशी शस्त्राची पूजा केली जाते. यावर्षी नक्की दसरा कधी आहे. २० की २१ ऑक्टोबर, रावण दहनासाठी मुहूर्त कोणता आहे जाणून घेऊया..

कधी आहे दसरा?

अश्विन शुक्ल पक्षातील दशमी तिथीची सुरुवात मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी दुपारी १२.५० मिनिटांनी होणार आहे आणि या तिथीची समाप्ती २१ ऑक्टोबर रोजी दुपारी २.११ मिनिटांनी होणार आहे.

Navchandi Puja: शारदीय नवरात्रीत नवचंडी पूजा का केली जाते? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

प्रदोष व्रत, विजय मुहूर्त बघता मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी रावण दहन करणे शुभ मानले जाईल. त्यामुळे दसऱ्याचा सण मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. हे पंचांगानुसार दिसते.

रावण दहनासाठी मुहूर्त

दसऱ्याच्या दिवशी विजय मुहूर्त २० ऑक्टोबर रोजी दुपारी १.५९ ते २.४५ पर्यंत आहे. दुपारी पूजा करण्याचा मुहूर्त १.१० ते ३.३० यावेळी श्रवण नक्षत्राची सुरुवात होणार आहे‌. १९ ऑक्टोबर रोजी ३.३८ मिनिटांनी होईल. नक्षत्र समाप्ती २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.२ वाजता होईल. यावेळी प्रदोष मुहूर्त २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.४७ वाजता असेल. दसऱ्याच्या दिवशी रावण दहन प्रदोष काळात केले जाते. त्यामुळे ते ५.४७ नंतर करणे योग्य मानले जाईल.

दसऱ्याचे महत्त्व

दसऱ्याला विजयादशमी देखील म्हटले जाते. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. या दिवशी शारदीय नवरात्रीची सांगता होते आणि प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला होता. यामुळेच वाईटावर विजयाचे प्रतीक मानले जाते.

विजयदशमीचा अर्थ आहे ‘विजयाची दशमी’ याचा अर्थ असा होतो की असत्यावर सत्याचा विजय. या दिवशी केले जाणारे रावण दहनाचा अर्थ आहे वाईटाचे दान करणे. रावणाचे दहा डोके हे नकारात्मक गुणांचे प्रतीक मोते आणि त्याच्या पुतळ्याचे दहन म्हणजे वाईट शक्तीचे दहन आहे.

Mata Vaishno Devi: ‘जय माता दी’चा जयघोष अन् नऊ महिन्यांची तपश्चर्या; जाणून घ्या वैष्णोदेवी मंदिराची पौराणिक कथा

वाईटांवर चांगल्या गुणांचे प्रतीक असलेला दसरा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. जो की देशातच नाही तर पूर्ण जगात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

शस्त्र पूजेचा इतिहास आणि महिषासुराच्या वधाशी संबंधित रहस्य

शस्त्रपूजेची ही महान परंपरा केवळ शस्त्रांच्या पूजेपुरती मर्यादित नाही, तर ती थेट धर्म, न्याय आणि अधर्माच्या नाशा सोबत जोडलेली आहे. पौराणिक मान्यतेनुसार, विजयादशमीचा हा पवित्र सण, भगवान श्री रामाने लंकेचा राजा रावणाचा वध केल्याचे आणि माता दुर्गेने दृष्ट महिषासुराचा वध केल्याचे सर्वात मोठे प्रतीक मानले जाते. ज्यावेळी महिषासुराच्या दहशतीपुढे देवांची शक्तीदेखील क्षीण होऊ लागली, तेव्हा माता दुर्गेने आपली सर्व शस्त्रे उगारून त्याचा अंत केला. प्राचीन काळापासून असा विश्वास आहे की, अन्यायाचा नाश करण्यासाठी आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी शस्त्रांचा आदर करणे आवश्यक आहे, ज्यामुळे आपण प्रत्येक परिस्थितीत विजयी होऊ शकतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Dussehra 2026 date ravana dahan shubh muhurat vijayadashami significance pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Dussehra
  • Hindu Festival
  • hindu religion

संबंधित बातम्या

Mata Vaishno Devi: ‘जय माता दी’चा जयघोष अन् नऊ महिन्यांची तपश्चर्या; जाणून घ्या वैष्णोदेवी मंदिराची पौराणिक कथा
1

Mata Vaishno Devi: ‘जय माता दी’चा जयघोष अन् नऊ महिन्यांची तपश्चर्या; जाणून घ्या वैष्णोदेवी मंदिराची पौराणिक कथा

Bhulabai festival: भुलाबाईच्या गाण्यांनी रंगते अंगण; जाणून घ्या उत्सवाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व कीवर्ड दे
2

Bhulabai festival: भुलाबाईच्या गाण्यांनी रंगते अंगण; जाणून घ्या उत्सवाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व कीवर्ड दे

Swami Samarth Maharaj: स्वामी समर्थांच्या देवीशृंगारामागे काय आहे कारण? जाणून घ्या अध्यात्मिक अर्थ
3

Swami Samarth Maharaj: स्वामी समर्थांच्या देवीशृंगारामागे काय आहे कारण? जाणून घ्या अध्यात्मिक अर्थ

Tula Sankranti: १७ ऑक्टोबर रोजी सूर्य करणार तूळ राशीत प्रवेश, स्नान आणि दान करण्यासाठी काय आहे सर्वोत्तम मुहूर्त जाणून घ्या
4

Tula Sankranti: १७ ऑक्टोबर रोजी सूर्य करणार तूळ राशीत प्रवेश, स्नान आणि दान करण्यासाठी काय आहे सर्वोत्तम मुहूर्त जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.