Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadha Purnima 2026: आषाढ पौर्णिमेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा उपाय, येईल सुख समृद्धी

बुधवार, २९ जुलै रोजी आषाढ पौर्णिमा आहे. या दिवशी तुम्ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि धनप्राप्तीसाठी काही उपाय करणे फायदेशीर ठरतील. आषाढ पौर्णिमेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करायचे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 19, 2026 | 08:50 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी  आषाढ पौर्णिमेला करा हे उपाय
  • आषाढ पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते
  • आषाढ पौर्णिमेला काय आहे महत्त्व
 

बुधवार, २९ जुलै रोजी आषाढ पौर्णिमा आहे. पंचांगानुसार, या वर्षीची आषाढ पौर्णिमेची सुरुवात २८ जुलै रोजी सायंकाळी ६:१८ वाजता होणार आहे आणि पौर्णिमेची समाप्ती २९ जुलै रोजी रात्री ८:०५ वाजता होईल. आषाढ पौर्णिमेला लोक उपवास करतात आणि देवी लक्ष्मी आणि चंद्राची पूजा करतात. आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा देखील साजरी केली जाते. जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल, तुमची आर्थिक परिस्थिती बिकट असेल किंवा तुम्ही उत्पन्न मिळवू शकत नसाल, तर आषाढ पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्याचसोबत घरामध्ये सुख समृद्धी येते आणि आर्थिक स्थिती देखील सुधारते, असे देखील म्हटले जाते. आषाढ पौर्णिमेला कोणते उपाय करायचे जाणून घ्या

आषाढ पौर्णिमेला करा हे उपाय

आर्थिक लाभासाठी उपाय

धनप्राप्तीसाठी, प्रदोष काळात आषाढ पौर्णिमेला गणेश आणि कुबेर यांच्यासोबत देवी लक्ष्मीची पूजा करावी. लक्ष्मी पूजेने मिळणारे धन आणि समृद्धी कायमस्वरूपी नसते. त्यांच्यासोबत गणेश आणि कुबेर यांची पूजा केल्याने स्थिर धनप्राप्ती होते.

Numberlogy:  मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

तुपाचा दिवा लावणे

आषाढ पौर्णिमेला सूर्यास्तानंतर आणि अंधार पडल्यावर तुपाचा दिवा लावा. तुमच्या देवघरात देवी लक्ष्मी आणि इतर सर्व देवतांच्या प्रतिमेची पूजा करा. त्यानंतर, तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढा आणि त्यावर दिवा ठेवा. जोपर्यंत दिवा जळत आहे, तोपर्यंत मुख्य दरवाजा उघडा ठेवा. प्रदोष काळात केर काढू नका, हे लक्षात ठेवा.

मंत्रांचा जप

आषाढ पौर्णिमेच्या प्रदोष काळात तुम्ही देवी लक्ष्मीची पूजा करता तेव्हा कमलगट्टा जपमाळेने महालक्ष्मी मंत्राचा जप करा. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीध ओम श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मीयै नमः महालक्ष्मी हा मंत्र आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही माता लक्ष्मीच्या बीज मंत्राचा जप करू शकता, ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभयो नमः किंवा संपत्ती मिळविण्यासाठी मंत्र: ओम श्रीं महालक्ष्मीयै नमः. निशिता मुहूर्तावरही तुम्ही या मंत्रांचा जप करू शकता.

कौटुंबिक सुख-समृद्धीसाठी उपाय

आपल्या कौटुंबिक सुख-समृद्धीसाठी आषाढ पौर्णिमेच्या संध्याकाळी देवी लक्ष्मी आणि भगवान नारायण यांची पूजा करा. लक्ष्मी आणि नारायण यांच्या आशीर्वादाने तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल. त्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना कमळाची फुले अर्पण करा.

Ashada Gupta Navratri: आषाढ गुप्त नवरात्रीचा पाचवा दिवशी करा स्कंदमाता देवीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत आणि देवीचे स्वरुप

कासवाची अंगठी परिधान करणे

आषाढ पौर्णिमेच्या संध्याकाळी तुम्ही तुमच्या उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये कासवाची अंगठी घालू शकता. ती चांदीची असावी. कासव हे भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते, कारण त्यांनी कूर्म अवतार घेतला होता. ही अंगठी धारण केल्याने तुमच्या सुख, समृद्धी आणि संपत्तीची शक्यता वाढेल.

आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते

आषाढ पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आषाढ पौर्णिमेला साजरी होणारी गुरुपौर्णिमा ही महर्षी वेदव्यास यांच्या जयंतीनिमित्त साजरी केली जाते. या दिवशी गुरुंच्या ज्ञान, मार्गदर्शन आणि संस्कारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. भारतीय संस्कृतीत गुरुंना देवतुल्य स्थान असल्याने गुरुपौर्णिमेला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: आषाढ पौर्णिमेला देवी लक्ष्मीची पूजा का केली जाते?

    Ans: आषाढ पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी, धनधान्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

  • Que: आषाढ पौर्णिमेला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावेत?

    Ans: कमळाची फुले अर्पण करणे, श्रीसूक्त किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण, तुपाचा दिवा लावणे, खीर किंवा गोड नैवेद्य अर्पण करणे आणि गरजूंना दान करणे शुभ मानले जाते.

  • Que: आषाढ पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा एकाच दिवशी असतात का?

    Ans: होय. आषाढ महिन्यातील पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. हा दिवस महर्षी वेदव्यास आणि गुरुंच्या पूजनासाठी विशेष मानला जातो.

Web Title: Ashadha purnima 2026 to please goddess lakshmi do remedies on ashadh purnima

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 08:50 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
1

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Ashada Gupta Navratri: आषाढ गुप्त नवरात्रीचा पाचवा दिवशी करा स्कंदमाता देवीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत आणि देवीचे स्वरुप
2

Ashada Gupta Navratri: आषाढ गुप्त नवरात्रीचा पाचवा दिवशी करा स्कंदमाता देवीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत आणि देवीचे स्वरुप

Jagannath Rath Yatra 2026: भगवान जगन्नाथांच्या तीन रथांचे महत्त्व काय? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
3

Jagannath Rath Yatra 2026: भगवान जगन्नाथांच्या तीन रथांचे महत्त्व काय? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Hanuman Temple USA: अमेरिकेतील हनुमान मंदिरांचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि धार्मिक महत्त्व
4

Hanuman Temple USA: अमेरिकेतील हनुमान मंदिरांचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.