
फोटो सौजन्य- pinterest
आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी तसेच इतर धार्मिक पर्वांच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूर येथे भगवान विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. दर्शनापूर्वी चंद्रभागा नदीत स्नान करण्याची परंपरा अनेक शतकांपासून सुरू आहे. हिंदू धर्मात चंद्रभागा नदीला अत्यंत पवित्र मानले जाते. या नदीत श्रद्धेने स्नान केल्याने मन, शरीर आणि आत्म्याची शुद्धी होते तसेच भगवान विठ्ठलाची कृपा प्राप्त होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्याचे काय महत्त्व आहे ते सविस्तर जाणून घेऊया
पंढरपूरला जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांची एक इच्छा असते. विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी चंद्रभागा नदीत स्नान करण्याची. वारकरी परंपरेत या स्नानाला केवळ शारीरिक स्वच्छता नव्हे, मन, विचार आणि जीवन शुद्ध करण्याचं प्रतीक मानलं जातं. भीमा नदी पंढरपूरजवळ अर्ध्या चंद्रासारखं सुंदर वळण घेते त्यामुळेच या ठिकाणी तिला चंद्रभागा असं नाव मिळालयं. ही नदीच वारकऱ्यांसाठी पवित्र मानली जाते. वारकरी परंपरेनुसार चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेतल्यास मनातील अहंकार, मत्सर आणि नकारात्मक विचार दूर होतात.
हे स्नान म्हणजे देवदर्शनासाठी मनाची तयारी मानली जाते. वारकरी संतांनी बाह्य स्नाना इतकंच अंतःकरण शुद्ध असण्याचा संदेश दिला आहे. चंद्रभागेतील स्नान हे केवळ पाण्यात डुबकी मारणं नसून मनातील वाईट प्रवृती सोडून प्रेम, समता आणि भक्ती स्वीकारण्याचा संकल्प आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी लाखो वारकरी चंद्रभागेत स्नान करतात. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन नामस्मरण, भजन आणि कीर्तनात सहभागी होतात.
आजच्या काळात चंद्रभागेचं पावित्र्य जपण ही प्रत्येक भाविकाची जबाबदारी झाली आहे. नदीत प्लास्टिक, कचरा किंवा पूजेचं साहित्य टाकणे टाळा. स्वच्छता राखा आणि नदीचं संवर्धन करणे हीच खरी सेवा आहे.
लोकमान्यतेनुसार, भगवान विठ्ठलाच्या पावन स्पर्शामुळे चंद्रभागा नदी अधिक पवित्र झाली. या नदीत स्नान करून भक्तिभावाने विठ्ठलाचे दर्शन घेतल्यास पुण्यप्राप्ती होते आणि जीवनात सुख-समृद्धी लाभते, अशी श्रद्धा आहे. या श्रद्धा धार्मिक परंपरेवर आधारित असून त्यांना ऐतिहासिक किंवा वैज्ञानिक पुष्टी आवश्यकच असेल असे नाही.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: धार्मिक श्रद्धेनुसार, चंद्रभागा नदीत स्नान केल्याने मन शुद्ध होते आणि त्यानंतर विठ्ठलाचे दर्शन अधिक पुण्यदायी मानले जाते.
Ans: वारकरी संप्रदायात चंद्रभागा नदीला पवित्र मानले जाते. या नदीत स्नान करून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेणे ही शतकानुशतके चालत आलेली परंपरा आहे.
Ans: धार्मिक मान्यतेनुसार, चंद्रभागेत स्नान केल्याने मनःशांती मिळते, नकारात्मक विचार दूर होतात आणि भक्तिभाव अधिक दृढ होतो. श्रद्धेनुसार हे स्नान आत्मशुद्धीचे प्रतीक मानले जाते.