Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi Ekadashi 2026: विठुरायाचे दर्शन होणार सुलभ! वारकऱ्यांची सोय; १२९.४८ कोटींचे दर्शन मंडप व नवीन स्काय वॉक

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चैत्र, आषाढी, कार्तिकी आणि माघ यात्रांसह वर्षभरात एक कोटींहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः यात्राकाळात लाखो वारकरी आणि भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने दर्शनासाठी अनेक तास प्रतीक्षा करावी लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 07, 2026 | 01:51 PM
विठुरायाचे दर्शन होणार सुलभ! वारकऱ्यांची सोय; १२९.४८ कोटींचे दर्शन मंडप व नवीन स्काय वॉक

विठुरायाचे दर्शन होणार सुलभ! वारकऱ्यांची सोय; १२९.४८ कोटींचे दर्शन मंडप व नवीन स्काय वॉक

Follow Us
Follow Us:

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यभरातून तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुविधेसाठी राज्य शासनाच्या वतीने १२९.४८ कोटी रुपये खर्चुन अत्याधुनिक दर्शन मंडप आणि नवीन स्काय वॉक उभारण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पाया खोदाईच्या कामाला वेग आला असून, काम पूर्ण झाल्यानंतर टोकन पद्धतीने नियोजित वेळेत दर्शनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भाविकांना तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नसून, कमी वेळेत श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन घेणे शक्य होणार आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Ashadhi Wari 2026: वारकऱ्यांनो आळंदीत येऊ नका! इंद्रायणीला महापूर, देवस्थानचे आवाहन

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चैत्र, आषाढी, कार्तिकी आणि माघ यात्रांसह वर्षभरात एक कोटींहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः यात्राकाळात लाखो वारकरी आणि भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने दर्शनासाठी अनेक तास प्रतीक्षा करावी लागते. सध्या मंगळवेढा रस्त्यालगत उभारलेल्या तात्पुरत्या पत्राशेडमधील दर्शनबारीचा वापर केला जात असून, तेथील सुविधा अपुऱ्या पडत आहेत.यामुळे राज्य शासनाने सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज कायमस्वरूपी दर्शन मंडप उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

फक्त दोन वर्षांनंतर बदलणार दर्शन व्यवस्था

प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील दर्शन व्यवस्थेत मोठा बदल होणार आहे. टोकन पद्धतीमुळे भाविकांना निश्चित वेळेत दर्शनाची सुविधा मिळणार असून, रांगेत तासनतास थांबण्याची गरज कमी होईल. नवीन दर्शन मंडप आणि आधुनिक स्काय वॉकमुळे गर्दीचे नियोजन अधिक प्रभावी होणार असून, भाविकांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे. यात्राकाळातील वाढत्या गर्दीचा ताण कमी करण्यासही या प्रकल्पाची महत्त्वाची भूमिका राहणार आहे.

या सुविधांचा समावेश

  • टोकन-आधारित दर्शन व्यवस्था
  • प्रशस्त वातानुकूलित प्रतीक्षागृह
  • स्वच्छतागृहे व शुद्ध पिण्याचे पाणी
  • बसण्याची सुसज्ज व्यवस्थ
  • भाविकांसाठी आधुनिक सुविधा व सुव्यवस्थित प्रवेश व्यवस्था
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची देहूत विशेष तयारी; तब्बल ‘इतक्या’ कॅमेऱ्यांची असणार नजर

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • प्रकल्प खर्च : १२९.४८ कोटी
  • नवीन व अधिक रुंद स्काय वॉक
  • यात्राकाळातील गर्दीवर प्रभावी नियंत्रण
  • दर्शनासाठी प्रतीक्षा वेळेत मोठी बचत
  • दोन वर्षात काम पूर्ण करण्याचे नियोजन
  • वर्षाला एक कोटींहून अधिक भाविकांना होणार लाभ

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

 

Web Title: Ashadhi ekadashi 2026 easier darshan of lord vitthal convenience for warkaris darshan mandap and new skywalk worth 129 48 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 01:51 PM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • Ashadhi Wari 2026
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.