Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: धार्मिकच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत पूजेमधील हे घटक

गुलाल, विभूती, अष्टगंध आणि चंदन याला अनन्यसाधारण पारंपरिक महत्त्व आहे. वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर या सर्व पावडर किंवा संमिश्रे आहेत. मात्र अध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर या पवित्र गोष्टी आहेत.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 22, 2026 | 09:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • गुलाल, विभूती, अष्टगंध आणि चंदन यांचे धार्मिक महत्त्व
  • पूजेमधील घटकांचे धार्मिक आणि आरोग्यदायी फायदे
  • पूजेतील सामानाचे काय आहे महत्त्व
 

हिंदू धर्मातील पूजाविधीत वापरल्या जाणाऱ्या गुलाल, विभूती, अष्टगंध आणि चंदन या घटकांना अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण स्थान आहे. प्रत्येक घटकाचा वापर देवपूजेत विशिष्ट कारणासाठी केला जातो. यासोबतच याचा आरोग्यासाठी देखील फायदा होतो, कसा ते तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या

गुलालाचे धार्मिक महत्त्व

गुलाल हा उत्सवात वापरण्याची प्रथा आहे. विविध समारंभात गुलाल उधळला जातो. गुलाल हे आनंद आणि प्रेम याचेही प्रतीक आहे. होळी सणात गुलाल वापरला जातो. मुख्यत: राजकीय कार्यक्रमात गुलाल उधळला जातो. रासायनिक गुलाल हा मर्कुरी सल्फेटपासून बनवतात. रासायनिक गुलालामुळे त्वचा रोग, अस्थमा किंवा कॅन्सर सारखे रोग होऊ शकतात. त्यामुळे नैसर्गिक गुलाल वापरण्यास प्राधान्य दिले पाहिजे.

शेंदूरचा कसा केला जातो वापर

शेंदूर हा ग्रामीण भागात दगडाच्या मूर्तींचे मांजन करण्यासाठी वापरली जाते. विशेषतः मारुती, गणपती, म्हसोबा आणि ग्रामीण देव देवता यांच्या मूर्तींना शेंदूर वापरला जातो. शेंदूर हा तेलात ओला करून वापरतात. शेंदूर हा शास्त्रीयदृष्ट्या लाल रेड ऑक्साईड आहे. सेंदूर आणि सिंदूर यात फरक आहे हे लक्षात ठेवावे.

Numberlogy:  मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

विभूतीचे आध्यात्मिक महत्त्व आणि फायदे

विभूती ही सफेद असून अनेक पंथामध्ये ती कपाळाला आणि अंगाला लावली जाते. विभूती हे एक भस्म म्हणून त्यावर बोटे घासून ती अंगाला लावतात. विभूती ही कपाळ, मान आणि छाती या ठिकाणी लावण्याचा प्रघात आहे. शिव पंथात विभूती लावली जाते. विशेषतः लिंगायत पंथामध्ये या विभूतीचा वापर धार्मिक कार्यक्रम व पूजा यामध्ये केला जातो. विभूती लावली तर सकारात्मक भाव निर्माण होतो तसेच मानसिक शांतता प्राप्त होते असे अध्यात्म सांगते. विभूती ही लाकूड व गाईचे शेण यांना जाळून एका विशिष्ट अशा प्रक्रियेने तयार केली जाते. एकंदर विभूती ही गाईच्या शेणाला जाळून तयार केलेली राख असून तीला पवित्र स्थान आहे. शास्त्रीय दृष्ट्या विभूति शरीरावर लावली तर ती विविध रोग जंतू पासून शरीराचे संरक्षण करते.

अष्टगंध म्हणजे काय

अष्टगंध हा आठ प्रकारची जड़ी किंवा सुगंध मिसळून केला जातो. अष्टगंधामध्ये आठ पदार्थ असतात- चंदन, केशर , कापूर, अगर , जटामांसी , कुमकुम , गोरोचन , कचूर .असे मानले जाते की हे आठ पदार्थ सर्व ग्रहांना शांत करतात. त्याचा वापर करून ग्रहांचे दुष्प्रभाव कमी होतात असे अध्यात्म शास्रात मानले जाते. असा हा अष्टगंध टिळा म्हणून कपाळावर लावला जातो. असे मानले जाते की ते अष्टगंध नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि सकारात्मकता वाढवतो. अष्टगंधामुळे मन शांत आणि स्थिर होते.

Hindu Religion: मे महिन्यात होतोय लक्ष्मी नारायण योग, मिथुनसह 3 राशींवर देवीची होणार कृपा; लाभाची संधी

चंदनामध्ये असलेले पवित्र गुण

चंदनला अध्यात्मिक दृष्टीने अत्याधिक महत्त्व आहे.चंदन उगाळून कपाळाला नाम काढतात. चंदनाचा टिळा शुभ कार्यात लावतात. देवाच्या मूर्तीला सुद्धा चंदनाचा लेप लावतात. चंदन लावल्याने थंडावा तयार होतो आणि तणाव कमी होतो.

अशा प्रकारे कुंकू, हळद, बुक्का ,शेंदूर, गुलाल, विभूती, अष्टगंध आणि चंदन हे ग्रामीण संस्कृती व अध्यात्म यांचे महत्त्वाचे अंग आहे. अध्यात्मिक नाही तर शास्त्रीय दृष्टिकोणातूनही या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मानवी जीवन हे काही अंशी शांत, संयमी, स्थिर आणि तणावमुक्त करण्यात कुंकू, हळद, बुक्का ,शेंदूर, गुलाल ,विभूती, अष्टगंध आणि चंदन हे प्राचीन काळापासून उपयोगी ठरले आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Astro tips what is the religious significance of gulal vibhuti ashtagandha and sandalwood in worship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • astro tips
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Trikal Sandhya: त्रिकाल संध्या म्हणजे काय? प्रातः, माध्यान्ह आणि सायंसंध्येचे महत्त्व जाणून घ्या
1

Trikal Sandhya: त्रिकाल संध्या म्हणजे काय? प्रातः, माध्यान्ह आणि सायंसंध्येचे महत्त्व जाणून घ्या

Chanakya Niti: लग्नाआधी मुलाची कमाईच नाही, ‘या’ 5 गोष्टी नक्की तपासा; चाणक्य नीतीत दिला आहे खास सल्ला
2

Chanakya Niti: लग्नाआधी मुलाची कमाईच नाही, ‘या’ 5 गोष्टी नक्की तपासा; चाणक्य नीतीत दिला आहे खास सल्ला

Mangalsutra: शुभ कामात काळा रंग वर्ज्य, मग मंगळसूत्रात काळे मणी का असतात? जाणून घ्या धार्मिक आणि पौराणिक मान्यता
3

Mangalsutra: शुभ कामात काळा रंग वर्ज्य, मग मंगळसूत्रात काळे मणी का असतात? जाणून घ्या धार्मिक आणि पौराणिक मान्यता

Balram Jayanti: श्रीकृष्णाचे भाऊ बलराम ‘हलधर’ म्हणून का ओळखले जातात? जाणून घ्या पौराणिक कथा
4

Balram Jayanti: श्रीकृष्णाचे भाऊ बलराम ‘हलधर’ म्हणून का ओळखले जातात? जाणून घ्या पौराणिक कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.