Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips : यज्ञातील आहुतीसाठी चंदन-आंब्याचीच लाकडं का वापरतात ? जाणून घ्या प्राचीन परंपरेमागचं शास्त्र

हिंदू धर्मात यज्ञ, हवन किंवा अग्निहोत्र करताना अग्निदेवतेला आहुती देण्यासाठी चंदन आणि आंब्याच्या लाकडांना विशेष महत्त्व दिलं जातं. यामागे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक अशी अनेक कारणं सांगितली जातात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 12, 2026 | 06:28 PM
Astro Tips : यज्ञातील आहुतीसाठी चंदन-आंब्याचीच लाकडं का वापरतात ? जाणून घ्या प्राचीन परंपरेमागचं शास्त्र
Follow Us
Follow Us:
  • यज्ञातील आहुतीसाठी चंदन-आंब्याचीच लाकडं का वापरतात ?
  • जाणून घ्या प्राचीन परंपरेमागचं शास्त्र
Astro Tips :  हिंदू धर्म हा निरर्ग च्रकावर आधारित आहे. विविध पुराणकथांमध्ये काही संदर्भ आहेत. जसं की, सत्यनारायणाच्या पुजेसाठी केळीचे खांब लागतात. त्याचप्रमाणे घरातील कोणत्याही शुभकार्याला गृहप्रवेश किंवा वास्तुशांतीला अग्नीदेवतेला आहुती देण्य़ासाठी आंब्याची किंवा चंदनाची लाकडं वापरतात. पण हीच का तर यामागे देखील एक शास्त्र आहे.

हिंदू धर्मात अग्निदेवाला देव आणि मानव यांच्यामधील दूत मानलं जातं. यज्ञ किंवा हवनात दिलेली आहुती अग्निदेव देवतांपर्यंत पोहोचवतात, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे आहुतीसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू पवित्र आणि सात्त्विक असाव्यात, याला विशेष महत्त्व दिलं जातं. चंदन आणि आंब्याची लाकडं याच कारणामुळे धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानली जातात.

धार्मिक ग्रंथांनुसार चंदन हे भगवान विष्णू आणि भगवान शिव यांना प्रिय आहे. चंदनाचा सुगंध मन आणि वातावरण शुद्ध करतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे यज्ञात चंदनाची आहुती दिल्यास देवता प्रसन्न होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असं सांगितलं जातं. अनेक पुराणांमध्ये चंदनाला सात्त्विकता, शांती आणि पावित्र्याचं प्रतीक मानलं गेलं आहे.

Vastu Tips: फ्रिजवर या वस्तू ठेवल्यास वाढू शकतात अडचणी, काय सांगते वास्तुशास्त्र

आंब्याच्या झाडालाही हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. आंब्याची पानं शुभकार्यांमध्ये तोरण म्हणून लावली जातात. धार्मिक मान्यतेनुसार आंब्याच्या वृक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो आणि तो समृद्धीचं प्रतीक मानला जातो. म्हणूनच यज्ञात आंब्याच्या समिधा म्हणजे लाकूड वापरणं शुभ मानलं जातं. वेदांमध्ये आंब्याच्या लाकडातून निर्माण होणारा अग्नी पवित्र आणि देवतांना प्रिय असल्याचा उल्लेख आढळतो.

काही दंतकथांमध्ये असंही सांगितलं जातं की, ऋषी-मुनी यज्ञ करताना मुख्यतः आंबा, पिंपळ, पलाश आणि चंदनाच्या समिधांचा वापर करत असत. या वृक्षांमध्ये दैवी ऊर्जा असल्याची श्रद्धा होती. त्यामुळे या लाकडांच्या आहुतीमुळे यज्ञ अधिक फलदायी होतो आणि इच्छित मनोकामना पूर्ण होतात, असं मानलं जातं.
याच परंपरांमुळे आजही हवन-यज्ञामध्ये चंदन आणि आंब्याच्या लाकडांना विशेष महत्त्व दिलं जातं.

चंदनाची लाकडं शुभ का मानली जातात?
याची शास्त्रीय कारणं अशी की, काही संशोधनांनुसार हवनात वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट लाकडांमुळे वातावरणातील काही जंतू आणि दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. चंदनाचा सुगंध मानसिक शांतता देतो, तर आंब्याच्या लाकडामुळे निर्माण होणारी उष्णता जीवजंतूंना मारते . यामुळेच अग्निदेवतेला आहुती देताना चंदन आणि आंब्याची लाकडं शुभ, पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा देणारी मानली जातात.

Vastu Tips: घरात चिंचेचे रोप लावणे का मानले जाते अशुभ, जाणून घ्या काय सांगते वास्तुशास्त्र

Web Title: Astro tips why are sandalwood and mango wood used for offerings in yagnas learn the science behind the ancient tradition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • hindu religion
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.