फोटो सौजन्य- pinterest
जपमाळ रुद्राक्ष, तुळस, स्फटिक किंवा मोत्याने बनलेली असते. या माळांमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो. या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्ध होते. चित्त एकाग्र वाढते, कुविचार मनात येत नाहीत. देवाचे जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते, त्यामध्ये 108 मणी असतात. माळेमध्ये 108 च मणी का असतात? यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे.
देवाच्या नामस्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी, ऋषीमुनी, संत हा उपाय मानतात. जपासाठी माळेची आवश्यकता असते आणि याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही. रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतीक आहे. रुद्रक्षामध्ये सूक्ष्म किटाणू नष्ट करण्याची शक्ती असते. रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोहोचवते.
जप करताना माळ आवश्यक आहे. जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केला तर योग्य राहते. यासाठी माळेचा उपयोग केला जातो. वेगवेगळे कारणं ज्या आधारावर माळेमध्ये 108 मणी ठेवले जातात. माळेमध्ये १०८ मोती का असतात, यासंबंधी शास्त्रामध्ये काय सांगितले आहे ते जाणून घ्या

दिवसभरात जेवढ्या वेळेस श्वास घेतो, त्याच्याशीच माळेच्या मण्यांची संख्या 108 चा संबंध आहे. सामान्यतः 24 तासांमध्ये व्यक्ती 21600 वेळेस श्वास घेतो. दिवसातील 24 तासांमधील 12 तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक 12 तासांमध्ये व्यक्ती 10800 वेळेस श्वास घेतो. याचा काळामध्ये देवी-देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे. शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या 12 तासांमध्ये 10800 वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे, परंतु हे शक्य नाही. यासाठी 10800 वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे दोन शून्य काढून जपासाठी 108 संख्या ठरवलेली आहे.
या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये 108 मणी असतात. आणखी एका मान्यतेनुसार माळेमधील 108 मणी आणि सूर्याच्या कलांचा संबंध आहे. एक वर्षामध्ये सूर्य 21600 कला बदलतो. सूर्य वर्षभरात दोन वेळेस आपली स्थिती बदलतो. सहा महिने उत्तरायण आणि सहा महिने दक्षिणायन. अशाप्रकारे सूर्य सहा महिन्यातील एका स्थितीमध्ये 10800 वेळेस कला बदलतो. याच 10800 संख्येमधील शेवटचे दोन शून्य काढून माळेमध्ये 108 मण्यांची संख्या निश्चित केली आहे. माळेचा एक- एक मोती सूर्याच्या कलेचे प्रतिक आहे. सूर्य एकमात्र साक्षात दिसणारे देवता आहेत.
तसेच 27 नक्षत्र आहेत. प्रत्येक नक्षत्राचे चार चरण असतात आणि 27 नक्षत्रांचे एकूण 108 चरण असतात. माळेचा एक-एक मोती नक्षत्राचा एक-एक चरणाचे प्रतिनिधित्व करतो. 108 हा अंक पार केला की जपमाळेत एक मेरुमणी असतो. तो 108 अंक पूर्ण झाल्याची सूचना हाताला होते. त्यामुळे नेहमी 108 मन्याची माळेचा जप करण्याची प्रथा आहे. त्यामुळे जपमाळ 108 मण्याची असते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: जपमाळ ही मंत्र जप करताना मोजणी करण्यासाठी वापरली जाणारी माळ आहे. ती रुद्राक्ष, तुळस, स्फटिक किंवा मोत्यांपासून बनवलेली असते.
Ans: मानवी शरीर २४ तासांत सुमारे २१६०० वेळा श्वास घेतो. त्यातील अर्ध्या वेळेस (१०८००) ध्यान अपेक्षित आहे. त्यातूनच १०८ ही संख्या जपासाठी स्वीकारली गेली.
Ans: १०८ मण्यांनंतर एक विशेष मणी असतो, त्याला मेरुमणी म्हणतात. तो जपाची एक फेरी पूर्ण झाल्याचे दर्शवतो.