Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solar Eclipse: अमावस्या-पौर्णिमेलाच का लागते ग्रहण? जाणून घ्या यामागचं खगोलशास्त्रीय कारण

ग्रहण म्हटलं की आपल्या मनात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाची प्रतिमा उभी राहते. पण तुम्हाला माहिती आहे का, सूर्यग्रहण अमावस्येलाच आणि चंद्रग्रहण पौर्णिमेलाच का होते? यामागे कोणताही योगायोग नसून सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्या विशिष्ट स्थितीचा महत्त्वाचा संबंध आहे. जाणून घेऊया यामागील खगोलशास्त्रीय कारणे

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 24, 2026 | 08:45 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • अमावस्या-पौर्णिमेलाच का लागते ग्रहण?
  • अमावस्या-पौर्णिमेलाच ग्रहण लागण्यामागे खगोलशास्त्रीय कारण काय
  • ग्रहणांमागे कोणती कथा सांगण्यात आलेली आहे
 

 

ग्रहण ही एक सामान्य पण आकर्षक खगोलशास्त्रीय घटना आहे. सूर्यग्रहण असो वा चंद्रग्रहण, या दोन्हीसाठी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र विशिष्ट स्थितीत असणे आवश्यक असते. म्हणूनच सूर्यग्रहण नेहमी अमावस्येच्या आसपास आणि चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेच्या आसपास होते. यावर्षातील म्हणजे 2026 मधील पहिले सूर्यग्रहण सूर्यग्रहण देखील अमावस्येच्या दिवशी झाले होते, तर वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजेच रक्षाबंधनाला होणार आहे. मात्र तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की, ग्रहणांचा या दोन विशेष तारखांशी इतका जवळचा संबंध का असतो? इतर कोणत्याही तारखांना ग्रहण का होत नाही? या प्रश्नाचे उत्तर विज्ञान आणि आपल्या पौराणिक कथांमध्ये, दोन्ही ठिकाणी अतिशय रंजक पद्धतीने दिले आहे.

याचे खगोलशास्त्रात काय सांगितले आहे कारण

खगोलशास्त्रानुसार, जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो, तेव्हा सूर्यग्रहण होते. या स्थितीत, चंद्राची सावली पृथ्वीच्या काही भागांवर पडते, ज्यामुळे सूर्याचा काही भाग किंवा संपूर्ण सूर्य झाकला जातो. ही परिस्थिती केवळ अमावस्येच्या आसपासच घडू शकते, कारण अमावस्येच्या वेळी चंद्र पृथ्वी आणि सूर्य या दोघांच्याही साधारणपणे एकाच दिशेत असतो. परंतु, चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेपासून सुमारे ५ अंशांनी कललेली असल्यामुळे, चंद्राची सावली बहुतेक वेळा पृथ्वीच्या वर किंवा खाली जाते, त्यामुळे दर महिन्याला अमावस्येला ग्रहण होत नाही.

Numberlogy:  मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

पौर्णिमेलाच का होते चंद्रग्रहण

चंद्रग्रहण हे सूर्यग्रहणाच्या अगदी उलट असते. या ग्रहणात, पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते. सूर्यप्रकाश थेट चंद्रापर्यंत पोहोचू शकत नाही आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. ही परिस्थिती केवळ पौर्णिमेच्या वेळीच शक्य असते, कारण पौर्णिमेला सूर्य आणि चंद्र पृथ्वीच्या जवळजवळ विरुद्ध बाजूंना असतात. मात्र इथेही प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही. चंद्राच्या कक्षेच्या तिरछेपणामुळे, त्याची सावली अनेकदा पृथ्वीच्या सावलीच्या वर किंवा खाली जाते. त्यामुळे, ग्रहण होण्यासाठी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र योग्य स्थितीत असणे आवश्यक असते.

पौराणिक कथेनुसार राहू केतूची कथा

हिंदू पौराणिक कथेमध्ये ग्रहणांविषयी एक खूप प्रसिद्ध कथा आहे. या कथेचा संबंध समुद्रमंथन आणि अमृतप्राप्तीशी जोडलेला आहे. आख्यायिकेनुसार, जेव्हा देव आणि दानवांच्या समुद्रमंथनातून अमृत निर्माण झाले, तेव्हा भगवान विष्णूंनी ते देवांना देण्याचे ठरवले. याच काळात, स्वरभानू नावाच्या एका असुराने देवतेचे रूप धारण केले, तो त्यांच्यामध्ये बसला आणि त्याने ते अमृत प्राशन केले. असे म्हटले जाते की, सूर्य आणि चंद्राने त्याला ओळखले आणि भगवान विष्णूंना त्याच्याविषयी माहिती दिली. त्यानंतर भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने स्वरभानूचे शीर धडापासून वेगळे केले. दरम्यान, अमृताचे काही थेंब त्याच्या शरीरात शिरले होते. त्यामुळे त्याचे शीर आणि धड अमर झाले. त्याच्या शीराला राहू आणि धडाला केतू म्हटले जाऊ लागले.

Weekly Horoscope: ऑगस्ट महिन्याचा चौथा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

सूर्य आणि चंद्राकडून सूड घेतील असा विश्वास

पौराणिक कथेनुसार, सूर्य आणि चंद्राने भगवान विष्णूला राहूची ओळख सांगितल्यामुळे तो त्यांच्यावर क्रोधित झाला. असे म्हटले जाते की, यामुळेच राहू वेळोवेळी सूर्य आणि चंद्राला गिळण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा राहू सूर्याला गिळण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा सूर्यग्रहण होते. जेव्हा राहू चंद्राला गिळतो, तेव्हा चंद्रग्रहण होते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: सूर्यग्रहण अमावस्येलाच का लागते?

    Ans: अमावस्येला चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो. या वेळी तिन्हींची स्थिती योग्य जुळल्यास चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि सूर्यग्रहण होते.

  • Que: सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यात काय फरक आहे?

    Ans: सूर्यग्रहणात चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो, तर चंद्रग्रहणात पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते.

  • Que: ग्रहण होण्यासाठी काय आवश्यक असते?

    Ans: सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांची विशिष्ट स्थिती आणि जवळपास सरळ रेषेत जुळणी होणे आवश्यक असते.

Web Title: Astronomical reasons behind eclipses occurring only on amavasya and purnima

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • amavasya
  • dharm
  • hindu religion

संबंधित बातम्या

Sarvapitri Amavasya: सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पिंपळाशी संबंधित करा हे विशेष उपाय, पूर्वज आणि शनिदेव होतील प्रसन्न
1

Sarvapitri Amavasya: सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पिंपळाशी संबंधित करा हे विशेष उपाय, पूर्वज आणि शनिदेव होतील प्रसन्न

Sahasra Chandra Darshan: हजार पौर्णिमा झाल्यावरच सहस्रचंद्रदर्शन सोहळा करावा की आगोदर? काय सांगते धर्मशास्त्र
2

Sahasra Chandra Darshan: हजार पौर्णिमा झाल्यावरच सहस्रचंद्रदर्शन सोहळा करावा की आगोदर? काय सांगते धर्मशास्त्र

Lairai Devi Temple: गोव्यातील लइराई देवी कोण आहे? शिरगाव जत्रेचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या
3

Lairai Devi Temple: गोव्यातील लइराई देवी कोण आहे? शिरगाव जत्रेचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Shadashtak Yog: ९ ऑक्टोबरला तयार होणार षडाष्टक योग, ‘या’ ५ राशींनी राहावे सावध
4

Shadashtak Yog: ९ ऑक्टोबरला तयार होणार षडाष्टक योग, ‘या’ ५ राशींनी राहावे सावध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.