Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

August Festivals List 2026: नागपंचमी ते रक्षाबंधनापर्यंत ऑगस्ट महिन्यातील सणांची यादी

आजपासून ऑगस्ट महिन्याची सुरुवात होत आहे. हा महिना धार्मिकरित्या खूप पवित्र आणि विशेष मानला जातो. कारण या महिन्यात श्रावण सुरू होत असून अनेक सण येणार आहेत. ऑगस्ट महिन्यातील सणांची यादी सविस्तर जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 01, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

२०२६ सालाचा आठवा महिना म्हणजेच ऑगस्ट महिन्याची आजपासून सुरुवात होत आहे. हा महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण या महिन्यामध्ये अनेक मोठे उपवास आणि सण येणार आहेत. ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने होणार आहे. त्यानंतर श्रावण महिन्याला प्रारंभ होईल आणि सण उत्सवांची रेलचेल सुरू होईल. हिंदू संस्कृतीत श्रावण महिना हा भगवान शिवाला समर्पित आहे. नाग पंचमी, श्रावण पौर्णिमा आणि रक्षाबंधन यासारखे प्रमुख सणही या महिन्यात येत आहेत. या काळात कामिका आणि पवित्र एकादशीचे व्रत देखील केले जाईल, ज्याचे शास्त्रांमध्ये आणि पद्मपुराणात विशेष महत्त्व आहे. त्यामुळे व्रत आणि सणांच्या बाबतीत हा महिना खूप खास आणि महत्त्वाचा असणार आहे. ऑगस्ट महिन्यातील सणांची यादी सविस्तर जाणून घेऊया

रविवार 2 ऑगस्ट – संकष्टी चतुर्थी

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच संकष्टी चतुर्थी आहे. या चतुर्थीला गजानन संकष्टी चतुर्थी म्हटले जाते.

बुधवार 5 ऑगस्ट – कालाष्टमी

श्रावण महिन्यातील कालाष्टमी ५ ऑगस्ट २०२६ (बुधवार) रोजी आहे. या दिवशी भगवान काल भैरवाची पूजा केली जाते.

शनिवार 8 ऑगस्ट – रोहिणी व्रत

रोहिणी व्रत शनिवार 8 ऑगस्ट रोजी आहे. हा जैन धर्मातील एक महत्त्वाचा उपवास आहे जो भगवान वासुपूज्य स्वामींना समर्पित आहे. हा दिवस आत्मशुद्धी, सुख, शांती आणि समृद्धीसाठी पाळला जातो.

Ambaji Temple: ५१ शक्तीपीठांपैकी एक मानले जाणारे गुजरातमधील अंबाजी मंदिर, जाणून घ्या पौराणिक कथा आणि धार्मिक वैशिष्ट्ये

रविवार 9 ऑगस्ट – कामिका एकादशी

श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला कामिका एकादशी म्हणतात. यावर्षी कामिका एकादशी रविवार, ९ ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी, ठरलेल्या विधींनुसार भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि उपवास ठेवला जातो. असे केल्याने पापांचे क्षालन होते आणि प्रचंड पुण्यप्राप्ती होते, असा विश्वास आहे.

सोमवार 10 ऑगस्ट – सोम प्रदोष व्रत

सोम प्रदोष व्रत १० ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आणि सोमवार यांचा दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे.

मंगळवार 11 ऑगस्ट – मासिक शिवरात्री

श्रावण महिन्याची शिवरात्री ११ ऑगस्ट रोजी आहे. चतुर्दशी तिथी १२ ऑगस्ट रोजी पहाटे ०४:५४ वाजता सुरू होते आणि पहाटे ०१:५३ वाजता संपते.

बुधवार 12 ऑगस्ट – आषाढ अमावस्या

बुधवार, १२ ऑगस्ट रोजी येणारी आषाढ अमावस्या ही महाराष्ट्रात दीप अमावस्या (दिव्यांची अमावस्या) आणि गटारी अमावस्या म्हणून साजरी केली जाते.

गुरुवार 13 ऑगस्ट – श्रावण मास आरंभ

हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याची सुरुवात गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी होत असून सांगता शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी होईल. हा महिना भगवान शंकराच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो.

Lotus Significance: देवी लक्ष्मी आणि सरस्वती यांना कमळाचे फूलच का आहे प्रिय? जाणून घ्या धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

रविवार 16 ऑगस्ट – विनायक चतुर्थी

रविवार १६ ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी आहे. या दिवशी गणपतीची पूजा केली जाते आणि उपवास पाळला जातो.

सोमवार 17 ऑगस्ट – नागपंचमी,पहिला श्रावणी सोमवार व्रत

सोमवार, 17 ऑगस्ट रोजी नागपंचमी आणि महाराष्ट्राच्या (दक्षिण व पश्चिम भारतीय) कॅलेंडरनुसार पहिला श्रावणी सोमवार व्रत आला आहे. (उत्तर भारतात हा तिसरा श्रावणी सोमवार आहे). या दिवशी नागदेवता आणि भगवान शंकराची पूजा केली जाते.

रविवार 23 ऑगस्ट – श्रावण पुत्रदा एकादशी व्रत

रविवार, २३ ऑगस्ट रोजी श्रावण पुत्रदा एकादशीचा उपवास पाळला जातो. या शुभ दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि संततीच्या आशीर्वादासाठी प्रार्थना केली जाते.

मंगळवार 25 ऑगस्ट – भौम प्रदोष व्रत

मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी रोजी भौम प्रदोष व्रत आहे. या दिवशी, प्रदोष काळात भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते, कर्जातून मुक्ती मिळते आणि मंगळ दोष शांत होतो.

गुरुवार 27 ऑगस्ट – नारळी पौर्णिमा

गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा हा सण साजरा केला जात आहे. या दिवशी पौर्णिमा तिथीची सुरुवात सकाळी ९ वाजून १८ मिनिटांनी होते.

शुक्रवार 28 ऑगस्ट – रक्षाबंधन

रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी हा सण 28 ऑगस्ट, शुक्रवारी येतोय. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्या बदल्यात तो तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.

सोमवार 31 ऑगस्ट – संकष्टी चतुर्थी

संकष्टी चतुर्थीचा उपवास सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी आहे. हा दिवस भगवान गणेशाला समर्पित असून, संकटे दूर करण्यासाठी विधी केले जातात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: ऑगस्ट 2026 मध्ये कोणते प्रमुख सण येणार आहेत?

    Ans: ऑगस्ट 2026 मध्ये नागपंचमी, रक्षाबंधन, श्रावणी उपक्रमांसह अनेक महत्त्वाचे हिंदू सण आणि व्रत येणार आहेत.

  • Que: ऑगस्ट महिन्यात कोणत्या व्रतांना विशेष महत्त्व असते?

    Ans: श्रावण महिन्यातील सोमवार व्रत, नागपंचमी, रक्षाबंधन आणि इतर धार्मिक व्रतांना विशेष महत्त्व दिले जाते

  • Que: ऑगस्ट महिन्यातील सणांचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: या महिन्यातील सण भक्ती, कुटुंबातील नाती, निसर्गपूजन, देवपूजा आणि भारतीय संस्कृतीतील पारंपरिक मूल्यांचे जतन करण्याचा संदेश देतात.

Web Title: August festivals list 2026 nag panchami to raksha bandhan festival list in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • month

संबंधित बातम्या

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत
1

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत

Budh Nakshatra Parivartan: २१ सप्टेंबरनंतर बुधाचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होणार सुधारणा
2

Budh Nakshatra Parivartan: २१ सप्टेंबरनंतर बुधाचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होणार सुधारणा

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Weekly Horoscope: सप्टेंबर महिन्याचा चौथा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Weekly Horoscope: सप्टेंबर महिन्याचा चौथा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.