
फोटो सौजन्य- pinterest
आज गुरुवार, 1 जानेवारीचा दिवस. आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी म्हणजेच प्रदोष व्रत आहे. शुभ योगायोमुळे चंद्र त्याच्या उच्च राशी कर्क राशीत असेल त्यामुळे गौरी योग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राच्या या संक्रमणामुळे सुनाफ योग तयार होणार आहे. गुरु यांच्यामध्ये बुधादित्य योग आणि शुक्रादित्य योगासह एक समसप्तक योग देखील तयार होणार आहे. रोहिणी नक्षत्रामुळे शुभ योग आणि रवि योगदेखील तयार होणार आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी शुभ योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी वर्षाचा पहिला दिवस शुभ राहील. सूर्य आणि मंगळाच्या प्रभावामुळे तुम्हाला लाभ आणि सन्मान मिळेल. आजचा दिवस उत्साहाने भरलेला राहील. राजकीय क्षेत्रात तुमचा प्रभाव आणि आदर वाढेल. तुमच्या वडिलांकडून आणि त्यांच्या कुटुंबाकडून तुम्हाला लाभ मिळेल. व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला मित्र आणि नातेवाईकांकडून पाठिंबा मिळेल. धार्मिक कार्यक्रमात तुम्ही सहभागी होऊ शकतात.
मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस आनंदाचा राहील. तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित लाभ होऊ शकतो. आज तुम्ही नवीन प्रकल्पाची सुरुवात करु शकता. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. तुम्हाला एखादी भेटवस्तू देखील मिळू शकते. परदेशी स्रोतांकडून फायदा होऊ शकतो.
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला अनपेक्षित फायदे मिळतील. कामावर तुम्हाला पाठिंबा मिळेल. तुम्ही एखाद्या धार्मिक ठिकाणी जाऊ शकता. तुमच्या व्यवस्थापन कौशल्याचा आज फायदा होईल. तुम्हाला जवळच्या नातेवाईकाला भेटण्याची संधी मिळेल. दूरच्या नातेवाईकाकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. तुमची मुले तुम्हाला आनंद देतील.
वृश्चिक राशीच्या लोकांचा आजचा दिवस आनंदाचा राहील. तुम्हाला अनपेक्षित स्रोताकडून फायदा होऊ शकतो. तुम्हाला एखाद्या मित्राकडून किंवा सहकाऱ्याकडून पाठिंबा मिळू शकतो. हॉटेल किंवा इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये गुंतलेल्यांना नशिबाची अपेक्षित साथ मिळेल. तुम्हाला तुमच्या जुन्या ओळखीच्या व्यक्ती किंवा मित्राला भेटण्याची संधी मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही घरामध्ये शुभ कार्यक्रमाचे आयोजन करु शकता.
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळेल. तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात तुम्हाला नवीन संधी मिळू शकते. तुम्ही एक नवीन प्रकल्प देखील सुरू करू शकता. तुम्हाला अनपेक्षित यश मिळेल. तुम्हाला सरकारी क्षेत्रातून लाभ मिळू शकतात. मालमत्ता आणि मागील गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकेल. धार्मिक स्थळाला तुम्ही भेट देऊ शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)