
Vastu Tips for Bedroom: बेडखाली चुकूनही ठेवू नका 'या' वस्तू! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Vastu Tips For Home : मुंबईसारख्या शहरात घरं लहान असल्याने जागा कमी असते. त्यामुळे जागा वाचवण्यासाठी सगळेच काही ना काही जुगाड करतात. त्यामध्ये सोईची जागा म्हणजे बेडच्या खाली आपण हवी ती गोष्ट ठेवतो. बेडच्या खाली कपडे, चपला, भांडी, जुन्या बॅगा काय ठेवलं जातं. त्याने जागा वाचते मात्र पण वास्तुशास्त्रात याबद्दल काहीतरी वेगळं सांगितलं आहे. काही गोष्टी या बेडखाली काही गोष्टी चुकूनही ठेवू नयेत. त्याचा परिणाम तुमच्या झोपेवर, मनावर आणि घराच्या वातावरणावर होतो. Vastu Tips for Bedroom:
बेडरूम ही फक्त झोपण्याची जागा नाही तर ती आरामाची, शांततेची जागा आहे. दिवसभर काम करून आपण तिथे शांत झोपतो. त्यामुळे तिथे स्वच्छता असणं खूप गरजेचं आहे. बेडखाली कचरा किंवा नको असलेल्या वस्तू ठेवल्या की त्याचा परिणाम होतो. .
अनेकांच्या घरी सवय असते की, जुने सामान काहीतरी कामाला येईल म्हणून फेकून न देता बेडखाली टाकून देतात. तुटलेलं सामान, जुने पेपर, कधीच न लागणाऱ्या वस्तू हे सर्वकाही बेडखाली पडून असतं. वास्तुशास्त्रानुसार हे सगळ्यात चुकीचं आहे. जुनं, तुटलेलं, भंगार सामान घरात नकारात्मक ऊर्जा आणतं. जे सामान तुमच्या काहीच कामाचं नाही ते घरात न ठेवता सरळ बाहेर काढा.
जागा वाचवण्यासाठी सगळ्यात जास्त लोक बेडखाली चपला-बूट ठेवतात. पण हे करू नका. वास्तुशास्त्रात सांगितलं आहे की,झोपण्याच्या जागेखाली चपला-बूट ठेवणं चांगलं नसते. चपला-बूट आपण बाहेर घालून जातात. त्यामुळे त्याच्यावर धूळ घाण असते. त्यांना बेडखाली ठेवल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि त्यामुळे आपल्या झोपवर परिणाम होतो. चपला ठेवण्यासाठी घराबाहेर किंवा वेगळ्या ठिकाणी स्टँड तयार करा मात्र बेडखाली चप्पला ठेवू नका.
बेडखाली लोखंडाच्या वस्तू, जड पेट्या, धातूचं सामान ठेवणं पण टाळा. विशेषतः ज्या वस्तू तुम्ही रोज वापरत नाही अशा वस्तू बेडखाली दाबून ठेवू नका. त्यामुळे बेडरूममध्ये एक प्रकारचा जडपणा येतो. वातावरण दाबल्यासारखं वाटतं. बेडखालची जागा शक्य तितकी मोकळी आणि साफ ठेवण्याचा प्रयत्न करा.
तुटलेलं घड्याळ, बंद पडलेला मोबाईल, खराब झालेले इलेक्ट्रॉनिक सामान, तुटलेली खेळणी… अशा वस्तू पण नंतर दुरुस्त करुन म्हणून वर्षांनुवर्ष बेडखाली ठेवतो. बेडखाली टाकून देतात. वास्तुशास्त्रात तुटलेल्या वस्तूंचा संबंध थेट नकारात्मकतेशी जोडला गेला आहे. अशा वस्तू घरात ठेवल्याने चांगलं काम होत नाही, अडथळे येतात असं मानलं जातं. त्यामुळे तुटलेलं सामान लगेच घराबाहेर काढा.
sant sena maharaj: महाराष्ट्रापासून उत्तर भारतापर्यंत भक्तीचा संदेश पोहोचवणारे संत सेना महाराज
बेडखाली वस्तू ठेवल्या तर कोणाला दिसणार पण नाही, मग काय फरक पडतो? पण वास्तुशास्त्र सांगतं की दिसत नसलं तरी त्या वस्तूंची ऊर्जा तिथेच राहते. बेडरूम ही तुमची प्रायव्हेट जागा आहे. तिथे तुम्ही शांत झोपता, मन मोकळं करता. जर तिथेच खाली कचरा, घाण, जुनं सामान असेल तर तुमच्या मनावर पण त्याचा परिणाम होतो. झोप नीट लागत नाही, डोकं जड होतं, घरात वाद होतात असं सांगितलं जातं. त्यामुळे बेडखालची जागा नेहमी साफ ठेवा. रोज झाडू मारा. शक्य असेल तर काहीच ठेवू नका. आणि ठेवायचंच असेल तर फक्त स्वच्छ, रोज लागणाऱ्या वस्तू व्यवस्थित ठेवा. जुनं भंगार अजिबात ठेवू नका.
(डिस्क्लेमर: ही माहिती सामान्य मान्यतांवर आधारित आहे. आम्ही कोणत्याही अंधश्रद्धेचं समर्थन करत नाही. याचा उद्देश फक्त माहिती देणे आहे.)